Apple Intelligence जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला आहे. जवळ जवळ सर्वच कंपन्यांच्या मोबाइलमध्ये एआय प्रणाली आहे. आता टेक्नोलॉजिच्या क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या ॲपलच्या डिव्हाईसेसमध्येही लवकरच एआय फीचर येणार आहे. ॲपल झेड कंपनीची वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स सोमवारी (११ जून) पार पडली. या कॉन्फरन्समध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यातील महत्वाची घोषणा होती ॲपल इंटेलिजन्सची (Apple Intelligence). ही ॲपलची वैयक्तिक इंटेलिजन्स प्रणाली आहे. ही प्रणाली ॲपलच्या आयफोन, आयपॅड, मॅकमध्ये या वर्षाच्या अखेरपासून येणार आहे, त्यामुळे ॲपल युजर्सना आता आपल्या डिव्हाईसेसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेता येणार आहे. चर्चेत असलेले ॲपल इंटेलिजन्स काय आहे? युजर्सना याचा काय फायदा होईल? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

ॲपल इंटेलिजन्स म्हणजे काय?

ॲपलने आपल्या डिव्हाईसेससाठी वैयक्तिक बुद्धिमत्ता प्रणाली तयार केली आहे, ज्याला ॲपल इंटेलिजन्स असे नाव देण्यात आले आहे. ही प्रणाली आयफोन, आयपॅड, मॅक यांसारख्या ॲपल डिव्हाईसेसमध्ये लवकरच येणार आहे. यासाठी ॲपल कंपनीने चॅट जीपीटी तयार करणार्‍या ओपन एआयबरोबर करार केला आहे. ॲपल इंटेलिजन्स अगदी चॅट जीपीटीप्रमाणेच काम करेल. उदाहरणार्थ ॲपल इंटेलिजन्स युजर्सच्या आवडी-निवडी, ऑनलाइन प्राधान्ये आदी गोष्टी ट्रॅक करू शकेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ॲपल इंटेलिजन्समुळे iOS 18, iPadOS 18 आणि MacOS Sequoia मध्ये होम स्क्रीनसह कंट्रोल सेंटर चांगल्याप्रकारे डिझाइन करता येईल, यामुळे ॲप्सवरदेखील फेस आयडी लावून ॲप सुरक्षित ठेवता येतील. ॲपल इंटेलिजन्समुळे भाषा आणि छायाचित्र समजून घेणे आणि तयार करणे, एकंदरीत दैनंदिन कार्य सुलभ होईल.

article about mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा – बुद्धिमत्ता चाचणी
tea cost hike
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता चहाही महागणार? कारण काय?
NSE imposes 90 percent price ceiling for SME IPO
‘एसएमई आयपीओ’साठी एनएसईकडून ९० टक्के किंमत मर्यादेचा चाप
NEET exam scam University Admission exam National Testing Agency
लेख: अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण..
From June 2026 India will require all new smartphones tablets to have USB C charging ports to simplify charging and reduce electronic waste
मोबाईल असो की लॅपटॉप आता एकच असेल चार्जर; भारतात लवकरच लागू होणार हा नियम; काय होईल फायदा?
loksatta analysis need of chinese technicians to install machinery and train indian workers
विश्लेषण : आत्मनिर्भर भारताच्या नाड्या चीनच्या हाती? चिनी तंत्रज्ञांचा तुटवडा उद्योगांना का भेडसावतोय?
Sell Tur Buy TCS share, prediction of good returns in tcs, may decrease in tur price, Strategic Investment, Strategic Investment in Sell Tur Buy TCS share, tcs promising returns, share market, commodity market, decrease in tur price, finance article, marathi finance article, tcs share,
क…कमॉडिटीचा : तूर विका, टीसीएस घ्या
Decisions on petrol-diesel up to states Finance Minister appeal regarding bringing under GST
पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय राज्यांच्या हाथी; जीएसटी कक्षेत आणण्याबाबत अर्थमंत्र्यांचे आवाहन

हेही वाचा : विमान प्रवासादरम्यान मद्यसेवन का टाळावं?

ॲपल इंटेलिजन्सला प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युटची जोड आहे. प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट कृत्रिम बुद्धिमत्तेमधील गोपनीयतेसाठी एक नवीन मानक असल्याचा दावा केला जातो. ॲपलने आपले वैयक्तिक प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट (पीसीसी) तयार केले आहे. पीसीसीला एआयमधील सुरक्षा आणि गोपनीयतेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. ॲपलच्या मते, पीसीसी क्लाउड एआयमधील गोपनीयतेची सर्वात प्रगत प्रणाली आहे.

ॲपल इंटेलिजन्सचा फायदा

ॲपल इंटेलिजन्स युजर्सना लिखाणात मदत करू शकते. एखादे वाक्य किंवा एखादा मेसेज लिहायचा असल्यास ॲपल इंटेलिजन्स मदत करते; ज्यामुळे अगदी सहजतेने संवाद साधता येतो. ॲपल आता iOS 18, iPadOS 18 आणि macOS Sequoia मध्ये बिल्ट इन रायटिंग टूलही आणणार आहे. या सुविधेमुळे युजर्सना लिखाणात तर मदत होईलच, परंतु मजकुरातील लिखाण तपासण्यात आणि भाषांतरित करण्यातदेखील मदत होईल. ही सुविधा फर्स्ट पार्टी ॲपसह, मेल, नोट्स आणि थर्ड पार्टी ॲप्सलाही सपोर्ट करेल. ॲपलचे म्हणणे आहे की, ॲपल इंटेलिजन्सच्या ‘रायटिंग टूल’मुळे युजर्सचा लिखाणातील आत्मविश्वास आणखी वाढेल.

