Albert Einstein Brain महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची जगातील महान भौतिकशास्त्रज्ञांमध्ये गणना होते. ते लहानपणापासूनच खूप हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतामुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये क्रांतिकारक बदल झाला. १९२१ मध्ये आइन्स्टाईन यांना नोबेल पुरस्कारही मिळाला. असं म्हणतात की, जन्माच्या वेळी आइन्स्टाईन यांच्या डोक्याचा आकार जरा वेगळा होता; ज्यामुळे त्यांच्या आईला आपला मुलगा मतिमंद म्हणून तर जन्मला नाही ना, अशी भीती वाटत होती. पण, आज त्यांची बुद्धिमत्ता जगजाहीर आहे. प्रिन्स्टन रुग्णालयात आइन्स्टाईन यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, आइन्स्टाईनची कहाणी इथेच संपत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर एका रंजक कहाणीला सुरुवात झाली; जेव्हा त्यांच्या मेंदूची चोरी करण्यात आली. आइन्स्टाईन यांचा मेंदू कोणी आणि का चोरी केला? याबद्दल जाणून घेऊ.

१८ एप्रिल १९५५ ला प्रिन्स्टन हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा पॅथॉलॉजिस्ट थॉमस हार्वे यांनी त्यांच्या मेंदूची चोरी केली. विशेष म्हणजे आइन्स्टाईन यांना आपल्या शरीराचा अथवा मेंदूचा अभ्यास केला जाऊ शकतो, अशी शंका फार पूर्वीच होती. कदाचित यासाठीच त्यांनी असं काही करण्यास नकार दिला होता. ब्रायन बुरेल यांचं पुस्तक ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम ब्रेन म्युझियम’नुसार, आइन्स्टाईन यांनी आधीच असं लिहून ठेवलं होतं की, आपल्या अवशेषांशी छेडछाड केली जाऊ नये; अंत्यसंस्कारानंतर अस्थी गुप्तपणे नष्ट करण्यात याव्यात. कोणत्याही व्यक्तीची बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी त्याचा बुद्ध्यांक (आयक्यू) मोजला जातो. सामान्य माणसाचा आयक्यू हा १००च्या आसपास असतो. मात्र, असे म्हटले जाते की, अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा आयक्यू १६० होता. 

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
Ravi Kishan DNA test,
रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

आइन्स्टाईन यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडले?

रात्री १.१५ ला आइन्स्टाईन यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी ते जर्मन भाषेत बोलले. त्यांच्याजवळ असणार्‍या नर्सला जर्मन भाषेचं ज्ञान नसल्यानं आइन्स्टाईन नेमकं काय बोलले, हे तिला कळलं नाही. दुसर्‍या दिवशी न्यू जर्सीमधील ट्रेंटन येथे त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा मुलगा हॅन्स अल्बर्टला शवपेटीमधील आइन्स्टाईन यांच्या शरीराचे काही अवयव गायब असल्याचे लक्षात आले. ‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील एका लेखात असे म्हटले आहे, “ज्या मेंदूने सापेक्षतेचा सिद्धांत तयार केला, त्या मेंदूच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी मेंदू शरीरापासून वेगळा करण्यात आला होता.”

शवविच्छेदन करणारे पॅथॉलॉजिस्ट डॉ. थॉमस हार्वे यांनी आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी केली. मुख्य म्हणजे हार्वेनं या मेंदूचे तब्बल २४० तुकडे केले. बीबीसीच्या मते, पॅथॉलॉजिस्ट हार्वेनं या तुकड्यांचे १२ संच तयार केले; ज्यात ऊतीचे (टिशू)चे नमुने होते. एका संपादकानं स्टीव्हन लेव्ही नावाच्या त्याच्या रिपोर्टरला मेंदूचा शोध घेण्यासाठी पाठवलं. तेव्हा लेव्हीला असं कळलं की, हार्वेनं प्रिन्स्टन मेडिकल सेंटर सोडले आणि तो कॅन्ससमधील व्हिसिता येथे गेलाय. लेव्हीनं त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याचा पत्ता मिळाला.

“मी त्याला संदेश पाठवला आणि सांगितलं की, मी आइन्स्टाईनच्या मेंदूबद्दल एक कथा लिहीत आहे. परंतु त्यानं काहीही सांगण्यास नकार दिला,” असं लेव्हीनं ‘बीबीसी’ला सांगितलं. पण अखेरीस लेव्ही आणि हार्वेची भेट झाली, तेव्हा लेव्हीच्या असं लक्षात आलं की, हार्वेनं खरोखरच आइनस्टाईनच्या मेंदूचा अभ्यास केला होता. लेव्हीनं मेंदूचं चित्र मागवलं, तेव्हा हार्वेने त्याला बिअर कूलर (छोटा फ्रिज) दाखवला; ज्यात मेंदूचे तुकडे होते.

मेंदूचे २४० तुकडे का करण्यात आले?

हार्वेकडे मेंदूचा अभ्यास करण्याची क्षमता नव्हती. कारण- तो एक पॅथॉलॉजिस्ट होता. मात्र, त्याला आइन्स्टाईनला इतकी बुद्धी कशी? हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे त्यानं आइन्स्टाईनच्या मेंदूचे २४० तुकडे केले आणि ते रासायनिक सेलॉइडिनमध्ये ठेवले. हार्वे यानं त्याच्या इतर काही सहकार्‍यांसह मेंदूवर संशोधन सुरू ठेवलं. १९८५ मध्ये त्यांनी एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला; ज्यात आइन्स्टाईनच्या मेंदूचा पहिला अभ्यास प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासात असा दावा करण्यात आला की, आइन्स्टाईन यांचा मेंदू न्यूरॉन्स आणि ग्लिया या दोन पेशींच्या असामान्य गुणोत्तरानं तयार झाला होता.

हेही वाचा : भाजपाचा फॉर्म्युला ठरला; केंद्रीय मंत्री पशुपती पारस NDAतून बाहेर, पक्षाच्या अडचणी वाढणार?

परंतु, पेस विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक टेरेन्स हाइन्स यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी या अभ्यासाला निरर्थक असल्याचं सांगितलं. मेंदूचे वैज्ञानिक महत्त्व वादातीत असले तरी अनेक कथा, कादंबरी, कॉमिक बुक्समध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. हार्वेच्या कथेपासून प्रेरित झालेल्या निक पेने यानं इनकॉग्नेटो नावाचं एक नाटकही तयार केलं आहे.