युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यात असंख्य भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. वाढत्या लष्करी संकटादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेले, अनेकजण वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तेथे गेले होते. या वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये हरियाणा आणि पंजाबमधील अनेक विद्यार्थी आहेत.

युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत. जालंधर येथील डॉ. अश्वनी शर्मा यांची दोन मुले एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये युक्रेनला गेली होती. ते म्हणाले की त्यांच्या मुलांप्रमाणे पंजाबसह भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर येथे अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी विविध माध्यमातून भारत सरकारकडे विनंती करत आहेत. भारताय विद्यार्थ्यांपैकी सरासरी ८० टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले असल्याची माहिती तेथील काही विद्यार्थ्यांनी दिली. भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थांमध्ये चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला किमान ५० लाखांहून अधिकचा खर्च येतो. (शिष्यवृत्तीधारक नसल्यास) तर युक्रेनमध्ये हीच पदवी घेण्यासाठी अर्धा म्हणजे २५ लाखांपर्यंतचा खर्च लागतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बेताची असते, ते अशा देशांमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यास पसंती देत असल्याचे शिक्षणतज्ज्ञ पाणिनी तेलंग यांनी सांगितले.

जालंधर येथील शिक्षण सल्लागाराने माहिती दिली की पंजाबमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी आता युक्रेनमधील एमबीबीएस अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत कारण तेथे भारतासारखी स्पर्धा नाही.

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी युक्रेनला प्राधान्य का दिले जाते?

भारतातील महागडी शिक्षण पद्धती, जागांची कमतरता आणि आरक्षित जागा यासारख्या कारणांमुळे भारतातील बहुतांश विद्यार्थी रशिया, युक्रेन, चीन आणि फिलिपाईन्ससारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य देतात असे शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची बाब समोर आल्याने भारतीय विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षणाला अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे

युक्रेनमधील एमबीबीएस पदवी भारतीय वैद्यकीय परिषद, जागतिक आरोग्य परिषद, युरोप, ब्रिटन इत्यादींसह सर्वत्र मान्यताप्राप्त आहे. तसेच ती कमी खर्चिक आहे, असे डॉ. शर्मा म्हणाले.

युक्रेनमध्ये भारतापेक्षा अर्ध्या खर्चात वैद्यकीय शिक्षण

“भारतात या साडेचार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला १० ते १२ लाख रुपये वार्षिक शुल्क लागते आणि कोणत्याही खाजगी महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करावे लागतात. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. तसेच दरवर्षी दोन लाख रुपये शुक्ल भरावे लागतात असे,” आणखी एका डॉक्टरांनी म्हटले आहे.

युक्रेनमध्ये, एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी वार्षिक शुल्क ४ ते ५ लाख रुपये आहे, जे पंजाबच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्काच्या तुलनेत सुमारे तीन पट कमी आहे, असे  किव्हमध्ये अडकलेल्या जालंधरमधील एका विद्यार्थ्याने सांगितले.

पंजाबमध्ये फक्त चार सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि उर्वरित अर्धा डझन खाजगी आहेत जिथे सरकारी महाविद्यालयांच्या तुलनेत शुल्क सहा पट आहे, असे पंजाबमधील फरीदकोट येथील बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

युक्रेनमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे सोपे आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस फरीदकोटचे कुलगुरू राज बहादूर यांच्या म्हणण्यानुसार, जे विद्यार्थी येथे प्रवेश घेऊ शकत नाहीत ते एमबीबीएस अभ्यासक्रम करण्यासाठी युक्रेनला जाणे पसंत करतात. भारतात तुम्हाला राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) जास्त टक्केवारीसह उत्तीर्ण करणे आवश्यक असते कारण देशात यासाठी मोठी स्पर्धा आहे.

सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट आयोजित केली जाते आणि परदेशात अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता परीक्षाचे अनिवार्य आहे.

युक्रेनमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त नीट पात्र होणे आवश्यक आहे कारण तिथे जास्त गुणांचे कोणतेही निकष नाहीत.