केंद्र सरकारने सर्व दुर्मीळ आजारांवर उपचारासाठी लागणारी आणि परदेशातून मागवली जाणारी खासगी औषधे, गोळ्या यांवरील सीमा शुल्क माफ केले आहे. दुर्मीळ आजारांवरील राष्ट्रीय धोरण २०२१ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरील उचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमॅब (Pembrolizumab, Keytruda) या औषधावरील सीमा शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता दुर्मीळ आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काय निर्णय घेतला आहे? या निर्णयामुळे नेमका काय फायदा होणार आहे? हे जाणून घेऊ या.

हेही वाचा >> विश्लेषण : रामानं नाही, लक्ष्मणानं केला रावणाचा वध – जैन रामायण Ramnavmi 2023

सीम शुल्क रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार शशी थरूर यांनी २८ मार्च रोजी दुर्मीळ आजारांवरील औषधांवर आकारल्या जाणाऱ्या सीमा शुल्काचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी एका दाम्पत्याचे उदाहरण दिले होते. या दाम्पत्याच्या मुलीला एक दुर्मीळ आजार होता. या आजारावरील औषधे परदेशातून आयात करण्यात येत होती. त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी सीमा शुल्क भरावे लागायचे. त्यांना करामुळे जास्तीचे ७ लाख रुपये द्यावे लागायचे. त्यामुळे थरूर यांनी अर्थमंत्री नीर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे ही अडचण सांगितली होती. १५ मार्च रोजी थरूर यांनी हे पत्र लिहिले होते. मात्र नीर्मला सीताराम यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा थरूर यांनी केला होता.

हेही वाचा >> विश्लेषण: ७ सुदानी तस्कर, ३ देश, ५३ कोटींचे सोने..! काय होते ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’?

शशी थरूर यांनी केला होता अर्थमंत्री सीतारामन यांना फोन

त्यानंतर हे दाम्पत्य पुन्हा एकदा २६ मार्च रोजी थरूर यांच्याकडे गेले. तसेच सीमा शुल्क रद्द करावे अशी मागणी केली. या वेळी थरूर यांनी नीर्मला सीतारामन यांना प्रत्यक्ष फोन करून ही अडचण सांगितली. पुढे या प्रकरणाची दखल घेत सीतारामन यांनी अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षांशी बातचीत केली. त्यानंतर या दाम्पत्याला सीमा शुक्ल न देता त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी लागणारी औषधे मिळाली. आता केंद्र सरकारने सर्व दुर्मीळ आजारांवरील औषधे, गोळ्या तसेच या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारे अन्न यावरील सीमा शुल्क माफ केले आहे.

हेही वाचा >> G-Pay, PayTM, PhonePe ॲपवरील व्यवहारांना अतिरिक्त ‘चार्ज’ लागणार?

सरकारच्या नव्या निर्णयात काय आहे?

“या आधीच स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी आणि ड्यूशेन मस्क्युलर अट्रॉफी या आजारांवरील औषधांवर सीमा शुल्क आकारले जात नाही. मात्र मागील काही दिवसांपासून दुर्मिळ आजारांसाठीच्या औषधांवरील सीमा शुक्ल माफ केले जावे, अशी मागणी केली जात होती. दुर्मीळ आजारावरील उपचारासाठीचे औषध तसेच लागणारे विशेष अन्न आयात केले जाते. त्यामुळे ते खूप महागडे असते. एका १० किलो वजनाच्या छोट्या मुलावर उपचार करायचे असल्यास उपचारासाठी प्रत्येक वर्षी साधारणत: दहा लाख ते एक कोटी रुपये लागतात. त्यामुळे नव्याने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे उपचार स्वस्त होण्यास मदत होईल,” असे या परिपत्रकात म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >> ट्विटरमध्ये १५ एप्रिलपासून मोठे बदल; फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच मिळणार विशिष्ट लाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या औषधांवर काय कर आकारला जातो?

औषधे आणि गोळ्यांवर १० टक्के सीमा शुल्क आकारले जाते. तर काही जीवनरक्षक औषधांवर हा कर पाच टक्के आहे. काही औषधांवर कर आकारला जात नाही. जीएसटी परिषदेच्या २०२१ साली सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या बैठकीत जीवनरक्षक औषधांवरील कर कमी करण्यात आला होता. स्पाइनल मस्क्युलर अट्रॉफी आजरावर उपचारासाठी लागणारे झोल्गेन्स्मा (Zolgensma) आणि व्हिल्टेप्सो (Viltepso) या औषधांवरील सीम शुल्क माफ करण्यात आले होते.