समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे; ज्यामुळे मानवाला भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. “महासागर ओसंडून वाहत आहे,” असा इशारा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी टोंगा येथे नुकत्याच दिलेल्या भेटीत दिला. दक्षिण पॅसिफिकमधील द्वीपसमूह हा अनेक देशांपैकी एक आहे, ज्यांना समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. जगभरातील अनेक किनारी प्रदेश आणि शहरे आधीच विनाशकारी पूर आणि वादळांचा सामना करत आहेत; ज्यामुळे जीवन, नोकऱ्या आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा धोक्यात येत आहेत. समुद्राची पातळी वेगाने का वाढत आहे? त्याचा काय परिणाम होणार? समुद्राची पातळी वाढण्याची कारणं काय? त्याविषयी जाणून घेऊ.

समुद्राची पातळी किती वेगाने वाढत आहे?

२० व्या शतकाच्या सुरुवातीपासून जागतिक समुद्राची पातळी गेल्या तीन हजार वर्षांतील कोणत्याही टप्प्यापेक्षा वेगाने वाढली आहे आणि हा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. १८८० मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून, समुद्राची पातळी २० सेंटीमीटर (आठ इंचांपेक्षा जास्त) इतकी वाढली आहे. दर दशकात याचा वेग वाढत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये जागतिक सरासरी समुद्र पातळी विक्रमी उचांकावर पोहोचली आहे. पृथ्वीच्या असमान गुरुत्वाकर्षण क्षेत्रामुळे जगभरात समुद्र पातळीत समान प्रमाणात वाढ होत नाही. नैऋत्य पॅसिफिकच्या काही भागात १९९३ पासून समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा दुप्पट वाढली आहे.

Decolonizing the Indian Military
ब्रिटिश व्यक्ती नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य असेल भारतीय सैन्याचे प्रेरणास्थान; भारतीय सशस्त्र दलात आता बदलाचे वारे!
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
_Israel tracked Hezbollah’s Hassan Nasrallah
इस्रायलने हसन नसरल्लाहच्या ठिकाणाचा शोध कसा घेतला? हिजबुल प्रमुखाला अमेरिकन बॉम्बने कसे ठार केले?
pakistani family arrest in bengaluru
पाकिस्तानचं सिद्दीकी कुटुंब ‘शर्मा’ बनून भारतात का आले? मुस्लीम असूनही शेजारी देश सोडण्याचं खरं कारण काय?
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
२० व्या शतकाच्या सुरुवातीपासून जागतिक समुद्राची पातळी गेल्या तीन हजार वर्षांतील कोणत्याही टप्प्यापेक्षा वेगाने वाढली आहे. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : इस्रायलने हसन नसरल्लाहच्या ठिकाणाचा शोध कसा घेतला? हिजबुल प्रमुखाला अमेरिकन बॉम्बने कसे ठार केले?

समुद्राच्या पातळीचा वेग वाढत्या तापमानावर अवलंबून आहे. वाढीचा हा आकडा मोठा वाटत नसला तरी शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, समुद्रातील प्रत्येक २.५ सेंटीमीटरच्या वाढीमुळे २.५ मीटरचा समुद्रकिनाराही हरवत चालला आहे. त्याचप्रमाणे, समुद्र पातळीच्या प्रत्येक सेंटीमीटर वाढीसाठी सहा दशलक्ष लोक किनारपट्टीच्या पुराच्या संपर्कात येण्याचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांचा असाही अंदाज आहे की, मानवी क्रियाकलापांमुळे शतकाच्या अखेरपर्यंत समुद्राची पातळी दोन मीटरपर्यंत वाढू शकते.

समुद्राची पातळी वाढण्याची कारणं काय?

ऊर्जा, उद्योग आणि वाहतूक त्यासह जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आणि समुद्राची पातळीही वाढत चालली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्र तापत आहे. गेल्या २० वर्षांत समुद्र तापण्याची गती दुप्पट झाली आहे. नैऋत्य पॅसिफिक समुद्रात जागतिक सरासरीपेक्षा तिप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२३ मधील महासागराचे तापमान हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण तापमान होते. वाढत्या उष्णतेमुळे बर्फाचा थर आणि पर्वतीय हिमनद्या वितळणे हे समुद्र पातळी वाढण्याचे प्रमुख कारण आहे. अंटार्क्टिकामधून दरवर्षी सरासरी १५० अब्ज टन आणि ग्रीनलँडमधून २७० अब्ज टन बर्फाचे वस्तुमान नष्ट होतात. अलीकडील वैज्ञानिक अहवालांनी हवामान ‘टिपिंग पॉईंट्स’बद्दलही चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार तापमानात १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाल्याने संपूर्ण ग्रीनलँड आणि पश्चिम अंटार्क्टिक बर्फ वेगाने वितळू शकतो; ज्यामुळे समुद्राच्या पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

समुद्राच्या पातळीचा वेग वाढत्या तापमानावर अवलंबून आहे. (छायाचित्र-एपी)

जगातील कोणते भाग सर्वाधिक प्रभावित?

फिजी, मालदीव आणि तुवालू यांसारखी लहान बेटे, समुद्र पातळीच्या वाढीमुळे गंभीर धोक्यांचा सामना करत आहेत. समुद्र पातळीच्या अगदी मध्यम वाढीमुळे या बेटांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. समुद्राची पातळी वाढल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण जगातील सुमारे ४० टक्के लोकसंख्या किनाऱ्याजवळ राहते आणि अंदाजे ९०० दशलक्ष लोक कमी उंचीच्या भागात राहतात. जगभरातील किनारपट्टीवरील शहरे आधीच किनारपट्टीची धूप, शेती, खारे पाणी, वाढत्या विनाशकारी पूर आणि वादळांचा सामना करत आहेत. २०२२ च्या अभ्यासानुसार, बांगलादेश, भारत, चीन आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वात जास्त प्रभावित ठिकाणे असतील. कैरो, लागोस, लॉस एंजेलिस, मुंबई, ब्युनोस आयर्स आणि लंडन यांसारख्या मोठ्या शहरांवरही गंभीर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : मंगळावरील मातीच ठरली विनाशकारी? मंगळावरील जीवन कसे संपले? नवीन अभ्यासातून गूढ उलगडलं

त्यावर काही उपाय आहेत का?

तज्ज्ञ म्हणतात की, समुद्राच्या पातळीत होणारी नाट्यमय वाढ रोखण्याचा उपाय जलद उत्सर्जन कमी करणे हा आहे. परंतु, उद्या जरी जगाने सर्व हरितगृह वायूंचे उत्सर्जन थांबवले तरी जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचे तापमान आणि बर्फ व हिमनदी वितळण्यावर होणारा परिणाम नियंत्रणात येण्यास काही काळ जाईल. जगभरातील देश समुद्रापासून शहरांचे संरक्षण करण्यासाठी आणि वादळाच्या लाटांचा सामना करण्यासाठी ड्रेनेज सिस्टम आणि पूर प्रतिरोधक इमारतींमध्ये सुधारणा करण्यापर्यंत अनेक प्रकारचे अनुकूलन उपाय करत आहेत. काही उपाय सोप्या निसर्गावर आधारित आहेत. जसे की, सेनेगलच्या समुद्रकिना-यावर लाकडाची धूप करून किंवा कॅमेरूनमधील खारफुटीची जंगले पुन्हा निर्माण करून किनारपट्टीवरील धूप रोखण्यात येत आहे. सखल भागात असलेल्या लहान बेटांना असणारा धोका पाहता गावे उंच ठिकाणांवर हलवण्यात येत आहेत.