-संदीप नलावडे

आंबटगोड चवीचे पेरू हे फळ बहुतेक सर्वांच्याच आवडीचे! भरपूर जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण अधिक असलेले हे फळ उत्तम आरोग्यासाठी आणि रोग निवारणासाठी महत्त्वपूर्ण फळ आहे, असे संशोधनातून दिसून आले आहे. पोट साफ करणे, भूक मिटवणे यांसह अगदी कर्करोग, हृदयविकार, बद्धकोष्टता आदी विकारांवरही परिणामकारक आहे. केवळ फळच नाही तर पेरूची पानेही विविध रोगनिवारणासाठी उपयुक्त असतात. हिंदीत ज्याला ‘अमरुद’ असे संबोधतात, अशा ‘अमृत’मयी फळाच्या औषधी गुणधर्माविषयी…

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?
china vs us
अरुणाचलबाबत अमेरिका भारताच्या बाजूने, चीनचा जळफळाट; म्हणे, “अमेरिका आमच्यात भांडणं लावतेय!”

पेरू फळाचे मूळ आणि संक्षिप्त इतिहास…

पेरू हे मूळ भारतीय फळ नाही. अमेरिकेचा शोध लागल्यानंतर पोर्तुगीजांनी तेथील फळभाज्या, फळे सर्वदूर पसरवली. पेरू मूळचा मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील असून स्पॅनिश व पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी भारतासह आशिया व आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात त्याचा प्रसार केला. भारतातील बंगाल प्रांतात प्रथमत: पेरू या फळाची लागवड करण्यात आली. त्यानंतर त्याचा प्रसार अन्य प्रांतात झाल्याने अनेक ठिकाणी या फळाची लागवड करण्यात आली. पेअर या फळाला पोर्तुगीज भाषेत पेरा म्हणतात. पेअर या फळाशी साधर्म्य असलेल्या या फळालाही ते आधी पेरा असेच संबोधू लागले. त्यातूनच बंगालीत पेरूला ‘पेयारा’ असे म्हणू लागले. या पेयारावरूनच मराठीत पेरू हा शब्द आला. हिंदीत या फळाला अमरूद किंवा जाम असे म्हणतात. पेरू या फळाच्या विविध औषधी गुणधर्मामुळेच ‘अमृत’ या शब्दावरून अमरुद हा शब्द आला आहे. मिर्टेसी कुलातील पेरू या फळाचे शास्त्रीय नाव आहे ‘सिडियम गुयाव्हा.’ त्यावरूनच इंग्रजीत त्यास ‘गुआवा’ असे संबोधतात.

पेरू या फळात कोणते गुणधर्म आहेत?

पेरू या फळात मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते. आवळ्यापाठोपाठ सर्वाधिक क जीवनसत्त्व असणारे हे फळ आहे. लिंबू वर्गातील फळांची तुलना केल्यास क जीवनसत्त्वाचे प्रमाण ४ ते ५ पट अधिक असते. त्याशिवाय ‘अ’ जीवनसत्त्व, फॉलिक आम्ल, तंतुमय पदार्थ असतात. नियासिन, थायमिन, रिबोफ्लेविन, कॅरोटीन, लाइकोपीन यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यांसारख्या खनिजांनी हे फळ समृद्ध आहे. पेरूच्या फळात पॉलिफेनॉलिक संयुगे असून जे प्रतिजैविक म्हणून काम करतात. पेरूच्या पानांमध्ये अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असल्याने औषधनिर्माण आणि अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये जैवसंरक्षक म्हणून त्यांचा वापर केला जातो.

विविध विकारांवर उपयुक्त कसे?

