Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये मोठ्या फरकाने काँग्रेसचा विजयाचा मार्ग सुकर होताना दिसत आहे. सकाळपासून पाच तासांच्या मतमोजणीनंतर काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेस १३३ जागांवर, भाजपा ७० आणि जेडीएस २३ जागी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार आणि कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतल्यानंतरही आम्ही विजयापासून दूर राहिलो. कुठे कमी पडलो? याचे नक्कीच चिंतन करू. कर्नाटक विधानसभेत २२४ मतदारसंघ आहेत. विधानसभेत विजय मिळवण्यासाठी ११३ जागांचे बहुमत असणे आवश्यक आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सहा कळीचे मुद्दे काय होते?

Maratha reservation protest Manoj Jarange Patil Antarwali Sarathi politics
मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ऐन निवडणुकीत शुकशुकाट; मनोज जरांगे दौऱ्यावर
nine lakh temporary jobs due to Lok Sabha election
लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास नऊ लाख तात्पुरत्या नोकऱ्या, कसा मिळणार रोजगार?
mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
lok sabha 2024, devendra fadnvis, vijay Wadettiwar, devendra fadnvis not criticise vijay Wadettiwar, vijay Wadettiwar not criticise devendra fadnvis , vijay Wadettiwar bjp entry, dharmrao baba aatram, vijay Wadettiwar bjp entry discussions, congress, state opposition leader
देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

१. काँग्रेसची आघाडी

काँग्रेसने मतमोजणीमध्ये आघाडी घेतली आहे. ११३ या बहुमताच्या आकड्यापुढे त्यांची मजल गेलेली दिसते. भाजपा ७० ते ८०, जेडीएस २० ते ३० च्या दरम्यान आहे. ही परिस्थिती पाहता काँग्रेस कर्नाटकात सत्ता स्थापन करणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मतमोजणीचे कल पाहून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षालाच विजय मिळणार आणि काँग्रेस १२० जागांपर्यंत मजल मारेल, असे भाकीत वर्तविले आहे.

काँग्रेस पक्षाच्या दिल्ली आणि कर्नाटक येथील कार्यालयात सकाळपासून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. भगवान हनुमानाचे फलक हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते निकालाचा आनंद व्यक्त करीत आहेत.

हे वाचा >> ईव्हीएम मशीन दक्षिण आफ्रिकेतून आणल्याचा काँग्रेसचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला; मग ईव्हीएम मशीन कुठे तयार होतात?

२. हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये न अडकता काँग्रेसने स्थानिक प्रश्नांना महत्त्व दिले

‘द इंडियन एक्स्प्रेस’चे प्रतिनिधी मनोज सीजी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन अतिशय जवळून केले होते. त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी तीन महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत असल्याचे सांगितले. पहिले, काँग्रेसने आपल्या पक्षात एकजूट असल्याचा संदेश मोठ्या खुबीने लोकांमध्ये दिला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात अनेक काळापासून वाद आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने सुरुवातीपासून या दोघांमध्ये वादाचा भडका उडणार नाही, याची काळजी घेतली. निवडणुकीच्या प्रचारातदेखील दोघांनीही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन ताकदीने पक्षाची भूमिका जनतेमध्ये नेली.

दुसरे, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पाच आश्वासने दिली. महिला-युवक यांच्या मोठ्या मतपेटीला चुचकारण्यात काँग्रेस यशस्वी होताना दिसत आहे. महिला आणि युवकांची मतपेटी पंतप्रधान मोदींच्या बाजूने नेहमी वळलेली दिसते. या वेळी काँग्रेसने महागाई, बेरोजगारी असे मुद्दे लावून धरत दोन्ही घटकांना आपल्या बाजूने वळविले.

तिसरे म्हणजे, बजरंग दलावरील बंदीची भाषा. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, निवडणूक जाहीरनाम्यात बजरंग दल आणि मुस्लीम पीएफआय या संघटनांबाबत बंदीची भाषा वापरायला नको होती. पण तरीही काँग्रेसने या मुद्द्यावरून माघार न घेता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री एम. वीरप्पा मोईली वगळता कुणीही या निर्णयावर टीका केली नाही. मात्र या मागणीमुळे मुस्लीम मतांचे एकत्रीकरण होऊन ते काँग्रेसच्या पारड्यात गेले असल्याचा अंदाज निकालावरून बांधला जात आहे.

हे पाहा >> Photos: “कितना मजा आ रहा है…” काँग्रेसच्या बाजूने निकाल झुकताच इंटरनेटवर मिम्सचा पाऊस 

३. भाजपाचे अपेक्षेपेक्षाही अधिक नुकसान

मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी अनेक एक्झिट पोल्सनी भाजपाला धक्का बसणार, असा अंदाज व्यक्त केला होता. सध्या भाजपा ७० ते ८० दरम्यान जागा जिंकेल असे दिसत आहे. २०१८ च्या निवडणुकीपेक्षाही भाजपाची कामगिरी खालावली आहे. तेव्हा भाजपाने १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. अतिशय कमी जागा मिळवल्यामुळे भाजपाने दक्षिणेतील एकमेव राज्य गमावले आहे.

