जळू या उपचारपद्धतीचा वापर आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा केला जायचा. आयुर्वेदिक उपाचारामध्ये आजही जळू वापरल्या जातात. परंतु, पूर्वीच्या तुलनेत याचा वापर कमी झाला आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे अगदी परदेशातही आता पुन्हा ही उपचारपद्धती अवलंबली जात आहे. पहिल्यांदाच हिरुडो मेडिसिनलिस लंडन प्राणीसंग्रहालयात जळूचे प्रजनन केले गेले आहे. जळूला वाचविण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रकल्प राबवला जात आहे. एकेकाळी ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारी औषधी जळू आता दुर्मीळ झाली आहे. आयर्लंडमध्ये १९ या शतकात जळू नष्ट होण्याच्या मार्गावर होती.

१९ व्या शतकात कर्करोगापासून ते मानसिक आजारापर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी जळूंचा अनेकदा वापर होत असल्याबद्दल तुम्ही ऐकले असेल. १९ व्या शतकात हिस्टेरिया (मानसिक आजार) ते सिफिलीसपर्यंत सर्व आजारांवर उपचार म्हणून याचा वापर करण्यात आला. मात्र, सामान्य जळूला रक्तस्त्रावाबरोबर जोडल्याने हा इतिहास मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. परंतु, १८८४ साली जळूची लाळ हीरोडीन नावाच्या अँटीकोआगुलंट म्हणून ओळखली गेली. शल्यचिकित्सक अजूनही शस्त्रक्रियेचे यश दर सुधारण्यासाठी जळूचा वापर करतात, जसे की तुटलेली बोटे पुन्हा जोडताना, कारण जळूची लाळ शस्त्रक्रियेनंतर रक्त गोठण्यापासून रोखते. काय आहे औषधी जळू? जळूचा वापर नक्की कसा केला जातो? त्याविषयी जाणून घेऊ.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
mumbai bmc assured drug distributors 50 percent payments in two weeks rest by February 15
औषध आणीबाणी टळली, औषध वितरकांची दोन आठवड्यात देयके मंजूर होणार
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Due to pending payments for four years 150 drug distributors stopped supplying medicines
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील औषध पुरवठा ठप्प, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुरवठा न करण्याचा वितरकांचा निर्णय
औषधी जळूचा वापर एकेकाळी ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात केला जायचा. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : सोनू सूदने रस्ते अपघात रोखण्यासाठी सुचवला ‘क्रॅश बॅरिअर्स’चा पर्याय; ही प्रणाली कसे कार्य करते?

पूर्वी औषधी जळूचा वापर कसा केला जायचा?

औषधी जळूचा वापर एकेकाळी ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात केला जायचा. १८ व्या आणि १९ व्या शतकात औषधोपचारात त्यांच्या लोकप्रिय वापरामुळे एक किफायतशीर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली. सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी जळूचा वापर इजिप्शियन थडग्याच्या सजावटीमध्ये दिसून येतो, त्यामुळे अगदी इ.स १५०० पासून जळूचा वापर होत असे, असे काही पुरावे सांगतात. जळू ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये युरोप, रशिया आणि आफ्रिकेतून आयात केल्या गेल्या होत्या, परंतु यापैकी काही जळू आता दिसत नाहीत. उदाहरणार्थ, कमी प्रभावी जळू म्हणून हिरुडो डेकोरा या जळूवर बंदी आणण्यात आली. आयात केली गेलेली हिरुडो डेकोरा जळू खोलवर चावत नाही आणि त्यामुळे रक्त काढण्यात कमी प्रभावी ठरते. जळूची संख्या पूर्वीच्या तुलनेत घटली आहे आणि ब्रिटनमध्येही त्यांचा वैद्यकीय वापर कमी झाला. खर्च, दुर्मिळता आणि बदलत्या वैद्यकीय उपचारांमुळे २० व्या शतकाच्या सुरुवातीस जळू लुप्त होत गेले आहे.

जळू औषधी कारणांसाठी का वापरतात?