ॲपल इंटेलिजन्समुळे मेल लिहिणेही अगदी सोयीस्कर होईल. या प्रणालीमुळे मेलच्या इनबॉक्समध्ये महत्वाच्या मेलचा एक वेगळा विभाग असेल. विशेष म्हणजे मेल उघडल्याशिवायच युजर्सना संपूर्ण मेल वाचणे शक्य होईल. ॲपल इंटेलिजन्समुळे यात ‘स्मार्ट रिप्लाय’ असे एक फीचर असेल, जे मेलवर काय उत्तर द्यायचे हे सुचवेल आणि उत्तर योग्य असावे यासाठी मेलमधल्या मजकुराचा संपूर्ण संदर्भ समजून घेईल. तसेच तुमच्या लिखाणातील सुधारणाही सुचवेल.

फोटो एडिटिंग आणि ॲपल इंटेलिजन्स

ॲपल इंटेलिजन्स आता काही सेकंदातच छायाचित्रदेखील तयार करू शकणार आहे. ॲपल इंटेलिजन्स केवळ संवाद साधण्यात आणि लिखाणातच मदत करू शकणार नाही, तर एआय प्रणालीचा वापर करून छायाचित्रही एडिट करू शकेल. ॲपलचे ‘इमेज प्लेग्राउंड’ ॲप युजर्सना हवे तसे छायाचित्र काही सेकंदातच एडिट करून देईल. यात ॲनिमेशन, बॅकग्राऊंड बदलणे, एखाद्या विशिष्ट गोष्टी समाविष्ट करणे शक्य होणार आहे. ॲपलमध्ये आणखी एक ॲप आहे, ज्यात छायाचित्रामध्ये हवे ते बदल करता येतात. यामध्ये हवा तो पोशाख, दागिने, ठिकाण आपल्या छायाचित्राबरोबर जोडता येतात. ॲपलने इमेज जनरेटरचीदेखील घोषणा केली आहे. हा ॲप इमोजीवर आधारित आहे. ॲपलने याला ‘जेनमोजी’ असे नाव दिले आहे. यामध्ये युजर्सना स्वतःचा इमोजी तयार करता येतो.

ॲपल इंटेलिजन्समुळे iPhone वर एखादे छायाचित्र शोधणे अधिक सोयीचे होते. विशिष्ट फोटो शोधण्यासाठी युजर्स आपल्याला येत असलेल्या भाषेचा वापर करू शकतात, असा कंपनीचा दावा आहे. उदाहरणार्थ, ‘समुद्रकिनारा आणि नारळाची झाडं’ यासारख्या साध्या सूचना वापरून युजर्स छायाचित्र शोधू शकतात. एखादा व्हिडीओ शोधायचा असला तरी याच पद्धतीने शोधता येतो.

ॲपल इंटेलिजन्स आणि सिरी (Siri)

ॲपल इंटेलिजन्समुळे आता सिरीची कार्यक्षमतादेखील वाढणार आहे. ॲपलचा दावा आहे की, जर युजर्स आता काही बोलताना अडखळले, तरी सिरी त्याचे अनुसरण करू शकेल. ॲपल इंटेलिजन्समुळे सिरीला नवे रूप मिळणार आहे. आता सिरीबरोबर बोलत असताना आयफोनच्या बाजूला दिलेला लाइट चमकेल. माहितीनुसार, सध्या केवळ iPhone 15 प्रो सीरिज आणि एम चिप असलेल्या डिव्हाईसमध्येच संपूर्ण एआय फीचर्सचा समावेश असणार आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचे दरमहा वेतन किती? कोणत्या जागतिक नेत्याचे वेतन सर्वाधिक?

ॲपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरी iPhone, iPad आणि Mac च्या सेटिंग्ज संबंधित माहितीही प्रदान करेल. तसेच एखादे ॲप अपडेट करण्याविषयीही युजर्सना मार्गदर्शन करेल. या नव्या प्रणालीमुळे सिरी तुमची प्रत्येक कमांड ऐकेल. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राने त्याचा नवीन पत्ता पाठवल्यास आणि तुम्ही हा पत्ता कॉन्टॅक्टमध्ये अॅड कर अशी कमांड दिल्यास, सिरी लगेच तो पत्ता अॅड करेल. सिरी तुमची वैयक्तिक माहिती गोळा न करता ही सर्व कामे करू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे.

सुरक्षेचे काय?

सिरीला तुमच्या सर्व क्रियाकलापांची जाणीव असेल आणि त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ॲपलने म्हटले आहे की, ॲपल इंटेलिजन्स प्रत्येक टप्प्यावर वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले आहे. वापरकर्त्याची माहिती सुरक्षित राहावी यासाठी प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट प्रणाली वापरण्यात आली आहे. ॲपल इंटेलिजन्सचा लाभ सध्यातरी ॲपलच्या प्रत्येक डिव्हाईसवर घेता येणार नाही. वर्षाच्या उत्तरार्धात वापरकर्त्यांसाठी ॲपल इंटेलिजन्सची सुविधा उपलब्ध होईल. ॲपल सहसा नवीन आयफोन मॉडेल्ससह iOS च्या नवीन आवृत्त्या लाँच करते, त्यामुळे ॲपल इंटेलिजन्सच्या या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 16 सह येऊ शकते.