भारतामध्ये सध्या सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये ‘केजीएफ- २’ या चित्रपटाचीच चर्चा सुरु असल्याचं चित्र दिसतयं. कन्नड सुपस्टार यशची मुख्यम भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने तिकीट बारीवर नवे विक्रम नोंदवले आहेत. या चित्रपटाने आधीचे सारे विक्रम मोडीत काढलेय. केजीएफ-२ ने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत ‘बाहुबली’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे. यशच्या या चित्रपटाने एका आठवड्यामध्ये कमाईचा २५५ कोटींचा टप्पा ओलांडलाय. तर जगभरामध्ये या चित्रपटाने ६०० कोटींहून अधिकचा गल्ला जमावलाय.

रॉकी भाईची ‘डोडम्मा’
प्रेक्षकांना ‘केजीएफ-२’मध्ये रॉकी भाईची दमदार अ‍ॅक्शन आणि डायलॉगबाजी प्रचंड आवडलीय. चित्रपटामध्ये रॉकी भाई अधीराला (संजय दत्त) टक्कर देताना दिसत आहेत. मात्र या दोघांच्या वादामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती रॉकी भाईची ‘डोडम्मा मशीन गन’. कन्नड भाषेमध्ये ‘डोडम्मा’चा अर्थ असतो ‘मोठी आई’. चित्रपटामध्ये रॉकी भाई या बंदुकीला ‘डोडम्मा’ याच नावाने हाक मारतो कारण ती त्याचं रक्षण करते. चित्रपटामध्ये रॉकी भाई या बंदुकीने सलग १० मिनिटं गोळीबार करत शत्रुला उद्धवस्त करताना दाखवण्यात आलाय. मात्र खरोखरच अशी बंदूक अस्तित्वात होती का? तिची ताकद किती होती यासंदर्भात आता चाहते नेटवर सर्च करताना दिसत आहेत. त्यामुळे याच बंदुकीच्या इतिहासावर टाकलेली ही नजर…

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

किती शक्तीशाली आहे ही बंदूक?
तुम्ही आतापर्यंत ‘केजीएफ-२’ चित्रपट पाहिला नसेल तर या चित्रपटामध्ये ८० च्या दशकातील गोष्ट दाखवण्यात आलीय. चित्रपटात दाखवण्यात आलेली ही मशीन गन त्यावेळी अनेक देशांच्या लष्करी जवानांकडे आणि विद्रोही संघटनांकडे होती. या मशीन गनचं खरं नाव ‘ब्राउनिंग एम १९१९’ असं आहे. अमेरिकन इंजीनिअर जॉन ब्राउनिंगने सन १९१९ मध्ये ही बंदूक बनवलेली. ही पॉइण्ट ३० कॅलिबरची एक मध्यम स्तराची बंदूक आहे. या बंदुकीचा वापर ‘दुसरे महायुद्ध’, ‘भारत-चीन युद्ध’, ‘कोरियन युद्ध’ आणि ‘व्हिएतनाम युद्धा’च्या वेळी करण्यात आला. या कालावधीमध्ये झालेल्या इतर छोट्या-मोठ्या युद्धांमध्येही या बंदुकीचा वापर करण्यात आला.

नक्की वाचा >> विश्लेषण : KGF चा अर्थ काय? भारतात नक्की कुठे आहे ही खाण ज्यातून काढण्यात आलंय ९०० टन सोनं

अमेरिकेने विकतल्या चार लाखांहून अधिक बंदुकी…
‘ब्राउनिंग एम १९१९’ या मशीन गनचे उत्पादन १९१९ ते १९४५ दरम्यान करण्यात आलं. या कालावधीमध्ये अमेरिकने जगभरामध्ये एकूण ४ लाख ३८ हजार ‘ब्राउनिंग एम १९१९’ गन विकल्या. २६ वर्षांच्या कालावधीमध्ये या बंदुकीचे एकूण आठ वेगवेगळे प्रकार निर्माण करण्यात आले. या बंदुकीचं वजनच १४ किलो होतं. या बंदुकीच्या बॅरलची लांबी २४ इंच इतकी होती. या बंदुकीचं वजन पाहता ती ट्रायपॉडच्या सहाय्याने जमीनीवर ठेऊनही वापरली जायची. ट्रायपॉडमुळे या बंदुकीला वेगाने एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवण्यास मदत व्हायची. तसेच ही बंदूक टँक आणि हेलिकॉप्टरवरही माऊंट करता यायची. सध्याच्या कालावधीमध्ये ही बंदूक ‘अॅण्टी-एअरक्राफ्ट गन’ म्हणून फायटर जेट्सला लक्ष्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते इतकी अद्यावत आहे.

