इंद्रायणी नार्वेकर, प्रतीक्षा सावंत
घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात सोमवार, १३ मे रोजी सायंकाळी महाकाय, अवजड लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून भीषण दुर्घटना घडली. १२० फूट लांब आणि १२० फुट रुंदीचा जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळला. या दुर्घटनेत १४ जण मृत्युमुखी पडले, तर ७५ जण जखमी झाले. त्यानंतर बुधवारीही फलक पूर्णपणे हटवता आला नाही. अवाढव्य फलकाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, फलक हटवणे ही कामे यंत्रणांनी कसोशीने हाताळली. हे मदतकार्य कसे झाले, त्यात आव्हाने काय आहेत, येणाऱ्या अडचणींवर कशी मात केली जात आहे त्याची गोष्ट…

नागरिकांना फलकाखालून बाहेर कसे काढले?

सोमवारी दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकांनाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी २५० आणि ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेन तैनात करण्यात आल्या. क्रेनच्या साहाय्याने सोमवारी रात्री दोन्ही बाजूने जवळपास ४ फुटापर्यंत लोखंडी सांगाडा उचलण्यात आला. त्यानंतर सांगाड्याखाली जवळपास १०० मीटर आतपर्यंत शिरून एनडीआरएफच्या जवानांनी अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. फलकाखाली शिरताना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. कमी प्रकाशात कुठे, कोण अडकले आहे, त्याचा अंदाज घेत जखमींचा शोध घ्यावा लागत होता. त्यांची इजा वाढू नये, त्यांना आणखी त्रास होऊ नये याची काळजी घेत, घाबरेल्या जखमींना धीर देत जवानांनी जखमींना बाहेर काढले. त्याचवेळी कमीत कमी वेळात काम पूर्ण करण्याची कसरत त्यांना करावी लागत होती.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
Bhavesh Bhinde arrested
मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात
income limit for foreign education scholarship
विश्लेषण : परदेशी शिष्यवृत्तीबाबत उत्पन्न मर्यादेच्या अटीला विरोध का?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
Ghatkopar incident
VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

हेही वाचा >>> विश्लेषण : परदेशी शिष्यवृत्तीबाबत उत्पन्न मर्यादेच्या अटीला विरोध का?

आव्हाने किती?

केवळ क्रेन आणि मनुष्यबळ वापरून हे मदतकार्य करण्यात आले. फलक कोसळला तो भाग पेट्रोल पंपाचा आहे. फलकाखाली पेट्रोल, डिझेलच्या टाक्या आहेत. पेट्रोल पंपाची साठवण क्षमता ४० हजार लिटर पेट्रोल, ३० हजार किलो गॅस आणि ३० हजार लिटर डिझेल आहे. त्याचप्रमाणे अडकलेल्या गाड्यांच्या पेट्रोल, डिझेलच्या टाक्या फुटून तेही पसरले. त्यामुळे जोखीम अधिक होती. कोणत्याही विद्युत अवजारांचा, यंत्रांचा वापर केल्यास आग लागण्याचा धोका होता. त्यामुळे अखेर मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या सल्ल्याने क्रेन मागविण्यात आल्या. पुरेशा जागेअभावी एकाच क्रेनचा वापर करावा लागला. दरम्यान, मनुष्यबळाच्या साहाय्याने सांगड्याच्या बाहेरील परिसरात जवानांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, फलकाच्या लोखंडी सांगड्याचे वजन क्रेनच्या क्षमतेपेक्षाही अधिक होते. पाऊस पडून गेल्यामुळे फलकाखाली पाणी साचले होते. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी अविरतपणे मदतकार्यात सहभागी झाले होते. बहुतेकांनी दुर्घटना घडल्यापासून म्हणजे सोमवारी सायंकाळपासून काम सुरू केले होते, ते मंगळवार दुपारपर्यंत तैनात होते. मदतकार्यादरम्यान अनेक जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र त्यांचे कार्य सुरूच होते.

किती यंत्रणा कार्यरत?

मुंबई अग्निशमन दलामार्फत घटनास्थळी १२ फायर इंजिन, २ आरव्ही, १ सीपी, १ एचपीएलव्ही, १ डब्ल्यूक्यूआरव्ही, १ एमएफटी, १०८ आणीबाणी रुग्णसहाय्य सेवेच्या २५ रुग्णवाहिका, तर १ प्रमुख अग्निशमन अधिकारी, २ उप प्रमुख अग्निशमन अधिकारी, ५ वरिष्ठ केंद्र अग्निशमन अधिकारी, ६ केंद्र अग्निशमन अधिकारी तैनात आहेत. तर, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त, १ सहायक आयुक्त, १ कार्यकारी अभियंता, ३ सहायक अभियंता, १ कनिष्ठ अभियंता, २ मुकादम, ७५ कामगारांसह २५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक जीवरक्षक उपकरणांसह घटनास्थळी तैनात आहेत. १० जेसीबी, १० ट्रक, ५ पोकलेन, २ खाजगी गॅस कटर्स टीम, २ हायड्रोलीक क्रेन्स, २ हायड्रा क्रेन्स, ३ वॉटर टॅंकर्स , मेट्रो व एमएमआरडीएचे ५० कामगार , १० आपदा मित्र असे मनुष्यबळदेखील कार्यरत आहे.

हेही वाचा >>> केजरीवालांच्या घरी ‘आप’ च्या महिला खासदारांना मारहाण; कारण काय? कोण आहेत स्वाती मालीवाल?

फलक हटवण्यास इतका वेळ का?

या ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. लोखंडी खांब कापताना ठिणगी उडून आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगावी लागत आहे. ती घेऊनही बुधवारी सकाळी काम सुरू असताना अचानक तेथे आग लागलीच. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा केल्याने ही आग तत्काळ आटोक्यात आली आणि त्यानंतर काम पुन्हा सुरू झाले. कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले असून या सुट्या भागांसह राडारोडा हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. फलकाचे चार मोठे खांब हटवल्याशिवाय मदतकार्य पूर्ण होणार नाही. त्यापैकी प्रत्येक खांब कापावा लागत आहे. एक-एक भाग कापून उचलण्यासाठी ३ ते ४ तास लागत आहे.