जागतिक सिनेमांचे आज जगभरात चाहते आहेत. चित्रपट उद्योग हा असा एक उद्योग आहे जो जगभरातील जवळपास प्रत्येक देशात आहे. आज ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला कोरियन, इस्रायली चित्रपट पाहता येतात. आपल्या सख्ख्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये चित्रपटसृष्टी कार्यरत आहे. सध्या जगभरात याच पाकिस्तानमधील एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ , आता हाच चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे, मात्र यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. मात्र आता चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’?

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

फवाद खान अभिनीत पंजाबी भाषेतील पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ भारतात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. INOX Leisure Ltd चे मुख्य प्रोग्रॅमिंग ऑफिसर राजेंद्र सिंग ग्याला यांनी सांगितले की हा चित्रपट “पंजाब आणि दिल्लीतील काही चित्रपटगृहात INOX मध्ये चालवला जाईल जिथे पंजाबी भाषिक लोक आहेत.”

विश्लेषण : दाढी, पगडीसह शिखांना मरीन कॉर्प्समध्ये घेण्याचे अमेरिकन न्यायालयाचे आदेश ; तीन तरुणांमुळे बदलला नियम

बिलाल लाशारी यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला, अॅक्शन ड्रामा चित्रपटाने जगभरात राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला मागे टाकले आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा पाकिस्तानी चित्रपट आहे. हा चित्रपट १९७९ साली आलेल्या ‘मौला जट’ नावाच्या चित्रपटावर बेतलेला आहे मात्र हा रिमेक नाही असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. हमजा अली अब्बासी, हुमैमा मलिक आणि माहिरा खान यांच्याही भूमिका असलेल्या, या चित्रपटात फवाद खान मौला जट्टच्या भूमिकेत आहे एक लोकनायक दाखवला आहे जो त्याचा मुख्य शत्रू नूरी नट (हमजा अली अब्बासी) विरुद्ध सूड उगवू इच्छितो. हा चित्रपट ३० डिसेंबरपासून झी स्टुडिओ द्वारे प्रदर्शित होणार आहे. नुकतंच दुबई येथे झालेल्या ‘रेड सी फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचं बरंच कौतुक झालं. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनेही याच फेस्टिव्हलमध्ये बोलताना या चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.

मनसेने केला विरोध :

हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार अशी चर्चा जेव्हा सुरु होती तेव्हाच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीटरवरून याचा निषेध केला होता. आम्ही हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही असे त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले होते.

शेवटचा प्रदर्शित झालेला पाकिस्तानी चित्रपट :

भारतात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला शेवटचा पाकिस्तानी चित्रपट २०११ मध्ये माहिरा भिनीत ‘बोल’ होता. त्याआधी २००८ मध्ये नंदिता दास आणि रशीद फारुकी अभिनीत ‘रामचंद’ पाकिस्तानी चित्रपट होता. ‘खुदा के लिए’, ज्यामध्ये फवाद नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. .

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी :

फवाद खान, अली जाफर, माहिरा खान, आतिफ असलम हे पाकिस्तानातील प्रसिद्ध कलाकार, २०१९ साली झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे.