फॅशन जगतातील आघाडीचा स्पॅनिश ब्रँड ‘झारा’वर इस्रायलमध्ये बहिष्काराची मागणी केली जात आहे. या ब्रँडचे इस्रायलमधील फ्रेंचायझी धारक जोईल श्वेबेल यांनी उजव्या विचारसरणीचे राजकीय नेते इतमार बेन-ग्वीर यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित केल्यानंतर या ब्रँडच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनेक अरब, इस्रायली लोकांनी ट्विटरवर या ब्रँडचे कपडे जाळतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यामुळे #boycottzara हा हॅशटॅग सध्या इस्रायलमध्ये ट्रेंड होताना दिसत आहे.

‘झारा’विरोधी या आंदोलनात अरब बहुल असलेल्या राहा या शहराचे महापौर फायेझ अबू साहिबान सहभागी झाले आहेत. त्यांनी ‘झारा’ला ‘फॅसिस्ट’ असे संबोधले आहे, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिले आहे.

भारतात टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या ‘बिग बॉस’ची खरी सुरुवात नेदरलँड्समध्ये झाली होती; जाणून घ्या शोचा भन्नाट प्रवास!

‘झारा’वर बहिष्काराची मागणी कधीपासून होतेय?

कॅनडा आणि इस्रायलचे नागरिक असलेले जोईल श्वेबेल यांनी २० ऑक्टोबरला मध्य इस्रायलमधील रानाना शहरातील त्यांच्या निवासस्थानी इतमार बेन-ग्वीर यांचा पाहुणचार केला होता. या भेटीनंतरच इस्रायलमध्ये ‘झारा’विरोधातील आंदोलनाला सुरुवात झाली आहे. श्वेबेल ‘त्रिमेरा’ या ब्रँडचे अध्यक्ष असून ते इस्राईलमध्ये ‘झारा’चे फ्रँचायझी धारक आहेत. येत्या १ नोव्हेंबरला ‘नेसेट’च्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत इतमार बेन-ग्वीर यांच्या पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीनंतर इस्रायलमध्ये ‘झारा’वर बहिष्काराची मागणी वाढत आहे.

विश्लेषण: ‘ड्रोन’धारी युद्धनौकांचा वाढता वावर… इराण, इस्रायल आणि तुर्कस्तानच्या ड्रोनना वाढीव मागणी का?

इतमार बेन-ग्वीर कोण आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतमार हे ‘नेसेट’चे (इस्रायलचे विधीमंडळ) सदस्य असून ‘ओत्झ्मा येहुदीत’ या उजव्या विचारसरणीच्या आणि अरबविरोधी राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. इतमार यांच्याकडून इस्रायलमधून अरब नागरिकांना काढून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या नागरिकांचे नागरिकत्वही हिसकावून घेण्याचे त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात म्हटले आहे. त्यांच्या पक्षावर ‘नेसेट’मध्ये बंदीही घालण्यात होती. दरम्यान, या पक्षाला १९९४ मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शांती प्रक्रियेला १९९५ साली विरोध दर्शवल्यानंतर इतमार प्रसिद्ध झाले होते.

विश्लेषण : रशियाच्या उरात धडकी भरवणारा ‘डर्टी बॉम्ब’ नेमका आहे तरी काय?

पूर्व जेरुसेलम भागात पॅलेस्टिनी आणि ज्यू इस्रायली नागरिकांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान इतमार यांनी बंदुक काढल्यानंतर ते वादात सापडले आहेत. या घटनेदरम्यान अरब नागरिकांवर गोळीबार करण्याचे पोलिसांना आवाहन केल्यानंतर इतमार यांच्यावर इस्रायलमधील नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे.