एक मेपासून देशभरामध्ये १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना करोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याने लसीकरणासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यामध्ये अगदी मासिक पाळीपासून ते मद्यपानासंदर्भातही प्रश्न विचारले जात आहेत. खास करुन मद्यपानासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर किती दिवस मद्यपान करु नये?, मद्यपान केल्याने लसीचा प्रभाव कमी होतो का?, किती दिवस आधी आणि नंतर मद्यपान टाळलं पाहिजे असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेत. याच प्रश्नांची उत्तर आपण ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे डॉक्टर नितीन पाटणकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात काय सांगतायत डॉक्टर लस आणि मद्यपानाच्या कनेक्शनबद्दल…

लोकसत्ता डॉटकॉमचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.