ANT ग्रुपने अलीबाबाचं साम्राज्य उभं करणाऱ्या जॅक मा यांना सगळे अधिकार सोडण्यास सांगितलं आहे. अलीबाबा हे ऑनलाइन साम्राज्य उभं करणाऱ्या अब्जाधीश उद्योजकावर ही वेळ आली आहे. शनिवारी झालेल्या या घोषणेनुसार कंपनी संस्थापक, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यासह १० व्यक्तींना स्वतंत्र मतदानाचा हक्क देईल. त्यानंतर जॅक मा यांचं नियंत्रण संपेल. एवढा मोठा निर्णय झाला तरीही जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही असंही कंपनीने म्हटलं आहे.

कोण आहेत जॅक मा? त्यांना कंपनीने का हटवलं?

चीन मधून अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या तुकडीचे प्रतिनिधी जॅक मा होते. चीनमधून अनेक मुलं आजही अमेरिकेला जात असतात. या सगळ्यांनी चीनमध्ये परत यावं यासाठी चीन सरकारकडून केला जातो. असाच अमेरिकेतून शिकून परत आलेला उत्साही मुलगा होता जॅक मा. अमेरिकेत असताना अॅमेझॉनचं सगळं स्वरूप जॅक मा यांनी पाहिलं. असंच काही आपण आपल्या देशात सुरू करू शकतो का? हे स्वप्न जॅक मा यांनी उराशी बाळगलं होतं. चीन मध्ये आल्यानंतर त्यांनी आपलं स्वप्न अलीबाबाच्या रूपाने पूर्ण केलं. अॅमेझॉनला टक्कर देणारं समांतर साम्राज्य म्हणून अलीबाबाचा चीनमध्ये उदय झाला.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?

चिनी अर्थव्यवस्थेत अलीबाबचं महत्त्व प्रचंड वाढलं

चिनी अर्थव्यवस्थेत अलीबाबाचं महत्त्व प्रचंड वाढलं कारण अशा प्रकारचे उद्योजक किंवा असं स्वप्न उराशी बाळगलेले तरूण त्यावेळी चीनमध्ये नव्हते. चीन मध्ये नव्या उद्योजकांना ज्यांना व्यवसाय उभारायचा आहे आणि मोठा करायचा आहे त्यांना प्रेरणा ठरले ते म्हणजे जॅक मा. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत महत्त्व आहे.कोव्हिडच्या काळात जॅक मा यांनी स्वतःच्या कंपनीमार्फत वैद्यकीय साधनसामुग्री पुरवण्याचा नवीन प्रकार त्यांनी सुरू केला. जगात ज्याप्रमाणे अॅमेझॉन आहे तसं चीनमध्ये फक्त अलीबाबा आहे आणि हे साम्राज्य उभं करणारे जॅक मा यांच्या हातातच त्याचं संपूर्ण नियंत्रण होतं.

सत्ताधाऱ्यांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणं जॅक मा यांना भोवलं?

मात्र पुढच्या कालखंडात जॅक मा यांची चिनी राजव्यवस्थेबाबत नाराजी निर्माण झाली. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयी काही अनुद्गार बोलला. ते अनुद्गार काय होते ते समोर आलेलं नाही. मात्र शी जिनपिंग यांच्याबाबत वक्तव्य केल्याने जॅक मा यांचे ग्रह फिरले. प्रचंड मोठ्या आर्थिक साम्राज्याचे कर्तेधर्ते असलेले जॅक मा गायब झाले. मधले सहा महिने ते विविध ठिकाणी आहेत अशा बातम्या येत होत्या. जॅक मा हे कधी जपान किंवा कधी हाँगकाँग या ठिकाणी आहेत असंही कानावर येत राहिलं. चिनी व्यवस्था आपल्या माणसांना ते जगात कुठेही गेले तरीही सापळ्यात अडकवतेच. त्यामुळे जॅक मा हेदेखील अशाच प्रकारे सापळ्यात अडकतील हे उघड होतं. त्यामुळे चीन सरकारला खास करून शी जिनपिंग यांना जॅक मा डोळ्यात खुपत होते त्यांनी उभं केलेलं साम्राज्य नाही. त्यामुळे जॅक मा यांना ग्रुपमधून काढण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. राजसत्तेपुढे उद्योजकाची हार असं आज ANT ग्रुपने घेतलेल्या निर्णयाचं वर्णन करता येईल. चीनची अतिशय कर्मठ अर्थव्यवस्था आहे. ती कुणालाही स्वातंत्र्य देत नाही. चिनी अर्थव्यवस्थेला आर्थिक झटके बसले त्यावरही जॅक मा यांनी भाष्य केलं होतं. त्या सगळ्याचा फटका त्यांना बसला आहे. जो बसणार हे जवळपास निश्चित होतं.

