What is Kavach in Indian Railways : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. या अपघाताचे कारण काय? अपघात होण्यामागे कुणाची चूक होती? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. एका बाजूला अपघातात जखमी झालेल्यांना वाचविण्यासाठी ओडिशा आणि केंद्र सरकार हरएक प्रकारे मदत करत आहे. जखमींवर उपचार होत असलेल्या रुग्णालयांबाहेर रक्तदान करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मानवतेसाठी हे सकारात्मक चित्र आहे. तरीही हा अपघात टाळता आला असता का? ज्या मार्गावर अपघात झाला तिथे रेल्वेची कवचप्रणाली का नव्हती, याबाबतचा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी माहिती दिल्यानुसार या मार्गावर सदर कवच उपलब्धच नव्हते.

कवचप्रणाली काय आहे?

दोन रेल्वेंची धडक रोखण्यासाठी मार्च २०२२ साली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणालीची चाचणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली होती. एटीपीप्रणालीला रेल्वे अपघातांपासून बचाव करणारे ‘कवच’ म्हटले जाते. रेल्वेच्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) विकसित केलेली कवच संरक्षणप्रणाली स्वदेशी असून भारतीय रेल्वेने या तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे.

pune railway station marathi news, pune station crowd marathi news
पुणे: रेल्वे प्रवाशांची रोजचीच लढाई! तिकीट असूनही गाडीत चढता येईना…
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

हे वाचा >> रेल्वे अपघात रोखण्यासाठी विशेष ‘कवच’; खुद्द रेल्वेमंत्र्यांनी घेतली चाचणी, पाहा Video

या प्रणालीवर २०१२ पासून काम सुरू झाले होते. त्या वेळी या प्रकल्पाचे नाव Train Collision Avoidance System (TCAS) असे देण्यात आले होते. ही प्रणाली विकसित करून रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचे भारतीय रेल्वेचे ध्येय आहे. या प्रणालीची पहिली चाचणी २०१६ साली करण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी सुधार करून २०२२ साली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची पुन्हा सुरूवात केली.

कवचप्रणाली कशी काम करते?

कवचप्रणालीनुसार लोको पायलट वेगमर्यादेनुसार मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर कवचप्रणाली कार्यरत होऊन रेल्वे गाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होते आणि तात्काळ गाडी थांबते. यामुळे समोरासमोर येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या गाड्यांची टक्कर टळते. रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर थेट निरीक्षण ठेवणे, रेल्वे फाटकाजवळून जाताना स्वयंचलित शिटी वाजणे, आपत्कालीन परिस्थितीत संदेश देणे, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचे काम ही कवच यंत्रणा करते. एखाद्या मार्गावर, रेल्वे गाडीत, रूळ आणि सिग्नलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येते.

एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन वेगवेगळ्या रेल्वेंवर तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवणे आणि त्यांना एकमेकांच्या हालचालींबाबत संदेश पोहोचवणे, हे या प्रणालीचे मुख्य काम आहे. जर एखादी रेल्वे चुकून सिग्नल तोडून पुढे निघाली, तर त्याच मार्गावरील इतर रेल्वे पाच किमी अंतरावर आपोआपच थांबविल्या जातात. म्हणून या यंत्रणेला ‘कवच’ असे समर्पक नाव देण्यात आलेले आहे. दुर्दैवाने भारतात सर्वच ठिकाणी ही यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नाही. रेल्वेच्या काही विभागातच ही प्रणाली कार्यरत आहे.

हे वाचा >> Odisha Train Accident : दोन दशकानंतर देशातला सर्वात मोठा अपघात; याआधी शेकडो मृत्यू होणाऱ्या अपघातांची मालिका पाहा

२०२२ साली झाली चाचणी

अपघात रोखण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या कवचाची सिकंदराबाद येथे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली लोको पायलट आणि चाचणीसाठी इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी या चाचणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये कवचप्रणालीची यशस्वी चाचणी दाखवण्यात आली आहे. क्लिपची सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यात ज्या ट्रेनमध्ये ते आहेत, त्याच ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी दुसरी ट्रेन दाखवली आहे.

या मार्गावर ही यंत्रणा बसविण्यासाठी एकूण १६.८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यानंतर नवी दिल्ली-हावडा आणि नवी दिल्ली-मुंबई या मार्गावरही कवचप्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या मार्गावर बसविण्यात येणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करून इतर ठिकाणी त्याचा विचार केला जाणार आहे.

कवचप्रणालीमुळे ओडिशाचा अपघात टळला असता?

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाल्यानंतर कवचप्रणालीची चर्चा होत आहे. मागच्या दोन दशकांतील सर्वात भीषण असा हा अपघात आहे. तीन रेल्वे एकापाठोपाठ एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला. हा लेख पूर्ण करीपर्यंत मृत्यूचा आकडा २६१ पर्यंत लांबला होता. तर जखमी प्रवाशांची संख्या ९०० हून अधिक आहे. कवचप्रणालीमुळे हा अपघात टळला असता, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. तरीही यातील तांत्रिक बाबी काय आहेत, हे उच्चस्तरीय चौकशीनंतरच कळू शकतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजना व्हायला हव्यात, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.