RBI Digital Rupee: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात डिजीटल रुपी म्हणजेच व्हर्चुअल करन्सीची (Digital Rupee) सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बँकेने आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ पासून डिजीटल करन्सी लाँच केली आहे. त्याला सेंट्रल बँक डिजीटल करन्सी (CBDC) असंही म्हटलं जात आहे. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर जवळपास नऊ सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांसोबत केला जात आहे. त्याचा वापर होलसेल ट्रान्झेक्‍शनमध्ये होणार आहे. एक महिन्यात त्याचा वापर रिटेल व्यवहारातही होईल. या पार्श्वभूमीवर डिजीटल रुपी काय आहे आणि त्याचा वापर कसा होणार याचा हा आढावा…

डिजीटल रुपीत ब्‍लॉकचेन टेक्‍नोलॉजीचा वापर

डिजीटल रुपीत ब्‍लॉकचेन टेक्‍नोलॉजीचा वापर होणार आहे. क्रिप्टोकरन्सीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा जसा वापर होतो तसाच वापर डिजीटल रुपीत होणार आहे. आरबीआयनुसार या पेमेंटचा वापर सर्व नागरिक, व्यवसायिक, सरकार आणि इतरांनाही करता येणार आहे. डिजीटल रुपी म्हणजे एक कायदेशीर करार (लीगल टेंडर) असणार आहे. त्याचं मूल्य सेफ स्टोअरमधील लीगल टेंडर नोटप्रमाणेच (सद्यस्थितीतील नोटा) असेल.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

देशात आरबीआयची डिजीटल करन्सी (E-Rupee) लाँच झाल्यानंतर नागरिकांना स्वतःजवळ रोख पैसे ठेवण्याची गरज कमी होईल. स्वतः आरबीआयचं यावर नियंत्रण असल्याने या डिजीटल करन्सीची विश्वासार्हता आणि सुरक्षितता अधिक असणार आहे. CBDC देशाचं डिजीटल टोकण असणार आहे.

नऊ बँकांची डिजीटल करन्सीसाठी निवड

रिझर्व्ह बँकेने १ नोव्हेंबरपासून मोठ्या व्यवहारांसाठी डिजीटल रुपीचा वापर सुरू केला आहे. यासाठी एकूण नऊ सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांची निवड करण्यात आली आहे. यात भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी बँकांचा समावेश आहे. या प्रायोगिक प्रकल्पाला यश मिळाल्यानंतर यात इतर बँकांचाही समावेश केला जाणार आहे.

सध्या डिजीटल रुपीचा वापर कधी होणार?

१ नोव्हेंबरपासून डिजीटल रुपीचा मोठ्या व्यवहारांसाठी वापर होणार आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, याचा सध्या वापर सरकारी सिक्योरिटीजच्या खरेदी-विक्रीसाठी होणार आहे. पुढील एक महिन्यात रिटेल ट्रांझेक्शनसाठीही डिजीटल रुपीचा वापर होणार आहे.

दैनंदिन खरेदी विक्रीसाठीही डिजीटल रुपीचा वापर होणार

डिजीटल रुपीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार रिटेल (CBDC-R) आणि दुसरा प्रकार होलसेल (CBDC-W) वापराचा आहे. रिटेल CBDC सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांना म्हणजेच खासगी क्षेत्र (प्रायव्हेट सेक्‍टर), नॉन फायनन्शिअल कंज्‍यूमर्स आणि बिझनेससाठी वापरता येणार आहे. होलसेल CBDC चा वापर निवडक आर्थिक संस्थांनाच करता येणार आहे. रिटेल CBDC रिटेल ट्रांझेक्‍शनचंच इलेक्‍ट्रॉनिक रुप आहे. त्याचा वापर दैनंदिन खरेदी विक्रीसाठीही करता येणार आहे.

याचा वापर कसा करणार?

E-Rupee चा वापर आपल्या मोबाइल वॉलेटमधून करता येणार आहे. याशिवाय ग्राहकांना याचा वापर बँक मनी किंवा रोख रकमेसाठीही करता येणार आहे. म्हणजेच डिजीटल रुपीचा वापर करून ग्राहकांना रोख रक्कमही काढता येऊ शकणार आहे. कोणालाही पैसे पाठवण्यासाठीही याचा वापर होऊ शकणार आहे. CBDC इलेक्ट्रॉनिक रुपात तुमच्या खात्यावर दिसेल आणि त्याचा वापर करून रोख पैसेही काढता येतील. आपण मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने बँकेतील खात्याची माहिती तपासतो तसाच E-Rupee चा वापर करता येणार आहे. डिजीटल रुपीला UPI लाही जोडता येणार आहे. म्हणजेच त्याचा वापर गुगल पे, फोन पे, पेटीएम यातही होऊ शकणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : धनलक्ष्मी बँकेचे भागधारक आणि संचालक मंडळातील वाद नेमका काय? ‘आरबीआय’ने का केले आहे लक्ष केंद्रित?

डिजीटल करन्सीमुळे सरकारसह सर्वसामान्य आणि व्यावसायिकांना व्यवहारांसाठी कमी खर्च येणार आहे. डिजीटल करन्सी आली असली तरी देशातील विद्यमान ‘ट्रांझेक्‍शन सिस्‍टम’मध्ये बदल होणार नाही.