Male Contraceptive Pills: अनावश्यक गर्भधारणा तसेच लैंगिक आजाराचा धोका टाळण्यासाठी कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण बहुतांश वेळा पुरुष अनेक कारणं देऊन कंडोम वापरण्यासाठी टाळाटाळ करतात. अशा मंडळींसाठी आता कंडोमपेक्षा अधिक कार्यक्षम उपाय संशोधकांनी शोधला आहे. महिलांप्रमाणे आता यापुढे लैंगिक क्रियांच्या आधी पुरुषांनाही गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याआधी एक तास आधी या गोळ्या घेतल्यास त्याचा प्रभाव तासभर टिकू शकतो. या गोळ्यांचा परिणाम नेमका काय व कसा होतो व कोणाला त्याचा वापर करता येईल हे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात..

गर्भधारणा रोखणाऱ्या गोळ्या घेताना बर्‍याच स्त्रियांना हार्मोनल समस्या आणि वेदनादायक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो, परंतु या नवीन संशोधनात पुरुषांच्या बाबतीत असे होऊ शकत नसल्याचे समजत आहे. आता, पुरुषांना नसबंदी आणि कंडोमशिवाय पर्याय अधिक सुरक्षित व सोयीचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

स्त्रीची गर्भधारणा रोखणाऱ्या गोळ्या काय आहेत? (Male Birth Control Pills)

युनायटेड स्टेट्समधील अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक सध्या यासंदर्भात तपास करतआहेत. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने पुरस्कृत अभ्यासातून असे दिसून आले आहे की गर्भनिरोधक गोळीचा एक डोस लैंगिक संबंधापूर्वी घेतल्यास शुक्राणूंचा वेग थांबवू शकतो, ज्यामुळे पार्टनरला गर्भधारणा होत नाही.

महिलांसाठी गर्भनिरोधक गोळी कशी कार्य करते? (How Female Contraceptives Work)

सिटीजन स्पेशियलिटी हॉस्पिटल, हैदराबादच्य वरिष्ठ सल्लागार व इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ अनीता कुन्नैया सांगतात की, गर्भनिरोधक गोळ्या केवळ ओव्यूलेशनची प्रक्रिया थांबवतात जेणेकरून अनपेक्षित गर्भधारणा टाळता येते. या गोळ्या तुमच्या प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम करत नाहीत. गर्भनिरोधक गोळ्यांमधील हार्मोन्स हे ओव्यूलेशन प्रक्रिया थांबवतात त्यामुळे काहीवेळा मासिक पाळी येण्यास उशीर होऊ शकतो

पुरुषांसाठी गोळी कशी काम करते? (How Male Contraceptives Works)

स्त्रीची गर्भधारणा रोखणारी गोळी कंडोमसाठी पर्याय म्हणून काम करू शकते. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शुक्राणूंची गतिशीलता काही प्रमाणात थांबते ज्यामुळे ते ओव्यूलेटेड Eggs कडे वाहून जाऊ शकत नाही. परिणामी शुक्राणूमुळे गर्भधारणा होत नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की गर्भनिरोधक गोळ्यांच्या प्रभावाच्या एका तासात शुक्राणूंची गतिशीलता मंदावलेली असते. या गोळ्या हार्मोन्ससह संपर्कात येत नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम नगण्य असतात.

हे ही वाचा<< विश्लेषण: भारताच्या UPI सिस्टीममध्ये PayNow ची जोडणी; या बदलाने नेमका तुम्हाला कसा फायदा होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गर्भनिरोधक गोळ्या घेण्याबाबत एक सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जेव्हा या बर्थ कंट्रोल गोळ्या घेणे बंद केले जाते तेव्हा त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो का? सतत गोळ्या घेतल्याने शरीरात बर्थ कंट्रोल हार्मोन्स तयार होतात का? अशावेळी शरीर स्वच्छ करण्यासाठी काय करावे असाही प्रश्न असतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे सर्व केवळ मानसिक समज आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव एक ते दोन महिन्यांच्या वर टिकत नाही परिणामी ज्या महिन्यापासून तुम्ही या गोळ्या घेणे थांबवाल त्याच्या एक ते दोन महिन्यांनंतर तुमचे शरीर भ्रूणाच्या वाढीसाठी सक्षम होते.