अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यात ओसामा बिन लादेनला मदत करणारा दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी ठार झाला आहे. अमेरिकेने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ड्रोन हल्ला करत अल जवाहिरीचा खात्म केला. ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या अल जवाहिरीने अल-कायदाचं अस्तित्व कायम राहील आणि त्याची पाळेमुळे जगभरात पसरतील यासाठी प्रयत्न केले होते. महत्वाचं म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तामधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर ११ महिन्यातच ही कारवाई करत मोठं यश मिळवलं आहे.

९/११ हल्ल्यानंतर तब्बल २१ वर्षांपासून अमेरिका अल जवाहिरीचा शोध घेत होती. अमेरिकेवर झालेल्या या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेची स्थिती आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यात फार मोठा बदल झाला होता. यानिमित्ताने अल जवाहिरी नेमका कोण होता हे जाणून घेऊयात…

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
mumbai crime news, person pistol catridges mumbai marathi news, mumbai crime marathi news
मुंबई : पिस्तूल, जिवंत काडतुसांसह सराईत आरोपीला अटक, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल
Mohammed Shami's social media post after surgery
Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

अल जवाहिरी कोण होता?

९/११ हल्ल्याचे साक्षीदार असणारे किंवा झळ बसलेल्या अमेरिकी नागरिकांना हे नाव माहिती नसावं, मात्र त्याचा चेहरा गेल्या दोन दशकांपासून ते पाहत आहेत. अमेरिकेवर झालेल्या हल्ल्ल्यानंतर वारंवार दाखवण्यात आलेल्या फोटोत चष्मा घातलेला आणि चेहऱ्यावर हास्य असणारा अल जवाहिरी ओसामा बिन लादेनच्या शेजारी बसलेला दिसतो.

मूळचा इजिप्तचा असणाऱ्या अल जवाहिरीचा जन्म १९ जून १९५१ मध्ये कैरो उपनगरातील एका कुटुंबात झाला होता. अल जवाहिरी लहानपणासूनच फार धार्मिक होता. इस्लामिक शासनाचा संदर्भ देत इजिप्त आणि इतर अरब राष्ट्रांमधील सरकारं बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुन्नी इस्लामिक पुनरुज्जीवनाच्या शाखेत अल जवाहिरी सहभागी झाला होता.

अल जवाहिरीने तरुणपणी नेत्रचिकित्सक म्हणून काम केलं होतं. त्याने मध्य आशिया आणि मध्य पूर्व भागांचा दौरा केला होता, जिथे त्याने अफगाणिस्तानचं सोव्हिएतविरोधातील युद्ध पाहिलं. सोव्हिएत सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अफगाणिस्तानला मदत करण्याच्या हेतूने त्याने ओसामा बिन लादेन आणि इतर अरब दहशतवाद्यांची भेट घेतली होती.

१९८१ मध्ये इस्लामिक कट्टरतावाद्यांनी अध्यक्ष अन्वर सादात यांची हत्या केल्यानंतर इजिप्तमध्ये अटक करुन तुरुंगात छळ झालेल्या शेकडो अतिरेक्यांमध्ये अल जवाहिरीचाही समावेश होता. तुरुंगामधील या अनुभवाने त्याला अजून कट्टरता दिली असं चरित्रकार सांगतात. सात वर्षांनी जेव्हा, लादेनने अल-कायदाची स्थापन केली तेव्हा अल जवाहिरी तिथे उपस्थित होता.

अल जवाहिरीने आपला इजिप्तमधील दहशतवादी गट अल-कायदामध्ये विलीन केला होता. इजिप्तमध्ये अंडरग्राऊंड राहून आणि गुप्तचर यंत्रणांना चकवा देत अल जवाहिरीने अल-कायदाला संघटनात्मक कौशल्य आणि अनुभव दिले. यामुळे अल कायदाला त्यांचे वेगवेगळे गट निर्माण करून जगभरात हल्ले करता आले.

अल जवाहिरी इतका महत्त्वाचा का होता?

अल जवाहिरीने ९/११ हल्ल्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांना एकत्र आणलं होतं. योजना आखण्याचं आणि निधी जमावण्याचं कामही त्याच्याकडे होतं. ९/११ नंतर आणखी एक हल्ला करण्यासाठी त्याने संघटनेला कोणतंही नुकसान होणार नाही याची खात्री केली होती.

९/११ हल्ल्यानंतर फरार झालेल्या अल जवाहिरीने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर अल कायदाचं नेतृत्व नव्याने उभं केलं होतं. इराक, आशिया, येमेन आणि इतर ठिकाणी अल जवाहिरी सर्वोच्च नेता होता. ९/११ नंतरही अल-कायदाने जवळच्या आणि दूरच्या शत्रूंना लक्ष्य करत बाली, मोम्बासा, रियाध, जकारता, इस्तंबूल, लंडन यासह इतर ठिकाणी अनेक हल्ले केले.

२००५ मध्ये लंडनमध्ये झालेल्या हल्ल्यात ५२ लोक मारले गेले होते. अल-कायदाने केलेला हा पश्चिमेकडील शेवटचा हल्ला होता. कारण अमेरिकेसह इतरांनी केलेले ड्रोन हल्ले, दहशतवादविरोधी छापेमारी आणि क्षेपणास्त्रं यामुळे अल-कायदाशी संबंधित अनेक दहशतवादी मारले गेले होते, आणि त्यांचं नेटवर्कही उद्ध्वस्त झालं होतं.

अल जवाहिरीला ठार कसं करण्यात आलं?

रविवारी पहाटेच्या वेळी अल जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील घऱाच्या बाल्कनीत आला होता. अल जवाहिरी रोज बाल्कनीत येत असल्याचं आणि काही वेळ तिथेच थांबत असल्याचं अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आलं होतं. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, अल जवाहिरी बाल्कनीत उभा असताना ड्रोनच्या सहाय्याने दोन हेलफायर मिसाइल्सने हल्ला करण्यात आला.

अल जवाहिरी गेल्या काही काळापासून अफगाणिस्तामध्ये असल्याचा संशय होता. अल जवाहिरीची पत्नी आणि इतर कुटुंबीय काबूलमधील सुरक्षित घरात राहण्यासाठी गेल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर अल जवाहिरीही तिथे गेला होता. बायडन यांनी २५ जुलैला या हल्ल्यासाठी संमती दिली होती. घरामध्ये जवाहिरीचं कुटुंबदेखील होतं. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

बायडन यांनी व्यक्त केली न्याय मिळाल्याची भावना

जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. “कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार,” असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे.