संजय जाधव

केरळमध्ये २०१८ पासून चौथ्यांदा निपा विषाणूची साथ दिसून येत आहे. आधीच्या निपाच्या साथीच्या वेळी आलेला अनुभव आणि त्यानंतर दोन वर्षे करोना संकटाच्या काळातील आव्हाने यामुळे राज्य सरकारकडून आता तातडीने पावले उचलण्यात आली. यामुळे निपाची रुग्णसंख्या सध्या तरी मर्यादित दिसत आहे. केरळमध्ये निपामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ५ जणांना आतापर्यंत संसर्ग झाला. निपाचा हा प्रकार बांगलादेशातील आहे. हा प्रकार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये शिरकाव करतो आणि त्याचा मृत्यूदरही अधिक आहे. निपाचा धोका नेमका किती वाढत आहे, याचा आढावा.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

विषाणू आला कोठून?

निपाचा विषाणू हा पहिल्यांदा १९९८ मध्ये शोधण्यात आला. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तो आढळून आला. वटवाघूळ आणि डुकरे यांच्या शरीरातील द्रवाच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा मानवाला संसर्ग होत होता. शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू अनेक शतके वटवाघळांमध्ये होता. त्याची जनुकीय रचना बदलत जाऊन अखेर त्याने धोकादायक रूप धारण केले. त्याचा संसर्ग आता एका मानवातून दुसऱ्या मानवाला होऊ शकतो.

लक्षणे कोणती आहेत?

निपाचा संसर्ग झाल्यानंतर प्रामुख्याने ताप, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, चक्कर येणे आणि उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. संसर्ग जास्त प्रमाणात असेल तर तो मेंदुज्वर आणि अपस्मारापर्यंत जातो. काही वेळा तर रुग्ण कोमामध्ये जाऊन मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. या विषाणूवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. केरळमध्ये आता आढळलेला निपा विषाणूचा बांगलादेशी प्रकार कमी संसर्गजन्य असला, तरी त्याचा मृत्युदर सरासरी ७० टक्के असल्यामुळे तो अधिक धोकादायक ठरतो.

आणखी वाचा-फ्रान्समध्ये आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी, नेमके कारण काय? जाणून घ्या…

आधी साथ कधी आली होती?

निपाची साथ सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये नोंदविण्यात आली. त्यावेळी तीनशेहून अधिक जणांना संसर्ग झाला तर, शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हा विषाणू हजारो मैलामंमध्ये पसरला असून, त्याचा मृत्यूदर ७२ ते ८६ टक्क्यांदरम्यान आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, ११९८ ते २०१५ या कालावधीत निपाचे सहाशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतात २००१ मध्ये आलेली साथ आणि त्याच वर्षात बांगलादेशात दोन वेळा आलेली साथ यात ९१ जणांना संसर्ग होऊन त्यातील ६२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या साथीत २३ जणांना संसर्ग होऊन त्यातील २१ जणांचा मृत्यू झाला होता. नंतर २०१९ आणि २०२१ मध्येही ही साथ आली होती.

केरळमध्येच सातत्याने प्रादुर्भाव का?

केरळमध्ये मागील पाच वर्षांतील निपाची ही चौथी साथ आहे. या वेळी आलेल्या साथीत दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जणांना सध्या संसर्ग झालेले आहेत. या तीन रुग्णांपैकी दोघे जण हे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. या रोगावर औषध नसल्याने केवळ लक्षणानुसार उपचार करण्याचे काम डॉक्टरांना आताही करावे लागत आहे. प्राण्यांतून मानवात पसरणाऱ्या रोगाच्या साथींची जागतिक पातळीवरील उदाहरणांपासून आपण धडा घ्यायला हवा. शेतीसाठी फळे खाणाऱ्या वटवाघळांचे अधिवास नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे ती मानवी संपर्कात जास्त येऊन त्यातून रोग पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे. केरळमध्ये विषाणूचा शिरकाव होण्यामागे येथील नागरिकांचे परदेशात जाणे-येणे अधिक असल्याचेही कारण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आणखी वाचा-मध्यप्रदेशातील वाग्देवी मंदिर आणि कमल मौला मशीद यांच्यातील नेमका वाद काय आहे?

सरकारचे नियोजन कसे?

देशातील पहिला करोना रुग्ण केरळमध्ये ३० जानेवारी २०२० रोजी आढळला होता. सरकारला आधीची दोन वर्षे निपाच्या साथीची हाताळणी करण्याचा अनुभव होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून करोना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या होता. आताही निपाचा रुग्ण आढळल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. कारण कोझिकोड जिल्ह्यात तापाचे सरासरीपेक्षा जास्त रुग्ण आढळू लागल्यानंतर तातडीने त्याची नोंद घेण्यात आली. रुग्णाचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू झाली. त्यामुळे वेळीच या विषाणूचा संसर्ग ओळखता आला.

यंत्रणेकडून प्रतिसाद कसा?

निपाचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर सरकारतर्फे १९ बहुस्तरीय पथक नेमण्यात आले आणि नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. आरोग्य अधिकारी, संशयित रुग्ण आढळलेल्या गावांचे सरपंच आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून कृती आराखडे तयार केले. सरकारने नऊ गावांमध्ये प्रतिबंधित विभाग जाहीर केले. या गावांमधील संशयित रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी तेथीलच आशा कर्मचाऱ्यांसह स्थानिक आरोग्यसेवकांना देण्यात आली. याचबरोबर या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीही पथके नेमण्यात आली आहेत. वेळीच उपाययोजना सुरू केल्यामुळे केरळ सरकारला निपाला रोखण्यात यश येईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com