अभिनेत्रीचं करियर हे लग्न, प्रेग्नन्सीनंतर संपतं अशी एक म्हण बॉलिवूडमध्ये प्रचलित आहे. आज बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी अनेक कलाकार येत असतात त्यातच प्रत्येकाला संधी मिळतेच असे नाही. अभिनेत्रींच्याबाबतीत आणखीनच अवघड प्रकार असतो. कारण एक वेळ ६० वर्षांचा अभिनेता हिरो म्हणून प्रेक्षकांना चालतो मात्र ४० अभिनेत्री हिरॉईन म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही. बॉलिवूडच्या आजवरच्या इतिहासात काही अभिनेत्रीचं करियर हे लग्नानंतर यशस्वी ठरलं आहे तर काहींनी लग्नानंतर बॉलिवूड चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे.

सध्या एकाच अभिनेत्रीची चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट, ६ नोव्हेंबरला तिने एका मुलीला जन्म दिला. तिने लवकर लग्न केले अशा समाजमाध्यमात चर्चा सुरु होत्या, आता आलिया काम करणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आलियाला सुरवातीला स्टार किड्सचा ठप्पा देण्यात आला होता मात्र काही काळातच तिने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. मुलीच्या जन्मानंतरदेखील ती काम करणार आहे. जोया अख्तरच्या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे. अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर करियरकडे फोकस न करता संसारात रमली आहे. तिच्यापाठोपाठ अनुष्का शर्मा, तिने एका मुलीला जन्म दिला आहे मात्र ती सध्या कंबर कसून तिच्या आगामी छकडा एक्सप्रेसचं चित्रीकरण करत आहे. करीना आज दोन मुलांची आई असली तरी ती चित्रपट करत आहे ती एक उत्तम उदाहरण आहे कतरीना आणि दीपिका या दोन्ही अभिनेत्रींनी लग्न केले असून त्यांनी लग्नानंतरदेखील आपले करियर सुरु ठेवले आहे. दीपिकाचा ‘गेहरिया’ या चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड सीन्सवरून बरीच चर्चा झाली होती. कतरीना गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. नुकताच तिचा ‘फ़ोनभूत’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
mai tumhe barbad kar dungi meme actress
लोकप्रिय गाणी व ‘राज’ सिनेमात इंटिमेट सीनमुळे राहिली चर्चेत; ‘या’ व्हायरल मीममधील अभिनेत्री अचानक गायब झाली अन्…
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

विश्लेषण: वरुण धवनला झालेल्या ‘वेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ आजाराचा सर्वाधिक धोका कुणाला? लक्षणे व उपचार जाणून घ्या

नव्व्दच दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित, काजोल, मनीषा कोईराला हिरॉईन म्हणून दिसत नसल्या तरी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतात. नव्वदच्या दशकातील या अभिनेत्रींनी लग्न संसार यातून वेळ काढून पुन्हा एकदा करियरकडे लक्ष दिले आहे. आई ही व्यक्तिरेखा साकारताना दिसून येतात. मनिषाने तर ‘संजू’ चित्रपटात रणबीरच्या आईची म्हणजे नर्गिस दत्त यांची भूमिका साकारली होती. मनीषाने लग्न केले होते मात्रनंतर तिने घटफोस्ट घेतला होता. नव्वदच्या दशकातील आणखीन एक अभिनेत्री जी त्याकाळात अनेकांची क्रश होती ती अभिनेत्री म्हणजे आयेशा जुल्का ‘हश हश’ या वेबसीरिजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ओटीटी या माध्यमामुळे या अभिनेत्रींना आपल्या अभिनयाचे कौशल्य, दर्जेदार भूमिकांसाठी एक हक्काचं माध्यम झालं आहे. रविना, जुही चावला या अभिनेत्रींनी ओटीटी माध्यमावर काम केले आहे. बॉलिवूडच्या धक धक गर्लनेदेखील लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती, मुलांच्या जन्मानंतर काही काळ तिने ब्रेक घेतला होता.

ज्या अभिनेत्रींनी लग्नकरून चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली आहे त्या अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर, मंदाकिनी तसेच जुन्या अभिनेत्रींनबद्दल बोलायचं झालं तर बबिता, सायरा बानू, मीनाक्षी शेषाद्री यांसारख्या अभिनेत्री लग्नानंतर संसारात रमल्या. कपूर खानदानातील करिष्मा कपूरदेखील अनेकवर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब आहे मात्र तिची धाकटी बहीण करीनामात्र लग्नानंतरदेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. विशेष म्हणजे आपल्या धाकट्या मुलाला घेऊन चित्रीकरणाला घेऊन जाताना दिसून येत आहे.

वूमन्स वेबच्या म्हणण्यानुसार, पूर्वी असा समज होता की अभिनेत्रींचे ३०, ४० वय झाले की त्यांचे करियर संपून जाते मात्र त्याउलट अभिनेत्यांच्याबाबतीत हे घडत नाही, मात्र आजकालच्या अभिनेत्रींनी हे समीकरण मोडले आहे. अनुष्कापासून ते विद्या बालन या अभिनेत्रींनी लग्नानंतरदेखील आपले करियर सुरु ठेवले आहे. ही मानसिकता जर आधीच्या अभिनेत्रींनी ठेवली असती तर नक्कीच त्यांनी आज बॉलिवूडमध्ये त्या कार्यरत असत्या.

विश्लेषण: काँग्रेस, ‘भारत जोडो’ यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश; ‘KGF 2’मुळे अडचणीत, काय आहे प्रकरण?

आजची स्त्री ही स्वतंत्र आहे. आज करियरसाठी मुली परदेशात जात आहे. सामान्य घरातील स्त्रियादेखील लग्नानंतर नोकरी करून संसार आपलं करियर करत आहेत. शेवटी काय प्रत्येकाचे आपल्या आयुष्याबद्दलचे असे काही नियम ठरवलेले असतात. करिनानेदेखील एका मुलाखतीत सांगितले होते की “मला लग्नानंतर माझी पहिली प्रायोरिटी माझा संसार आहे आणि त्यानंतर चित्रपट,” प्रेगन्सीनंतरदेखील करियर होऊ शकतं हे या अभिनेत्रींनी दाखवलं आहे. त्यामुळे एकूणच करियर, संसार या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे एक तारेवरची कसरतच असते.