मलेरिया या आजाराने जगभरात दरवर्षी सहा लाख लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये ऑफ्रिकेतील उप-सहारा या प्रांतातील पाच वर्षांखालील लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. या रोगावर प्रभावी लस निर्माण करण्याची गरज आफ्रिकेसाठी सर्वोच्च प्राध्यान्य आहे. या लशीवर सध्या संशोधन सुरू असून अनेक वर्षांनंतर एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.
मलेरियावर प्रभावी लस सापडली?
जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘आरटीएस,एस/एस०१’ अर्थात ‘मॉस्क्यूरिक्स’ या मलेरियाच्या लशीला मान्यता दिली आहे. ‘ग्लॅक्सोस्मीथक्लिन’ (GlaxoSmithKline) या कंपनीने ही लस विकसित केली असून हे एक मोठे यश आहे. या लशीमुळे पाच वर्षांखालील मुलांच्या मलेरिया प्रकरणांमध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे. पाच वर्षांखालील मुलांना लशीचे पाच डोस पाजल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. या लशीमुळे आत्तापर्यंत हजारो लोकांचा जीव वाचला आहे.
Malaria Home Remedies: ‘हे’ घरगुती मसाले आहेत मलेरियावर रामबाण उपाय; जाणून घ्या सेवनाची पद्धत
ही लस विकसित करण्यासाठी तब्बल ३० वर्षांचा कालावधी लागला असून यासाठी अंदाजे ७०० दशलक्ष डॉलर्सचा खर्च आला आहे. जीएसके कंपनीने हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ला ‘मॉस्क्यूरिक्स’ लस बनवण्याची परवानगी २०२९ पर्यंत दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ७५ टक्के प्रभावी लशीच्या नियमाची पूर्तता करण्यात ही लस अपयशी ठरली आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२१ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली ‘आर २१/ मॅट्रिक्स एम’ ही मलेरिया लस पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ७७ टक्के प्रभावी ठरली होती.
‘आर २१’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालाची प्रतीक्षा
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ही लस ७७ टक्के प्रभावी ठरल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील निकालाकडे संपूर्ण आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे. चार आफ्रिकन देशांमध्ये पाच ते ३६ महिन्यांच्या मुलांवर या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यात आली आहे. बुरकिना फासो, केन्या, माली आणि टांझानियातील जवळपास चार हजार ८०० मुलांवर ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा निकाल २०२३ च्या शेवटपर्यंत येण्याची शक्यता आहे.
विश्लेषण: गौतम बुद्धांनी लोकांना भेट दिलेला कालानमक तांदूळ नेमका आहे तरी काय?
भारतात परिस्थिती काय?
पहिल्या टप्प्यातील सुरक्षा अभ्यास पूर्ण केल्यानंतर ‘ह्युमन मलेरिया इंन्फेक्शन मॉडेल’मध्ये लशींची चाचणी केली जाते. यासाठी लागणारी केंद्रं युरोप, युके, कोलंबिया आणि थायलंडमध्ये आहेत. मात्र, सुरक्षित आणि वैज्ञानिकदृट्या अद्यावत ‘ह्युमन मलेरिया इंन्फेक्शन मॉडेल’ भारतात उपलब्ध नाही. दरम्यान, दिल्लीच्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’च्या (ICGEB) शास्त्रज्ञांनी मलेरियाच्या दोन स्वदेशी लशींची पहिल्या टप्प्यातील सुरक्षा चाचणी केली आहे. पुढील टप्प्यासाठी लशींवर शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे.