करोना काळानंतर बॉलिवूड कलाकार आता कंबर कसून कामाला लागले आहेत. दोन वर्ष चित्रपटसृष्टी ठप्प होती. अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट रखडले होते. चित्रपटगृह चालू झाल्यानंतरदेखील बॉलिवूडचे चित्रपट फारसे चालत नाहीयेत. अशातच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने एक मोठी घोषणा केली आहे. आमिरने कामातून आता दीड वर्षांसाठी ब्रेक घेतला आहे. दिल्लीमध्ये मित्रांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली आहे. तो म्हणाला “गेली ३५ वर्ष मी काम करतो आहे आता मला माझ्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवायचा आहे.” कलाकारांच्या या ब्रेकला hiatus ( काही काळ या झगमगत्या दुनियेपासून लांब राहणे) म्हणतात.

बॉलिवूडचे कलाकार कायम नेटकरी, चाहते आणि माध्यमांच्या रडारवर असतात. यामुळे कलाकारांचे खासगी आयुष्य सार्वजनिक होऊन जाते. मग ते व्यायामशाळेतूनघरी जाताना किंवा एखाद्या हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात आणि ट्रोलदेखील होतात. या सगळ्या गोष्टींचा कधी कधी कंटाळा येतो म्हणून कलाकार असे हायट्स (hiatus) चे निर्णय घेतात. काही वेळा कलाकार प्रचंड तणावात असतात, सतत काम, परिश्रम यामुळे शरीर थकून जाते म्हणूनच प्रसिद्धीपासून काही काळ दूर जाऊन खासगी आयुष्य, आपले कुटुंबिय यांच्याबरोबर त्यांना वेळ घालवायचा असतो.

विश्लेषण : काजोलच्या ‘सलाम वेंकी’मध्ये दाखवलेला, प्रामुख्याने पुरुषांनाच होणारा ‘ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी’ कशामुळे होतो?

बॉलिवूडमध्ये या संकल्पनेची विशेष चर्चा नाही मात्र हॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या करियरमध्ये ब्रेक घेतला आहे. ‘जेनिफर लॉरेन्स’, ‘इव्हा मेंडिस’, ‘डेव्ह चॅपेल’, ‘ब्रिटनी स्पीयर्स’, ‘रॉबर्ट डाउनी जूनियर’ यांसारख्या कलाकारांनी आपल्या कामातून ब्रेक घेतला होता. ज्या पद्धतीने आपल्याकडील कलाकार सोशल मीडियापासून लांब जातात त्याचपद्धतीने हॉलिवूडचे ‘सेलेना गोमेझ’, ‘किम कार्दशियन’ आणि ‘सारा हायलँड’ या कलाकारांनी सोशल मीडियापासून काही काळ लांब होते.

कोरियायातील प्रसिद्ध बँड BTS यांनीदेखील काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. आज या बँडचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे साहजिकच ते नाराज झाले आहेत. BTS सारख्या बँडने ब्रेक घेण्यामागचं कारण म्हणजे या यातील कलाकार सध्या वैयक्तिक कामांवर लक्ष देत आहेत. या बँडचे जर विघटन झाले तर देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

आज वाढते कामाचे तास, टार्गेट्स यात प्रत्येकजण सध्या अडकला आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात जरी काम करत असलो तरी कधी कधी त्याचादेखील कंटाळा येतो. म्हणूनच लोक सध्या निसर्गाच्या सहवासात जात आहेत. विकेंड संस्कृती वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकजण शनिवार रविवारची वाट बघत असतात. या ब्रेक्समध्ये आपण स्वतःला जास्त ओळखू शकतो. आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवू शकतो. काहीतरी नवं करण्यासाठी असे ब्रेक घेतले जातात. आमिरचा हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे या फंद्यात न पडण्यापेक्षा प्रत्येक माणसाने असा थोडावेळ आपल्या आयुष्यातून काढला पाहिजे. कित्येक वेळा कामाच्या व्यापातून कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळे कुटुंबियांपासून दूर जातो. त्यामुळे वेळीच आपण थोडावेळ थांबायला हवे. आज मुळातच मनोरंजन क्षेत्र हे बेभरवशी मानले जाते. आज काम आहे तर उद्या नाही अशा परिस्थितीत कलाकार ब्रेक्स घेत असतात. आज अमिताभ बच्चनसारखे कलाकार वयाच्या ८० वर्षीदेखील तरुणांना लाजवेल असे काम करत आहेत. आमिर खानच्या बरोबरीचे कलाकार सध्या त्यांच्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत.

विश्लेषण: सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय? ते नेमकं काम कसं करतं? चित्रपट सेन्सॉर्ड होतो म्हणजे काय?

आमिरची कारकीर्द :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर मुळातच खानदानी कुटुंबातला आहे. त्याचे आजोबा, काका हे चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. आमिरने यादो की बारात या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. मोठेपणी आपल्या काकांनाबरोबर नासिर हुसेन यांच्याबरोबर तो काम करत होता. कयामत से कयामत चित्रपटातून त्याला वेगळी ओळख मिळाली. पुढे ‘जो जिता हवी सिकंदर’, ‘अंदाज अपना अपना’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘गुलाम’ , ‘लगान’ ते ‘लाल सिंग चड्ढा’सारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट त्याने केले आहेत. त्याची स्वतःची निर्मिती संस्था आहे तसेच तो दिग्दर्शकदेखील आहे . त्याचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असते.