१९८५ पासून कर्नाटकमध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात मतदारांचा कल असल्याचे दिसून आले आहे. मागच्या ३८ वर्षांत एकाही पक्षाला पुन्हा सत्ता मिळवता आलेली नाही. अपवाद फक्त २००४ आणि २०१८ चा आहे. जेव्हा काँग्रेसने जेडीएसशी आघाडीचा मार्ग अवलंबून सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला. मात्र २०१८ चा प्रयोग यशस्वी होऊ शकलेला नाही. भाजपाने काँग्रेस-जेडीएसचे आमदार फोडून २०१९ साली पुन्हा सत्ता स्थापन केली होती.

४. जेडीएसची मतदानाची टक्केवारी घटली, काँग्रेसची वाढली

२०१८ च्या तुलनेत यंदा काँग्रेसने या वेळी चांगली कामगिरी केली असून मतदानाच्या टक्केवारीत पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. ४३ टक्के मतदान केंद्रांवर काँग्रेसला निर्विवाद यश मिळाले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाच्या मतदानाच्या टक्केवारीत फारसा बदल झालेला नाही. २०१८ साली त्यांनी ३६ टक्के मतदान मिळवले होते. जेडीएसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जेडीएसला मागच्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के कमी मतदान झाले आहे.

आणखी वाचा >> Karnataka Election : काँग्रेसची आघाडीकडे वाटचाल! पण मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावरून काँग्रेसची डोकेदुखी कायम

५. सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी घेतली, मात्र मंत्र्यांची पिछाडी

सकाळी मतमोजणीच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये बसवराज बोम्मई, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या मतदारसंघातून आघाडी मिळवली. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान सरकारमधील मंत्र्यांची पीछेहाट पाहायला मिळाली. बी. श्रीरामाल्लू (बेल्लरी ग्रामीण), जेसी मधुस्वामी, मुरुगेश निरानी (बिलगी), बी. सी. नागेश (तिप्तूर), गोविंद कारजोळ (मुधोळ), व्ही. सोमन्ना (वरूना आणि चामराजनगर), डॉ. के सुधाकर (चिक्कबळापूर) आणि शशिकला जोले (निपाणी) हे माजी मंत्री पिछाडीवर असल्याचे दिसले.

६. छोट्या पक्षाची काँग्रेसला साथ, एकाकडून धोबीपछाड

काँग्रेसने जेडीएस या मोठ्या पक्षासह आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र एका छोट्या पक्षाशी त्यांनी आघाडी केली. तसेच दुसऱ्या एका छोट्या पक्षाने काँग्रेसला एका मतदारसंघात आव्हान दिले आहे.

कल्याण राजा प्रगती पक्ष (KRPP)

जी. जनार्दन रेड्डी, जे बीएस येडियुरप्पा यांच्या सरकारच्या काळात मंत्री होते. कोप्पल जिल्ह्यातील गंगावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या इक्बाल अन्सारी यांना रेड्डी यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. कर्नाटकातील खाण उद्योगातील बडे असामी म्हणून बेल्लारी ब्रदर्स यांची ओळख आहे. या तीन भावांपैकी जी. जनार्दन रेड्डी एक आहेत. त्यांनी मागच्या वर्षी २५ डिसेंबर रोजी स्वतःच्या KRPP पक्षाची स्थापना केली. रेड्डी यांच्या पत्नी गली लक्ष्मी अरुणा या त्यांच्याच पक्षाच्या तिकिटावर बेल्लारी शहरात निवडणूक लढवत आहेत. पण काँग्रेसच्या भारत रेड्डी यांनी त्यांना मागे टाकले आहे. याच मतदारसंघात जी. जनार्दन रेड्डी यांचे भाऊ गली सोमसेखर रेड्डी तिसऱ्या स्थानावर आहेत.

सर्वोदय कर्नाटक पक्ष (SKP)

सर्वोदय कर्नाटक पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. कर्नाटकातील २२४ जागांपैकी २२३ जागा हा पक्ष लढवत आहे. मंड्या जिल्ह्यातील मेलुकोट हा मतदारसंघ काँग्रेसने एसकेपी पक्षासाठी सोडला आहे. एसकेपी पक्षाचे पुट्टन्नाहैया (Puttannaiah) येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी जेडीएसच्या सी.एस. पुट्टराजू यांना मागे टाकले आहे.

४५ वर्षीय पुट्टन्नाहैया हे माजी शेतकरी नेते के. एस. पुट्टनाहैया यांचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांचा आवाज कर्नाटक विधानसभेत पोहोचायला हवा, यासाठी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केले होते.