Alexei Navalny Death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सर्वात मोठे टीकाकार आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवाल्नी यांच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूनंतर देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, अलेक्सी नवाल्नींची पत्नी युलिया नवलनाया यांनी पतीच्या मृत्यूनंतर प्रथमच केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. युलिया नवलनाया यांनी अलेक्सी नवाल्नींबरोबर घालवलेल्या एका सुंदर क्षणाचा फोटो त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नवलनाया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे तुझ्यावर प्रेम आहे.” अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात गूढ मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूचे वर्णन षड्यंत्र म्हणून केले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी रशियन विरोधी पक्षनेत्याचे प्रवक्ते किरा यार्मिश यांनी अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची खात्री केली आणि मृतदेह तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याची मागणी केली. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, यार्मिश यांनी रशियन अधिकाऱ्यांनी प्रक्रियेला विलंब करण्यासाठी खोटे बोलल्याचा आरोपही केला. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे टीकाकार अलेक्सी नवाल्नी यांचे शुक्रवारी तुरुंगात फिरताना अस्वस्थ वाटल्याने जमिनीवर कोसळून मृत्यू झाला, असं यार्मिशने सांगितले आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पत्नी युलिया आता यांच्याकडे रशियातील विरोधी पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे त्या राजकारणात सक्रिय होतात हे लवकरच समजणार आहे.

त्यांनी पती ॲलेक्सी यांना दोन वर्षांत पाहिले नसल्याचे सांगितले

यंदा म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्येही युलियाने पहिल्यांदाच हजेरी लावली होती. जर अलेक्सी नवाल्नींच्या मृत्यूचे कारण समजले तर नक्कीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन अन् त्यांचे सहकारी शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जातील, असंही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायालाही पुतिन यांच्या विरोधात भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्या म्हणाल्या की, “मला जागतिक समुदायाला आवाहन करायचे आहे, या खोलीतील प्रत्येकाने आणि जगभरातील लोकांनी या दुष्टाचा पराभव करण्यासाठी आता रशियामध्ये असलेल्या या भयंकर राजवटीचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे.” तुरुंगात अलेक्सी नवाल्नींचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर युलिया नवलनाया यांनी म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यांचा पती ॲलेक्सी यांना दोन वर्षांत पाहिले नसल्याचे सांगितले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ४७ वर्षीय नवलनाया म्हणाल्या की, त्या त्यांच्या निर्भय पतीच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत, कारण त्यांनी रशियामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती उभी केली होती. त्यांना १९ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि शक्य तितक्या कठोर तुरुंगात पाठवले.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

हेही वाचाः विश्लेषण : कर्जावरील छुप्या शुल्काला आता प्रतिबंध? काय आहे ‘केएफएस’? बँका, वित्तीय कंपन्यांसाठी ते बंधनकारक का?

खरं तर बाहेरच्या जगाला त्यांनी दिलेला शेवटचा मेसेज ही त्यांच्यासाठी व्हॅलेंटाइन नोट होती, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पहिल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या कपाळावर चुंबन घेतानाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “मला वाटते की प्रत्येक सेकंदाला तू माझ्याबरोबर आहेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे.” या जोडप्याने अनेकदा त्यांच्या कौटुंबिक जीवनातील छायाचित्रे मुलांबरोबर शेअर केली आहेत. त्यांच्या प्रेमकथेने अलेक्सी नवाल्नींच्या समर्थकांना प्रेरणा दिली आहे. आपले वैयक्तिक जीवन पूर्णपणे गुप्त ठेवणारे पुतिन यांच्याशी अलेक्सी नवाल्नी यांनी अनेकदा संघर्ष केला. नवलनाया नेहमीच म्हणतात की, मी एक आई आणि पत्नी आहे. परंतु मला राजकारणात जाण्यास रस नाही. परंतु आता नेतृत्वहीन आणि हद्दपार झालेल्या विरोधकांना एकत्र आणणारे दुसरे कोणी आहे का, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. २०२० रोजी अलेक्सी नवाल्नी यांना सायबेरियात विषबाधा झाली, तेव्हा त्यांनी नवऱ्याची जगण्याची आशा सोडून दिली होती. जर्मन धर्मादाय संस्थेच्या मदतीने स्थानिक डॉक्टरांनी त्यांना जीवनदान दिले.

हेही वाचाः कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

अन् नवाल्नी यांनी विमानतळावर युलिया यांना शेवटची हाक मारली

त्या म्हणाल्या की, सायबेरियातील डॉक्टरांनी अलेक्सी नवाल्नी यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पाच महिन्यांनंतर जेव्हा हे जोडपे मॉस्कोला परतले, तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले जाणार असल्याचं माहीत होते. जेव्हा जर्मनीतून नवाल्नी दाम्पत्य रशियात दाखल झाले तेव्हा त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी युलिया यांना सोडले पण पती अलेक्सी नवाल्नी यांना अटक केली, तेव्हा पोलीस घेऊन जाण्यापूर्वी अलेक्सी नवाल्नी यांनी विमानतळावर युलिया यांना शेवटची हाक मारली.

नवलनाया यांनी त्यांच्या आयुष्याचे काही प्रसंगही सांगितले आहेत. पूर्वी त्या दररोज त्यांच्या पतीला पत्र लिहिण्याचा प्रयत्न करीत असे. दोघे तुर्कीमध्ये सुट्टीच्या दिवशी भेटले, दोघांनी लगेच प्रेमात पडल्याचे सांगितले. अलेक्सीची राजकीय कारकीर्द सुरू झाल्यामुळे नवलनाया यांनी मुलांचे संगोपन करण्यासाठी बँकिंगमधील नोकरी सोडली. जर्मनीतील विषबाधातून ते बरे झाल्यानंतर अलेक्सी नवाल्नींनी विनोदातच पत्नीचे मत त्यांच्यापेक्षा जास्त कट्टरवादी असल्याचे सांगितले होते. खरं तर आता युलिया नवलनाया हे एक राजकीय व्यक्तिमत्व बनत असल्याचेही रशियन राजकीय समालोचक तातियाना स्टॅनोवाया यांनी सोशल मीडियावर अलेक्सी नवाल्नीच्या मृत्यूच्या दिवशी सांगितले.