अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाडयन यांना गुरुवारी करोनाची लागण झाली. जो बायडन यांना काही सौम्य लक्षणं जाणवू लागली होती. यानंतर त्यांनी पूर्वकाळजी म्हणून पॅक्सलोविड (Paxlovid) ही अँटीव्हायरल गोळी घेण्यास सुरुवात केली. जो बायडन कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आतापर्यंत यासंबंधी काय माहिती आहे जाणून घ्या…

जो बायडन यांची प्रकृती सध्या कशी आहे?

राष्ट्राध्यक्षांचे डॉक्टर केविन ओ कॉनोर यांच्या माहितीनुसार, जो बायडन यांना सर्दी आणि कोरडा खोकला असून थकवाही जाणवत आहे. “बुधवारी संध्याकाळी त्यांना थकल्यासारखं जाणवत होतं. ते व्यवस्थित झोपू शकले नाहीत,” असं व्हाईट हाऊमधील कोविड समन्वयक डॉक्टर आशिष झा यांनी सांगितलं आहे. बायडन यांनी गुरुवारी ट्वीट करत, आपण ठीक असल्याचं सांगत काळजी करणाऱ्यांचे आभार मानले.

President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

जो बायडन यांनी कोणती करोना चाचणी केली?

जो बायडन यांची नियमित करोना चाचणी करण्यात आली. अँटिजन चाचणी करण्यात आली असता सर्वप्रथम संसर्ग झाल्याचं समोर आलं. अमेरिकेत अनेक नागरिक घरामध्ये अँटिजन चाचणी केली जाते. पीसीआर चाचणीनंतर याची पुष्टी झाली असं राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांनी सांगितलं. मंगळवारी जो बायडन यांची शेवटची कोविड चाचणी झाली होती. यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

जो बायडन यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे का ?

जो बायडन यांचं लसीकरण झालेलं असून दोन वेळा बूस्टर डोसही घेतला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी बायडन यांनी फायझर लसीचे दोन डोस घेतले होते. यानंतर सप्टेंबरमध्ये पहिला आणि ३० मार्चला दुसरा बुस्टर डोस घेण्यात आला.

जो बायडन यांच्यावर उपचार सुरु आहेत का?

जो बायडन सध्या देशात गतवर्षी अधिकृत मान्यता देण्यात आलेली पॅक्सलोविड गोळी घेत आहेत. पॅक्सलोविडमुळे वयस्कर किंवा जास्त धोका असणाऱ्या रुग्णांचा रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका कमी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. करोनाची लक्षणं जाणवू लागल्यानंतर पाच दिवसांच्या आत ही गोळी घेतल्यास फायदा होतो.

राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, लसीकरण झालं असल्याने आणि पॅक्सलोविडच्या सहाय्याने केलेल्या तात्काळ उपचारांमुळे त्यांना धोका नाही. बायडन यांनी पॅक्सलोव्हिडचं सेवन करणाऱ्यांसाठी शिफारस केल्यानुसार इतरं औषध घेणं तात्पुरतं थांबवलं आहे.

जो बायडन विलगीकरणात जाणार आहेत का?

व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, जो बायडन चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत विलगीकरणात असणार आहेत. किमान पाच दिवस ते विलगीकरणात असतील. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते प्रत्यक्ष कामावर परततील.

करोना वयस्कर लोकांवर काय परिणाम करतो?

जो बायडन सध्या ७९ वर्षांचे असून, ते जास्त जोखीम असणाऱ्या गटात आहेत. १० पैकी ८ मृत्यू हे ६५ पेक्षा जास्त वयोगटातील असतात. वयोमानानुसार जोखीमदेखील वाढते, तसंच मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आरोग्याच्या समस्या असणारे सर्वाधिक असुरक्षित असतात.

जो बायडन यांनी बीए.५ उपप्रकाराचा संसर्ग झाला आहे का?

जो बायडन यांना नेमक्या कोणत्या उपप्रकाराचा संसर्ग झाला आहे याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. यासाठी नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अमेरिकेसह जगभरात ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए.५ या उपप्रकाराचा जास्त प्रभाव आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेत नोंदवण्यात आलेल्या रुग्णांमधील बरेच जण या उपप्रकारातील होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बीए.५ सर्वाधिक संसर्गजन्य उपप्रकार आहे, मात्र मागील ओमायक्रॉन उपप्रकारांच्या तुलनेत त्याची तीव्रता वाढलेली नाही.

जोय बायडन यांना करोनाची लागण कुठे झाली?

जो बायडन यांना करोनाची लागण होण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. करोनाच्या संपर्कात आल्यानंतर दोन दिवस ते दोन आठवड्यापर्यंत कधीही लक्षणं जाणवू शकतात. जो बायडन अलीकडेच प्रवासात व्यस्त होते. मिडल ईस्टच्या दौऱ्यावर असताना जो बायडन हस्तांदोलन करताना, गळाभेट घेताना दिसत होते. शनिवारी रात्री वॉशिंग्टनला परतल्यानंतर तीन दिवस बायडन जास्त कार्यक्रमांमध्ये सहभागी नव्हते. यानंतर काही मोजक्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले होते.