भारतात आरोग्याच्या दृष्टीने हळदीचे खूप महत्त्व आहे. हा मसाल्याचा प्रकार प्रत्येक घरात वापरला जातो. हळद आरोग्यासाठी गुणकारी असते, असे अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलोय. मात्र, आता हीच हळद आरोग्यासाठी घातक असल्याचे आढळून आले आहे. भारतभर विकल्या जाणाऱ्या हळदीच्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. केवळ भारतीय खाद्यपदार्थांमध्येच नव्हे, तर पारंपरिक औषधांमध्येदेखील हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कारण- हळदीमध्ये एकंदर आरोग्यासाठी मजबूत दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. परंतु, शिशामुळे दूषित झालेल्या हळदीच्या सेवनाने आरोग्याला गंभीर धोके उद्भवू शकतात. शिसे म्हणजे काय? नवीन अभ्यास काय सांगतो? तुम्ही सेवन करत असलेली हळद खरंच विषारी आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

शिसे म्हणजे काय?

शिसे हा एक विषारी जड धातू आहे; जो नैसर्गिकरीत्या जमिनीत आढळून येतो. यूएस एन्व्हायर्न्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी (ईपीए)च्या मते, शिशाचे परिणाम हानिकारक असू शकतात कारण- ते कॅल्शियमचे अनुकरण करते. कॅल्शियम जसे हाडांमध्ये साठते, तसे ते हळूहळू महत्त्वपूर्ण अवयव व शारीरिक कार्यांवर परिणाम करते, तसाच परिणाम शिशाचादेखील होतो. शिशाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास, ते हाडांमध्ये जमा होते. हवा, माती व पाणी, तसेच जीवाश्म इंधन यासह अनेक स्रोतांमधून माणसांच्या शरीरामध्ये शिसे जाऊ शकते. सध्याचे निष्कर्ष लक्षात घेता, हळदीमधील जोखीम समजून घेणे आणि दैनंदिन मसाल्यांमध्ये या जड धातूचा संभाव्य संपर्क कमी करण्यासाठी सुरक्षित सोर्सिंग पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे.

Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
rains lashed sangli and nashik damaged rabi season crops
सांगली, नाशिकला पावसाने झोडपले; द्राक्ष, डाळिंबाला फटका; रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान
Avoid These Foods to Control Cholesterol Levels
Cholesterol Level in Winter : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ
healthy lifestyle
महिनाभर गोड खाऊ नका, नियमित १० हजार पावले चाला अन् फक्त घरचं अन्न खा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या, आरोग्यावर कसा होईल सकारात्मक परिणाम
youth arrested for selling drugs, Drugs Sinhagad road area, drugs pune, pune latest news,
पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणात उच्चशिक्षित तरुण गजाआड, सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अमली पदार्थ जप्त
jalgaon car accident deaths
जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दाम्पत्याचा मृत्यू
हळद आरोग्यासाठी गुणकारी असते, असे अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलोय. मात्र, आता हीच हळद आरोग्यासाठी घातक असल्याचे आढळून आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?

अभ्यास काय सांगतो?

सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंटमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात भारत, पाकिस्तान, नेपाळ व श्रीलंका येथील हळदीच्या नमुन्यांमध्ये शिशाची चिंताजनक पातळी आढळून आली आहे. काही नमुन्यांमध्ये ही पातळी १,००० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की, चाचणी केलेल्या सुमारे १४ टक्के नमुन्यांमध्ये दोन मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त शिसे आहे. या पातळीमुळे संशोधकांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे की, मोठ्या प्रमाणावरील शिशामुळे विषबाधा होऊ शकते, विशेषतः लहान मुलांवर याचा अधिक परिणाम होतो.

संशोधनामध्ये डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चार देशांतील २३ शहरांतील हळदीचे नमुने घेण्यात आले. भारतात पाटणा येथील हळदीत २,२७४ मायक्रोग्राम व गुवाहाटी येथील हळदीत १२७ मायक्रोग्राम शिशाची पातळी नोंदवली गेली आहे, जी सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे सर्वांत जास्त दूषित नमुने पॉलिश केलेल्या हळदीच्या मूळांमध्ये होते. अनेकदा त्यांचे स्वरूप सुधारण्यासाठी हळदीवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हळद पावडर तयार केली जाते. पॅकबंद आणि ब्रॅण्डेड हळदीमध्ये सामान्यत: शिशाची पातळी कमी असल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा की, व्यवस्थितरीत्या साठविण्यात न आलेली हळद लवकर दूषित होऊ शकते.

