राज्यात सध्या शिवसेना नेमकी कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. त्यातच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाने विश्वासमताच्या विरोधात मतदान करणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेच्या १४ आमदारांविरोधात कारवाई सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं आहे. काय आहे यामागील कारण? जाणून घ्या

१५ आमदारांनी विरोधात केलं मतदान

राहुल नार्वेकर यांनी रविवारी विधानसभाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची, तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. त्यानंतर सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला. यावेळी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश (व्हिप) भरत गोगावले यांनी काढला होता. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उरलेल्या १६ पैकी आणखी एक आमदार संतोष बांगर हे रविवारी रात्री शिंदेगटात दाखल झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदारच उरले होते.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

‘आदित्य ठाकरेंना नोटीस नाही’

विश्वासदर्शक ठरावावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, राजन साळवी, वैभव नाईक आदी १५ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान केलं. विश्वासदर्शक ठरावात शिंदे सरकारला १६४ मतं मिळाली, तर महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश झुगारून शिंदे सरकारच्या विरोधात मतदान केल्याबद्दल शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र यामधून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं.

आदित्य ठाकरेंचं नाव का वगळण्यात आलं?

ज्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली त्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव नसल्याने चर्चा रंगली होती. यामागे नेमकं काय कारण आहे याबद्दल भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले की, “बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही”. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात निर्णय घेतील असंही स्पष्ट केलं.

भरत गोगावले यांनी यावेळी नोटीस देणयात आलेल्या १४ आमदारांनी योग्य उत्तर न दिल्यास त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात करण्यात येईल असंही सांगितलं आहे.