चीनची अर्थव्यवस्था आव्हानं देणाऱ्या व्यावसायिकाला मोठं होऊ देत नाही

एखादा उद्योगपती आपल्या देशात मोठा होतो आहे, वाढतो आहे याचं चीनसारख्या राजसत्तेला सुरूवातीला कौतुक वाटतं पण नंतर अशा व्यवस्थेला नंतर अशा उद्योजकांचा अडथळा वाटू लागतो. जॅक मा यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. अमेरिकी अर्थव्यवस्था आणि चीन अर्थव्यवस्था यात नेमका हाच फरक आहे की अमेरिकी अर्थव्यवस्था तुम्हाला मोठं होऊ देते पण चीनसारखी अर्थव्यस्था असलेल्या देशात जर उद्योजक आव्हान देऊ लागला तर ती व्यवस्था त्याचे पाय कापते. याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे जॅक मा हेच ठरले आहेत.

चिनी व्यवस्थेला आधुनिक करण्याचं काम ज्या मोजक्या उद्योजकांनी केलं त्यापैकी एक जॅक मा होते. त्यांना आता कंपनीतून बाहेर जावं लागणं हा इतर उद्योजकांना एक प्रकारे चीनने दिलेला संदेशच आहे की आमचं ऐका अन्यथा उद्योग सोडा.

जॅक मा यांनी त्यांच्या कारकिर्दीला खूप आव्हानात्मक परिस्थितीत सुरूवात केली होती. जॅक मा यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात ३० वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना डावलण्यात आलं. जॅक मा यांनी सुरूवातीला पोलीस होण्यासाठीही अर्ज केला होता. मात्र शरीरयष्टी पाहून त्यांना या ठिकाणी नोकरी देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी KFC मध्येही नोकरीसाठी अर्ज केला होता. यात अर्ज करणारे २४ जण होते त्यापैकी २३ नुनिवडले गेले आणि जॅक मा यांना निवडण्यात आलं नाही.

१९९४ मध्ये जॅक मा यांनी पहिल्यांदा इंटरनेट हा शब्द ऐकला

१९९४ मध्ये जॅक मा यांनी पहिल्यांदा इंटरनेट हा शब्द ऐकलाहोता. १९९५ मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसोबत अमेरिका गाठलं. जेव्हा त्यांनी सर्वात पहिलं इंटरनेट सर्फिंग केलं तेव्हा त्यांना बिअर हा शब्द सापडला. तसंच बिअरशी संबंधित बरीच माहितीही मिळाली. वेगवेगळ्या देशांची माहिती त्यात होती मात्र चीनचं नाव कुठेही सापडलं नाही हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. पुढच्या खेपेला जॅक मा यांनी चीनबाबत माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट सर्फिंग केलं मात्र त्यांना ती माहिती त्यावेळीही मिळाली नाही.

अलीबाबा कंपनीची सुरूवात

अमेरिकेतून चीनमध्ये परतल्यावर आपल्या १७ मित्रांना गुंतवणुकीसाठीची गळ घालून आपल्या मित्रांसह अलीबाब कंपनीची स्थापना जॅक मा यांनी केली. १९९९ पर्यंत काही इतर कंपनींच्या मदतीने अलीबाबा मधली गुंतवणूक वाढून २५ दशलक्ष डॉलर्स इतकी झाली होती.

चीनमधल्या लोकांचा विश्वास जिंकल्यानंतर अलीबाबाचं साम्राज्य वाढत गेलं. अलीबाबा ही जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. अनेकदा अपयशी ठरून अत्यंत यशस्वी व्यावसायिक होण्याचं स्वप्न जॅक मा यांनी पाहिलं आणि पूर्णही केलं. मात्र अखेर त्यांना ही कंपनी सोडावी लागली.

अलीबाबा हे नाव जॅक मा यांना कसं सुचलं होतं?

आपल्या मित्रांसोबत जी कंपनी जॅक मा यांनी अलीबाबा सुरू केलं. मात्र अलीबाबा हे नाव कसं काय सुचलं हा किस्साही रंजक आहे. अलीबाबाच्या गोष्टी जॅक मा यांना माहिती होत्या. सामान्य माणसाला आपलं वाटेल आणि त्याला पटकन लक्षात राहिल असं नाव त्यांनी द्यायचं ठरवलं. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिको शहरातल्या एका कॉफी शॉपमध्ये जॅक मा बसले होते. त्यांनी तिथल्या एका सेविकेला विचारलं की तुला अलीबाबा नाव ठाऊक आहे का? ती हो म्हणाली. त्यावर त्यांनी विचारलं की अलीबाबा म्हटल्यावर तुला काय आठवतं? तर तिने उत्तर दिलं ओपन सेसमी.. अर्थात तिळा दार उघड किंवा खुल जा सिम सिम. या उत्तराने जॅक मा चकित झाले. त्यांनी नंतर या भागातल्या काही अनोळखी लोकांनाहीही असाच प्रश्न विचारला त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. अलीबाबाची गोष्ट आपल्याला माहित आहेच तो एक हुशार आणि लोकांसाठी काम करणारा चांगला व्यापारी होता. बस्स याच ठिकाणी अलीबाबा हे नाव कंपनीला द्यायचं हे जॅक मा यांच्या डोक्यात फिट्ट बसलं. त्यामुळेच त्यांनी आपल्या कंपनीला अलीबाबा हे नाव दिलं आणि त्याचं साम्राज्य उभं केलं.