हळदीत विषारी रसायनाचा वापर

हळदीचा रंग उजळ करण्यासाठी हळदीमध्ये लिड क्रोमेट नावाचे विषारी रसायन वापरले जाते. हे एक पिवळे रंगद्रव्य आहे, जे विशेषत: पेंट्स आणि प्लास्टिक्ससारख्या औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये वापरले जाते. बांगलादेशसह जगभरातील शिशामुळे झालेल्या विषबाधेच्या प्रकरणांमध्ये लिड क्रोमेटची भेसळ आढळून आली आहे. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, हळदीच्या पुरवठा साखळीसाठी पुढील तपास करणे आवश्यक आहे. विशेषतः उत्पादन प्रक्रियेत लिड क्रोमेटचा वापर कोठे आणि का केला जातो यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

आरोग्यास गंभीर धोका

शिशामुळे दूषित झालेली हळद आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. विशेषतः लहान मुलांसाठी हा धोका अधिक असतो. अगदी कमी प्रमाणात शिसेदेखील जवळजवळ प्रत्येक अवयव आणि शारीरिक प्रणालीवर गंभीर परिणाम करू शकते. त्यात सहा वर्षांखालील मुले सर्वांत असुरक्षित असतात. लहान मुलांमध्ये लीड एक्सपोजरचा परिणाम कमी बुद्धिमत्ता, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि विकासात्मक विलंब यांसारख्या समस्यांच्या स्वरूपात होऊ शकतो. जागतिक अंदाजानुसार सध्या ८०० दशलक्षांहून अधिक मुलांमध्ये रक्तातील शिशाचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे शिशाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)चा अंदाज आहे की, दरवर्षी मुलांमध्ये बौद्धिक दुर्बलतेच्या सुमारे ६,००,००० नवीन प्रकरणांसाठी शिसे कारणीभूत ठरते. परिणामी अंदाजे १,४३,००० मृत्यूची नोंद केली जाते.

संशोधकांनी सावधगिरीचा इशारा देऊन सांगितले की, हळदीच्या काही नमुन्यांमध्ये आढळलेल्या पातळीमुळे संज्ञानात्मक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बिहारसारख्या भागातील मुलांमध्ये सात पॉइंट आयक्यू कमी होण्याचा धोका असतो, असे या अभ्यासाचे नेतृत्व करणाऱ्या पर्यावरणीय आरोग्य शास्त्रज्ञ जेन्ना फोर्सिथ यांनी सांगितले. शिशाचा प्रौढांवरही परिणाम होतो; ज्यामुळे संज्ञानात्मक घट, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, मूत्रपिंड निकामी होणे आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो.

काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी विश्वासार्ह स्रोतांकडून हळद खरेदी करणे सुनिश्चित केले पाहिजे, जे दूषित घटकांसाठी चाचण्या घेतात. शिशाच्या उपस्थितीचा अर्थ सर्व हळद विषारी आहे, असे नाही. परंतु, दररोज वापरल्या जाणाऱ्या मसाल्याच्या गुणवत्तेबद्दल सावध राहणे आवश्यक आहे.

हळदच नव्हे, तर अगदी चॉकलेटमध्येही जड धातूंचा धोकादायक स्तर असल्याचे आढळले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

हळदीतील शिशापासून ते चॉकलेटमधील धातूंपर्यंत

हळदच नव्हे, तर अगदी चॉकलेटमध्येही जड धातूंचा धोकादायक स्तर असल्याचे आढळले आहे. या वर्षी जुलैमध्ये फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, अमेरिका आणि युरोपमधील विविध लोकप्रिय चॉकलेट्समध्ये कॅडमियम आणि शिसे यासारखे जड धातू असतात. ‘ॲज यू सो’ या संस्थेचे अध्यक्ष डॅनिएल फुगेरे यांनी ‘यूएसए टुडे’ला स्पष्ट केले की, हे जड धातू कोको बीनद्वारे चॉकलेटमध्ये प्रवेश करतात. कोकोची झाडे मातीतून कॅडमियम शोषून घेतात, जे नंतर बीन्समध्ये जमा होतात आणि शेवटी चॉकलेट उत्पादनांमध्ये त्यांचा प्रवेश होतो. डार्क चॉकलेट्समध्ये कोकोचे प्रमाण जास्त असल्यामुळे सामान्यतः दुधाच्या चॉकलेटपेक्षा त्यात जास्त जड धातू असतात.

Story img Loader