एका मिनिटामध्ये किती गोळ्या? गोळ्यांचा वेग किती आणि त्या किती अंतरापर्यंत जातात?
‘ब्राउनिंग एम १९१९’ या मशीन गनचे वैशिष्ट्य हे आहे की यामधून १० प्रकारच्या गोळ्या झाडता येतात. या मशीन गनच्या सुरुवातीच्या उप-प्रकारामध्ये (व्हेरिएंटमध्ये) एका मिनिटामध्ये ४०० ते ६०० गोळ्या मारता यायच्या. या बंदुकीच्या सर्वात आधुनिक उप-प्रकारामध्ये म्हणजेच एएन/एमटू उप-प्रकाराची फायरिंगची क्षमता १२०० ते १५०० गोळ्या प्रती मिनीट इतकी आहे. या बंदुकीची मजल व्हेलॉसिटी म्हणझेच गोळ्या बंदुकीमधून सुटण्याचा वेग हा ८५३ मीटर प्रती सेकंद इतका होता. म्हणजेच जवळजवळ एक किमी प्रती सेकंद इतका गोळ्यांचा वेग होता. या बंदुकीची क्षमता दीड किलोमीटरपर्यंत गोळीबार करण्याची आहे. या बंदुकीच्या कार्टिरेज म्हणजेच मॅगझीनमध्ये २५० गोळ्यांचा एक याप्रमाणे बेल्ट लावले जातात. त्यामधूच ही बंदूक अनेक युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली.

..म्हणून रॉकी भाई सिगारेट बंदुकीने पेटवतो
‘ब्राउनिंग एम १९१९’ ही गोळीबार करण्याच्या बाबतीत अव्वल बंदूक आहे. यामधील तंत्रज्ञानामुळे बंदुकीला ‘क्लोज्ड बोल्ट शॉर्ट रिकॉयल ऑप्रेशन’ असं नाव देण्यात आलं होतं. गोळ्यांची संख्या, त्यांचा वेग आणि बंदुकीची ताकद यासारख्यामुळे गोळीबार केल्यावर बंदूक चांगलीच गरम व्हायची. ‘केजीएफ-२’मध्ये याच कारणामुळे रॉकी भाईला या बंदुकीच्या बॅरलच्या सहाय्याने सिगरेट पेटवताना दाखवण्यात आलंय. या गरम होण्याच्या मुख्य कारणामुळेच सतत या बंदुकीमध्ये बदल करत तिचे नवे उप-प्रकार तयार करण्यात आले. ही जगातील पहिली अशी मशीन गन होती जिला जीप, ट्रक, लष्करी वाहने, रणगाडे, लॅण्डींग क्राफ्ट्स, जमीन, चढण किंवा उतार असणाऱ्या ठिकाणी ट्रायपॉडच्या मदतीने लावून गोळीबार करता येत होता.

प्रत्येक देश बनवू लागला आपला उप-प्रकार
‘ए फोर’ या ‘ब्राउनिंग एम १९१९’च्या उप-प्रकाराच्या मदतीने अमेरिकेने ‘दुसऱ्या महायुद्धा’मध्ये चांगलं यश मिळवलं होतं. ‘कोरियन युद्ध’ आणि ‘व्हिएतनाम युद्धा’मध्येही या बंदुकीचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला. या बंदुकीचं ‘ए सिक्स’ उप-प्रकार फार कमी वजनाचं असेल अशी काळजी घेण्यात आली होती. यावेळेस बॅरचं वजन ३.८ किलोवरुन १.८ किलो करण्यात आलेलं. अमेरिकन नौदलनाने ‘ए फोर’ उप-प्रकारामध्ये बदल करुन त्यात ७.६२ मिलीमीटरचं नाटो चॅबरिंग करुन त्याला एमके-२१ एमओडी झिरो असं नाव दिलं. याच बदलेल्या ‘ब्राउनिंग एम १९१९’ने अमेरिकन लष्कराला ‘व्हिएतनाम युद्धा’मध्ये मदत केली होती. ही मशीन गन त्यावेळी एवढी लोकप्रिय झाली होती की प्रत्येक देश या बंदुकीमध्ये बदल करुन आपल्या सोयीनुसार तिचा नवा उप-प्रकार तयार करत होता. याच वेळी इंग्लंडने पॉइण्ट ३०३ कॅलिबरची बंदूक तयार केली.

भारतात किंमत किती?
भारतामध्ये सुरुवातीच्या काळात या बंदुकीची किंमत ६६७ डॉलर्स म्हणजे ५० हजार ८५४ रुपयांच्या आसपास होती. मात्र नंतर उत्पादन वाढल्यानंतर या बंदुकीची किंमत १४२ डॉलर्स म्हणजेच १० हजार ८२६ रुपये झाली. या मशीन गनचा वापर ८० च्या दशकामध्ये अमेरिकेत सर्वसमान्य व्यक्तीही करायच्या मात्र १९८६ मध्ये बंदुकींसंदर्भातील कायद्यामध्ये बदक करुन या मशीन गनच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लावण्यात आले.