अन्वय सावंत
एकीकडे भारतात ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंची संख्या (८० हून अधिक) दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तानला एकही ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू लाभला नव्हता. मात्र, पाकिस्तानची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. आपल्या काळातील आशियामधील सर्वोत्तम बुद्धिबळपटू मानले गेलेले पाकिस्तानचे मीर सुलतान खान यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) मरणोत्तर ग्रँडमास्टर किताब बहाल केला आहे. मीर यांचे १९६६ मध्ये निधन झाले. त्यानंतर तब्बल ५८ वर्षांनी त्यांना ग्रँडमास्टर किताब द्यावा असे ‘फिडे’ला का वाटले आणि त्यांची कारकीर्द लक्षणीय का ठरते, याचा आढावा.

मीर सुलतान खान नक्की कोण आहेत?

मीर यांचा १९०३ साली मीठा तिवाना (आताचे ईशान्य पाकिस्तान) येथे जन्म झाला. मीर यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवले. वडिलांनी त्यांना पारंपरिक भारतीय नियमांनुसार बुद्धिबळ खेळण्यास शिकवले. पाकिस्तानातील एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मीर हे पंजाबमधील सर्वांत मोठ्या जमीनधारकांपैकी एक असलेले मेजर जनरल नवाब सर उमर हयात खान यांच्या हवेलीत काम करायचे. उमर यांनीच मीर यांच्यातील बुद्धिबळाची प्रतिभा हेरली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. मीर यांना इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते. त्यामुळे पुस्तके वाचून बुद्धिबळाचे बारकावे शिकणे त्यांना अवघड जात असे. मात्र, या अडचणीवर मात करत त्यांनी बुद्धिबळात यशस्वी कारकीर्द घडवली.

Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

हेही वाचा… ‘या’ ब्रिटिश विद्वानाने समोर आणले ज्ञानवापी मशिदीचे सत्य? काय सांगते त्याचे संशोधन?

मीर यांची कारकीर्द लक्षणीय का ठरते?

मीर हे त्यांच्या काळातील आशियामधील सर्वोत्तम बुद्धिबळपटू मानले जायचे. त्यांनी १९२९, १९३१ आणि १९३२ साली ब्रिटिश अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तसेच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी तीन वेळा इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी माजी जगज्जेते बुद्धिबळपटू होजे राऊल कॅपाब्लान्का यांना पराभूत करण्याची किमया साधली होती. मीर यांनी फ्रँक मार्शल आणि सॅविली तार्ताकोवर या नामांकित खेळाडूंवरही विजय मिळवले होते. तसेच त्यांनी अलेक्झांडर ॲलेखाइन आणि मॅक्स युवे या माजी जगज्जेत्यांना बरोबरीत रोखले होते.

मीर पाकिस्तानचे पहिले ग्रँडमास्टर कसे?

मीर यांची कारकीर्द फाळणीपूर्व भारतात घडली असली, तरी फाळणीनंतर ते पाकिस्तानात वास्तव्यास होते. त्यामुळे ते पाकिस्तानचे पहिले ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरले आहेत. ‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वारकोविच सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर असून तिथेच त्यांनी मीर यांना मरणोत्तर ग्रँडमास्टर किताब बहाल केला.

हेही वाचा… शिक्षण संस्‍थांचा दहावी-बारावी परीक्षांवर बहिष्‍कार कशासाठी?

मीर यांना मरणोत्तर ग्रँडमास्टर किताब देण्यामागे राजकीत हेतू आहे का?

मीर यांना निधनाच्या तब्बल ५८ वर्षांनंतर ग्रँडमास्टर किताब देण्यामागे राजकीत हेतू असल्याचा आरोप स्कॉटलंडचा ग्रँडमास्टर जेकब अगार्डने केला आहे. ‘‘मीर सुलतान खान हे बुद्धिबळातील मोठे नाव आहे. त्यांचे कर्तृत्व पाहता त्यांना ग्रँडमास्टर किताब मिळायला हवा यात दुमत नाही. मात्र, त्यांना हा किताब आता देण्यामागे राजकीय हेतू असल्याचे मला वाटते. पाकिस्तानात बुद्धिबळाचा प्रसार करण्यात ‘फिडे’ला खरेच रस आहे का, असा मला प्रश्न पडतो. द्वारकोविच हे रशियाचे दूत असल्याप्रमाणे वागत आहे,’’ असे आगार्डने ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) लिहिले. ‘‘फिडेने १९५० सालापासून ग्रँडमास्टर किताब देण्यास सुरुवात केली. त्यामुळेच मीर यांच्या काळातील कॅपाब्लान्का, अलेखाइन, लास्कर आणि अन्य दिग्गज बुद्धिबळपटूंना हा किताब मिळाला नाही. निधन झालेल्या व्यक्तींना हा किताब दिला जात नव्हता. मग आता काय बदलले? ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी अनेक दशकांची मेहनत लागते. त्यामुळे राजकीय हेतूखातर हा किताब बहाल केला जात असल्याचे दु:ख होते. मात्र, मीर यांच्या कामगिरीचा आणि झालेल्या गौरवाचा नक्कीच अभिमान वाटतो,’’ असेही आगार्ड म्हणाला.