पेरू या फळात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट साफ करण्यास या फळाची मदत होते. विशेषत: सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास पोट साफ होते. पिकलेला पेरू चवदार असतो, अतिसार व अमांश यांवर तो गुणकारी आहे. भूक लागल्यास एक मोठ्या आकाराचा पेरू भूक पूर्णपणे मिटवू शकतो. त्याचे विविध गुणधर्म असल्याने ते पूर्ण अन्न आहे. केवळ फळच नाहीतर पेरूची पानेही उपयुक्त असतात. पेरूच्या पानांचा काढा दातदुखी, खोकला, घशाचे विकार, तोंडातील फोड आणि पोटातील जंत यांवर गुणकारी आहे. आंबट पदार्थांमुळे सर्दी-खोकला होतो, असा गैरसमज असल्याने पेरूपासून लहान मुलांना दूर ठेवले जाते. मात्र क जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याचे पेरू सर्दी-खोकल्यातही उपयुक्त आहे. पेरू खाल्ल्याने लोहाची कमतरता दिसून येत नाही. आतड्याच्या आरोग्यासाठीही पेरू उपयुक्त आहे. त्यामुळै बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्याने मूळव्याधीची लक्षणे दूर होतात. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास पेरूच्या पानांचा अर्क महत्त्वपूर्ण असल्याचे संशोधन २००७ मध्ये मेक्सिकोमध्ये करण्यात आले. पेरूमध्ये तांबे व मँगनीज असल्याने हिमोग्लोबिनची पातळी सामान्य राखण्यास आणि थायरॉइडचे कार्य सुधारण्यास ते मदत करतात.

मधुमेहींसाठी उपयुक्त कसे?

नव्या संशोधनानुसार पेरू हे फळ मधुमेहाचा विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. नियमित पेरूचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते, असे दिसून आले आहे. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स १२ ते २४ इतका कमी असतो. ग्लायसेमिक इंडेक्स हे कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांची मोजमाफ पद्धती आहे. प्रत्येक पदार्थाचा तुमच्या रक्तातील शर्करा स्तरावर किती लवकर परिणाम होतो, हे ते दाखवते. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने तुमचे पोट भरते आणि तुम्हाला अन्नाच्या लालसेपासून दूर ठेवते. त्यामुळे रक्तातील ग्लुकाेजचे प्रमाण संतुलित राहते आणि साखरेचे प्रमाण कमी-अधिक हाेणे टाळले जाते.

कर्करोग आणि हृदयविकारासाठी उपयुक्त कसे‌?

पेरू हे फळ लाइकोपीन यासारख्या फायटोन्यूट्रिएण्टचा उतकृष्ट स्रोत आहे. लाइकोपीनमध्ये ट्यूमरविरोधी गुणधर्म असतात, जे कर्करोगापासून आपले संरक्षण करतात. पेरूच्या पानांचा अर्क औषधांमध्ये वापरला जातो आणि सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींना रोखण्याची क्षमता त्यांच्यात असते. पेरूमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन मोठ्या प्रमाणात असलेल्या कर्करोगाशी लढण्यास मदत करतो. २०१०मधील एका संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, पेरूच्या अर्कामुळे प्रोस्टेट कर्करोगामध्ये ट्युमरचा आकार बऱ्यापैकी कमी केला जाऊ शकतो. केवळ कर्करोगच नाही, तर हृदयविकारातही पेरू उपयुक्त आहे. पेरूच्या पानांचा चहा एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करू शकतो. त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल संतुलित राहते, असे संशोधनात दिसून आले आहे. या चहामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाची गती नियंत्रणात राहते. पेरूच्या पानांचा चहा नियमित पिल्याने आठ आठवड्यानंतर एकूण कोलेस्ट्रेरॉल, लिपोप्रोटीनची पातळी आणि ट्रायग्लिसराइड्स कमी झाल्याचे विविध संशोधनांत दिसून आले आहे. पेरूच्या फळातील पोटॅशियम आणि फायबर घटक रक्तदाब आणि रक्तातील लिपिड्स नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

पेरू खाण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती?

पेरू बिया आणि सालीसकट पूर्णपणे खाल्ला पाहिजे. काही जण पेरूची साल काढून खातात, मात्र ते चुकीचे आहे. सकाळी लवकर किंवा जेवणादरम्यान नाश्ता म्हणून तो खावा. तो सकाळीच खाणे चांगले कारण फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट साफ राहते. पेरूच्या फोडीला खनिज मीठ लावून खाणेही चांगले कारण ते पचनशक्ती वाढवते. काही जण कफ कमी करण्यासाठी मीठ आणि मिरपूड लावून पेरू खातात. मात्र पेरू ते न लावता खाणेच जास्त चांगले.