आपण महिला किंवा पुरुष मंडळींकडून नात्याचा वीट आला, असे अनेकदा ऐकले असेल. मला सगळं मागे सोडून डोंगरावर रहायला जावसं वाटतंय, असंदेखील काही पुरुष सर्रास म्हणतात. अशा प्रकारचे विचार मनात येणे म्हणजे हेटरोपेसिमिझमची लक्षणे असू शकतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान होणार का? वाचा…

हेटरोपेसिमिझम म्हणजे काय?

अमेरिकन अभ्यासक आसा सेरसिन यांनी हेटरोपेसिमिझम म्हणजे काय याबाबत सांगितले आहे. यामध्ये भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल निराशा निर्माण होते. नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये हेटरोपेसिमिझम जास्त प्रमाणात आढळते. ही निराशा पशात्ताप, लाजिरवाणे तसेच निराशेच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. नात्यात जोडीदार हेटरोपेसिमिझम अनुभवतोय म्हणजे तो नात्याशी प्रामाणिक नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. फक्त भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल (जोडीदाराबद्दल) निराशा निर्माण होणे, असा हेटरोपेसिमिझमचा साधा अर्थ आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: मुंबईच्या किनाऱ्यावर पुन्हा आलाय विषारी ‘ब्लू बॉटल’! कोणती खबरदारी घ्यावी?

हेटरोपेसिमिझमला काही कारणं आणि परिणाम आहेत. हेटरोपेसिमिझमची उदाहरणं आपल्यासमोर रोजच येतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयात वैवाहिक बलात्काराशी संबंधित याचिकेवर सुनावणी घेत असताना ट्विटरवर #MarriageStrike हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर होता. यातून भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलची निराशा जाणवते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मंकीपॉक्सपासून मारबर्गपर्यंत’… करोनापेक्षाही भयंकर असलेल्या ‘या’ विषाणूंनी घातलयं जगात थैमान

उदारमतवादी तसेच अमेरिकन लोकांकडून आपल्या जोडीदाराबद्दलच्या निराशेबाबत बोलले जाते. क्वीर कम्युनिटीचा अभ्यास करताना ज्या दृष्टीने पाहिले जाते, त्या दृष्टीने पुरुष किंवा स्त्रियांच्या अनुभवांकडे बघितले जात नाही. याऊलट जोडीदाराबद्दलच्या असमाधानाकडे आपल्याकडे विनोदबुद्धीने पाहिले जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण: स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत?

हेटरोपेसिमिझमची कारणे काय आहेत?

हेटरोपेसिमिझमची सामाजिक, आर्थिक तसेच काही राजकीय कारणे आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार लग्न म्हणजे गृहिणी आणि जबाबदारी असणारा पुरुष यांच्यातील नाते अशी विभागणी केली जाते. मात्र आता महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत. महिला आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम झालेल्या असल्या तरी अद्याप सांस्कृतिकदृष्या मागासलेपणा जाणवतो. याच कारणामुळे राजबिंडा जोडीदार असावा असा विचार तरुणी करायला लागतात. तर माझी बायको ही घरातील कामे मोठ्या शिताफीने करणारी असावी असा विचार तरुण करायला लागतात. परिणामी लग्नानंतर तरुणींचा भ्रमनिरास होतो. पुढे त्या चिडचिड करायला लागातात. तर तरुण पुढे रागीट होतात. त्यांनाअस्वस्थ व्हायला लागतं. परिणामी नवरा बायकोशी आणि बायको नवऱ्याबाबत असमाधान व्यक्त करायला लागतात. म्हणजेच जोडीदारांमध्ये हेटरोपेसिमिझमची लक्षणं दिसायला लागतात.

हेही वाचा >>> विश्लेषण: काँग्रेसच्या फुटीर आमदारांना पक्षाचेच अभय! काय घडले राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत?

हेटरोपेसिमिझमला बळी पडण्याचे धोके काय आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेटरोपेसिमिझममध्ये अनेक वेळा नकार आणि औदासिन्याचे प्रकार घडतात. यावर उपाय शोधण्याऐवजी भिन्न लिंगावर भाष्य करणारे विनोद, मीम्स यांच्या मदतीने आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. हेटरोपेसिमिझमबद्दल जोडीदाराशी वेळीच चर्चा करणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनातील असमानता, दुराचार, कौटुंबिक हिंसा अशा समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. दी न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार २०१९ साली गोळीबार करणाऱ्या आरोपींमध्ये महिलांविषयीचा तिरस्कार, पत्नीचा छळ करणे, प्रेमिका तसेच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करणे, सोशल मीडियावर महिलांविषयी तिरस्करणीय पोस्ट करणे, अशी समान लक्षणं दिसून आली होती. वैवाहिक जीवनामध्ये गोडी निर्माण करायची असेल तसेच नात्यात समानता, सुरक्षितता निर्माण करायची असेल, तर संवाद करणे गरजेचे आहे. ज्यामुळे हेटरोपेसिमिझम म्हणजेच जोरीदाराविषयीची निराशा टाळता येऊ शकते.