सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारसू रिफायनरीचे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्या यात सक्रिय आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी बारसू परिसरातील कातळशिल्पांचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले की, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कातळ शिल्प सापडल्यामुळे येथे प्रकल्प उभारता येणार नाही. यासाठी त्यांनी युनेस्को या जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन करणाऱ्या संस्थेचा दाखला दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कातळशिल्प म्हणजे नक्की काय ? आणि कशा प्रकारे ती आपला वारसा ठरतात, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

युनेस्को नक्की काय करते?

युनेस्को ही शिक्षण, कला, विज्ञान आणि संस्कृती यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर सहकार्याद्वारे जागतिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या उद्देशासाठी बांधील असलेली जागतिक संस्थाा आहे. युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघांतर्गत संस्था असून जागतिक वारशांच्या संवर्धन व जतनासाठीही ती कार्यरत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर युनेस्कोने एखाद्या स्थळाला जागतिक वारशाचा दर्जा दिल्यास त्या स्थळाच्या संवर्धनाची जवाबदारी या संघटनेकडे असते. अशा प्रकारचा वारसा हा केवळ त्या देशापुरता मर्यादित राहत नाही तर तो संपूर्ण मानव जातीचा ठरतो. म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने कातळ शिल्पे कोकणात सापडल्यामुळे महाराष्ट्र पुरातत्व संचालनालयाने या कातळ शिल्पांच्या स्थळांचा समावेश जागतिक वारशाच्या यादीत व्हावा, यासाठी निवेदन सादर केले आहे.

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”

कातळ शिल्प म्हणजे काय ?

अगदी सोप्या भाषेत कातळ शिल्पं म्हणजे दगडावर कोरलेली चित्र. जगभरात अशी दगडावर कोरलेली अनेक चित्र आहेत. त्यांचा काळ हा अश्मयुगीन असल्याचे मानले जातो. अशा प्रकारची कला ‘रॉक आर्ट’ प्रकारात मोडणारी आहे. इंग्रजीत कातळशिल्पांना ‘पेट्रोग्लीफ्स’ म्हटले जाते. पेट्रो म्हणजे दगड तर ग्लीफ्स म्हणजे कोरीवकाम. दगडावर करण्यात येणाऱ्या या कलेचे विविध प्रकार आहेत. विशेष म्हणजे कोकणात ही कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे कोकणाला जागतिक पर्यटनात महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्याची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत.

आणखी वाचा: बारसूचा वाद: राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले मायनाक भंडारी कोण होते?

कातळशिल्पांचा इतिहास

आजतागायत कोकणात अतिप्राचीन मानवी संस्कृती अस्तित्त्वात होती का? असे प्रश्न विचारले जात होते. कोकणात सापडणाऱ्या या कातळ शिल्पांचा काळ थेट इसवी सनपूर्व दोन हजार वर्षे इतका मागे जातो. काही अभ्यासक त्याहीपेक्षा कातळ शिल्पे जुनी असावीत, असे मानतात. त्यामुळे या भागाला हजारो वर्षांचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले असले तरी कातळ शिल्पांच्या कालगणनेवरून अभ्यासकांमध्ये मतमतांन्तरे आहेत.

कोकणातील कातळशिल्प

कोकणात ७६ पेक्षा अधिक गावांमध्ये १३० पेक्षा अधिक ठिकाणी जवळपास १७०० हून अधिक कातळशिल्पे अभ्यासकांनी नोंदविली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अनेक नवीन ठिकाणीही कोकणात ती सापडत असून त्यांची संख्या वाढतेच आहे. कोकणातील कातळ शिल्पांच्या संशोधनात वेगवेगळ्या संस्था सामील आहेत. या संस्थांनी केलेल्या शोध मोहिमेत चौकोनात कोरलेली कातळशिल्प मोठ्या प्रमाणात नोंदविलेली आहेत. एखाद्या अणुकुचीदार गोष्टीने पिठावर रेघोट्या मारल्यानंतर येणारा उठावदारपणा या कातळ शिल्पांमध्ये पाहू शकतो. ही सर्व कातळशिल्पे द्विमितीमधील आहेत. बहुतांशी चित्रांमध्ये पक्षी, प्राणी व मानवी आकृत्या प्रामुख्याने दिसतात. भारताच्या इतर भागात आढळणाऱ्या कातळशिल्पांच्या तुलनेत कोकणातील कातळशिल्पे ही जांभा दगडाच्या सड्यावर कोरलेली आणि भिन्न रचनेची आहेत. कोकणातील आढळणारी कातळशिल्पांची रचना पोर्तुगाल, इजिप्त, ऑस्ट्रेलियात येथे आढळणाऱ्या शिल्पांशी साधर्म्य दर्शवणारी आहे. कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिश काळातच गोव्यासारख्या ठिकाणी कातळशिल्पांची नोंद करण्यात आली होती. कोकणातील कातळशिल्पांचा शोध तुलनेने उशिरा लागला आहे. जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले, देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे ,शेडे, कोतापूर, देवीहसोळ, भडे, हरचे, रुण, खानावली, रावारी, लावगण आदी ठिकाणी कातळ शिल्पांची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघोटन ,बापर्डे, वानिवडे, हिवाळे , कुडोपी आदी ठिकाणी कातळ शिल्पांची नोंद करण्यात आली आहे.

आणखी वाचा: विश्लेषण : ‘हनी ट्रॅप’ का ठरत आहे भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी ?

बारसू मधील कातळ शिल्प

राजापूरजवळ बारसू गावच्या सड्यावर महत्त्वपूर्ण कातळ शिल्पं आढळली आहेत. आजपर्यंत भारतात जेवढ्या कातळशिल्पांची नोंद झाली त्या त्यामध्ये बारसूच्या सड्यावर आढळून आलेली सुमारे ५७ फूट लांबी व वीस फूट रुंद कातळशिल्पाची रचना सर्वात मोठी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकिनातून बारसू येथील कातळशिल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या चित्रात मोठ्या दोन वाघांच्या प्रतिकृतींना एक लहान मानवी आकृती थोपवून धरत असल्याची ही रचना आहे. हेच चित्र विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे दिसते. याच चित्रातील मानवी आकृतीवर लज्जागौरीही स्पष्टपणे दिसते. ही रचना इजिप्तमधील कातळशिल्पांशी मिळतीजुळची आहे असे काही अभ्यासक मानतात. याशिवाय कोकणात इतर आठ ठिकाणी मोठ्या आकाराची कातळशिल्पे नोंदवण्यात आली आहेत. चौकोनी आकाराच्या भौमितिक संरचनेच्या भव्य कातळ शिल्परचना अन्यत्र कोठेही आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे कोकणातील कातळ शिल्पांचे महत्त्व अधिक आहे.