‘हिरुडोथेरपी’मध्ये जळूचा वापर केला जातो. १९६० पासून ही उपचार पद्धती सुरू झाली आणि १९८० पासून याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. संशोधकांना जळूच्या लाळेमध्ये १०० पेक्षा जास्त पदार्थ औषधासाठी उपयुक्त असल्याचे आढळले आहे. जसे की दाहक-विरोधी घटक, प्रतिजैविक आणि वेदना कमी करणारे. परंतु, याचे मुख्य उद्दिष्ट प्लास्टिक शस्त्रक्रिया आहे, जेथे जळूच्या मदतीने ऊती पुन्हा जोडल्या जातात. कधीकधी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होते आणि हृदय व फुफ्फुसात परत येऊ शकत नाही; ज्यामुळे ऊती निष्कामी होऊ लागतात. अशावेळी जळू थेट जखमेच्या जागेवर लावल्या जातात.

‘हिरुडोथेरपी’मध्ये जळूचा वापर केला जातो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जेव्हा त्या चावतात तेव्हा त्यांची लाळ रुग्णाच्या रक्तप्रवाहात अँटीकोआगुलंट्स स्थानांतरित करते, ज्यामुळे रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. इतर रसायने चाव्याच्या ठिकाणी रक्त प्रवाह वाढवतात आणि चावलेल्या व्यक्तीला अनेकदा हे लक्षात येत नाही, कारण जळू दाहक आणि वेदनाशामक पदार्थ सोडते. जळूच्या लाळेमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्मदेखील असतात, जे जखमेच्या संसर्गापासून संरक्षण करतात. या वर्षी लंडनच्या प्राणीसंग्रहालयात ४० औषधी जळूंचा जन्म झाला ही चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे जळूची संख्या आणखी वाढू शकेल.

रक्त पिण्याच्या गुणधर्मामुळे जळूचा वापर

जळू कोरड्या दिवसांत सुप्तावस्थेत असते आणि पावसाळ्यात सक्रिय होते. फार प्राचीन काळापासून वैद्यकशास्त्राच्या इतिहासात जळूचा वापर होत आला आहे. जळूला जलौका म्हणूनही ओळखले जाते. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक काळापासून याचा वापर होत आला आहे. मध्यंतरी जळूचा वापर कमी झाल्याचे, त्यांची संख्या घटल्याने वाढलेल्या उपचार किमतींमुळे आणि अपप्रचारामुळे जळूचा वापर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा ही उपचारपद्धती वापरली जात असल्याचे चित्र आहे. ब्रिटनमध्ये राहणारी गोड्या पाण्यातील जळू आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये तिरस्काराची भावना होती. परंतु, जगभरातील ६०० प्रजातींपैकी बहुतेक रक्तशोषक नाहीत, म्हणजेच ते किमान मानवांचे रक्त शोषत नाही.

हेही वाचा : आता विद्यार्थ्यांना ठरवता येणार पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी; यूजीसीची नवीन योजना काय? याचा कसा फायदा होणार?

या प्राण्यांच्या शरीरात सेन्सिला नावाच्या लहान संवेदी संरचना आहेत, ज्या त्यांना पाण्याची गती आणि प्रकाश शोधण्यात मदत करतात असे मानले जाते. औषधी जळूंसह काही जळूंच्या डोक्यावर तब्बल पाच जोड्या असतात, पण काहींना फक्त एक जोडी असते. अन्न न मिळाल्यास जळू वर्षभरसुद्धा उपाशी राहू शकतात. जळू एकमेकींच्या शरीरात शुक्राणू सोडून एकमेकींच्या शरीरातील अंड्यांना फलित करतात. यानंतर त्वचेचाच एक कोष (क्लिटेलम) तयार करून त्यात अंडी घालतात व त्याला ओलसर दगडाला किंवा खोडाला चिकटवून ठेवतात. काही आठवड्यांनी कोषातून पिल्लं बाहेर येतात. जळूला सक्रिय राहण्यासाठी ओलाव्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्या सर्वाधिक पावसाळ्यात आढळून येतात.

Story img Loader