भारताचे स्वदेशी लढाऊ विमान LCA तेजस मंगळवारी राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले. खरं तर २३ वर्षांतील तेजस लढाऊ विमानाचा हा पहिला अपघात होता. या अपघातात वैमानिकाचा जीव बचावला, मात्र लढाऊ विमान पडल्यामुळे जैसलमेरमधील एका वसतिगृहाच्या काही भागाचे नुकसान झाले. या विमानाच्या अपघातानंतर ब्रिटिश कंपनी मार्टिन बेकरने एक ट्विट केले. “आज भारतीय वायुसेनेचे तेजस LCA विमान राजस्थानच्या जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइटदरम्यान कोसळले. वैमानिकाला मार्टिन बेकर (IN16G) सीटचा वापर करून यशस्वीरीत्या बाहेर काढले,” असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. तेजस लढाऊ विमानात ब्रिटिश कंपनी मार्टिन बेकरची इजेक्शन (IN16G) सीट बसवण्यात आली होती. ही जगभरातील लढाऊ विमानांसाठी इजेक्शन सीट बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. चीन आणि पाकिस्तानने बनवलेल्या जेएफ १७ या लढाऊ विमानातही या कंपनीच्या इजेक्शन सीट्स बसवण्यात आल्या आहेत. मार्टिन बेकर एअरक्राफ्ट कंपनी लिमिटेड ही विमानासाठी इजेक्शन सीट्स आणि सुरक्षा संबंधित उपकरणांची ब्रिटिश उत्पादक कंपनी आहे.

इजेक्शन हँडल खेचल्यानंतर विमानापासून सीट वेगळी होण्याची प्रक्रिया सुरू

इजेक्शन हँडल खेचल्यानंतर ४ ते ५ सेकंदांनंतर लढाऊ विमानापासून सीट वेगळी होण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा वेळी बाहेर पडणारा प्रवासी विमानापासून सुरक्षित अंतरावर गेल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने सीटपासून वेगळा होऊन खाली उतरू शकतो. पहिल्यांदा सीट खालील एक छोटेसे हँडल खेचले जाते, त्यानंतर लढाऊ विमानापासून सीट वेगळी करून ती व्यक्तीला हवेत ढकलते. त्यानंतर लढाऊ विमान आणि सीट एकमेकांपासून काही अंतरावर गेल्यानंतर वैमानिकाही सीटपासून स्वतःला वेगळे करावे लागते. त्यानंतर त्यातून एक पॅराशूट बाहेर पडते आणि त्या पॅराशूटच्या सहाय्याने वैमानिक सुखरूप हवेतून जमिनीवर उतरू शकतो. विशेष म्हणजे लढाऊ विमानाची सीट रॉकेट थ्रटर्सच्या साहाय्याने वेगळी केली जाते. एकदा विमानापासून काही अंतरावर गेल्यानंतर सीटच्या तळाशी आणि मागील बाजूस जोडलेले रॉकेट बूस्टर पेटतात, ज्यामुळे विमान आणि त्यातून बाहेर पडणारे प्रवासी यांच्यात अंतर वाढते.

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

हेही वाचाः विश्लेषण : निअँडरथाल शिकारी, इराणी शेतकरी ते मध्य आशियाई गुराखी…भारतीय नक्की उत्क्रांत झाले कसे?

खरं तर बेलआऊट ही एक अत्यंत घातक प्रक्रिया आहे. अशा घटनेत जवळजवळ प्रत्येक बाहेर पडलेल्या व्यक्तीला काही ना काही दुखापत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २०-३० टक्के लढाऊ विमानातून इजेक्शन सीट वेगळी करून बाहेर पडणाऱ्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान मानवी शरीरावर परिणाम होतो. वस्तूचे वस्तूमान आणि वेग यातून संवेगाची निर्मिती होते, असे न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम सांगतो. या नियमानुसार भूतलावरील गुरुत्वाकर्षणामुळे हा संवेग १ जी (9.806 m/s2) एवढा असतो. मात्र वेगात असलेल्या लढाऊ विमानाच्या वैमानिकाला जाणवणारा संवेग ८-१० जीदरम्यान म्हणजेच अनेक पटींनी अधिक असतो. त्यामुळे प्रसंगी वैमानिकाच्या हालचालींवर त्याचा विपरित परिणाम होतो. इजेक्शन अगदी मर्यादित कालावधीसाठी असले तरी संवेग २० जीपर्यंत परिणाम जाणवतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास इजेक्शन दरम्यान बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या वजनाच्या २० पट शक्तीचा अनुभव होतो. यामुळे हाडे मोडू शकतात किंवा मणका मोडण्याची शक्यता असते. त्यामुळेच लढाऊ विमानापासून सीट वेगळी करताना वैमानिकांना शरीर शक्य तितके हलके आणि सुव्यवस्थित ठेवावे लागते. कोणताही शरीराचा भाग या प्रक्रियेदरम्यान जरासुद्धा सीटपासून वेगळा झाला तर तो मोडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच वैमानिकांना अशा अपघाती प्रसंगी बाहेर पडण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाते, जो कोणी लढाऊ विमानात पाऊल ठेवतो, त्याने काही मूलभूत प्रशिक्षणदेखील घेणे आवश्यक आहे.

हेही वाचाः विश्लेषण : स्मॉल-मिडकॅप फंडांच्या भाव तेजीवर सेबीचा आक्षेप काय? या वाढीस ‘बुडबुडा’ का संबोधले?

लढाऊ विमानापासून सुरक्षित अंतरावर गेल्यानंतर वैमानिक सीटपासून वेगळे होतो आणि पॅराशूट उघडते. खरं तर हे आपोआप घडते असे मानले जाते, परंतु या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचण आल्यास वैमानिक स्वतःसुद्धा ही प्रक्रिया करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे पॅराशूट खूप उंचावर जाईपर्यंत वाट पाहू नये. असे केल्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा श्वास गुदमरण्याची शक्यता असते. इजेक्शनसाठी ड्रोग म्हणून ओळखले जाणारे लहान पॅराशूट वापरले जाते. एकदा पॅराशूट तैनात केल्यानंतर वैमानिकाला योग्य ठिकाणी उतरण्याची खात्री करून घ्यावी लागते. तसेच हवेतून जमिनीवर उतरण्यासाठी सुरक्षित जागा शोधावी लागते. विमानातील सर्व्हायव्हल किटमध्ये पाण्यात उतरण्यासाठी लाइफ जॅकेटसह काही प्राथमिक उपचार बॉक्स, अन्न आणि एक फ्लेअर गन, चाकू यांचा समावेश असतो.