पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ व १० जुलै अशा दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. चार दशकांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांनी केलेला हा पहिलाच दौरा असणार आहे. या दौर्‍यासाठी ते मंगळवारी मॉस्कोहून व्हिएन्नामध्ये आले. नवी दिल्ली आणि व्हिएन्ना राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी त्यांना विशेष निमंत्रण दिले होते. व्हिएन्नामध्ये पंतप्रधान मोदींचे आगमन होताच ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी आठवडाभरापूर्वी “पुढील आठवड्यात व्हिएन्ना येथे जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे“, अशी पोस्ट ‘एक्स’वर केली होती.

”ही भेट म्हणजे एक विशेष सन्मान आहे. कारण- ४० वर्षांहून अधिक काळात भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे आणि आम्ही भारताबरोबरच्या राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी करीत असताना ही भेट अधिक महत्त्वाची आहे”, असे नेहॅमर यांनी म्हटले आहे. हा दौरा देशासाठी किती महत्त्वाचा आहे? या दौर्‍यात मोदी कोणाकोणाला भेटतील? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Russian Emperor Paul I Russia once planned to invade and capture India
रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”

हेही वाचा : देशभरात झिका व्हायरसचा अलर्ट; हा विषाणू किती घातक? काय आहेत याची लक्षणं आणि बचावाचे उपाय?

पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रिया दौरा

चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांच्या निमंत्रणावरून मोदी ऑस्ट्रियाला भेट देत आहेत. पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मोदींनी ग्लासगो येथे ‘कॉप २६’च्या निमित्ताने तत्कालीन ऑस्ट्रेलियन चॅन्सलर, विद्यमान परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांची भेट घेतली होती. २०१७ मध्ये मोदींनी सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने सेंट पीटर्सबर्ग येथे ऑस्ट्रियाचे तत्कालीन चॅन्सलर ख्रिश्चन केर्न यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

पंतप्रधान मोदी या भेटीत ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेणार आहेत. चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी ते शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. मोदी भारत आणि ऑस्ट्रियातील उद्योगपतींनाही भेटणार आहेत. ते व्हिएन्नामध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधतील, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले.

ही भेट देशासाठी किती महत्त्वाची?

या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. क्वात्रा म्हणाले की, या भेटीमुळे भागीदारीची व्याप्ती वाढविण्यास, तसेच परस्परहिताच्या प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांचे निराकरण करण्यात मदत होईल. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा पुढे म्हणाले, “या भेटीमुळे आम्हाला द्विपक्षीय गुंतवणुकीतील महत्त्वाच्या क्षेत्रांवर, तसेच परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक व जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.” क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “ऑस्ट्रिया हा एक महत्त्वाचा मध्य युरोपीय देश आहे. या देशात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (यूएनआयडीओ), ऑफिस ऑन ड्रग्स अॅण्ड क्राइम (यूएनडीओसी), ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप (ओएससीई) यांची मुख्यालयेही आहेत.”

भारत-ऑस्ट्रिया स्टार्टअप ब्रिज फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आला आहे. दोन्ही देशांतील स्टार्टअपमधील सहयोग आणि माहितीची देवाणघेवाण वाढविणे हा या स्टार्टअप ब्रिजचा उद्देश आहे. “फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन देशांदरम्यान ‘स्टार्टर ब्रिज’ नावाचा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आणि आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. याव्यतिरिक्त भारत आणि ऑस्ट्रियाने स्थलांतराच्या करारावरही स्वाक्षरी केली,” असे परराष्ट्र सचिव म्हणाले. “दोन देशांतील गुंतवणुकीतील संबंधदेखील वाढतच आहेत. अनेक ऑस्ट्रियन कंपन्या भारतात आहेत,” असेही ते पुढे म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पश्चिम) पवन कपूर म्हणाले, “ऑस्ट्रियाशी देशाचे चांगले आणि स्थिर संबंध आहेत. आमचा फोकस नावीन्य आणि तंत्रज्ञानावर असेल.”

भारत-ऑस्ट्रिया संबंध

ऑस्ट्रियाने १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रियाने १९४९ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. १९५५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली होती. ऑस्ट्रियाच्या उदयामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५० च्या दशकात बजावलेल्या मोठ्या भूमिकेकडेही अलीकडे काँग्रेसने लक्ष वेधले. १९७० ते १९८३ दरम्यानचे ऑस्ट्रियाचे चॅन्सलर ब्रुनो क्रेस्की नेहरूंच्या जागतिक चाहत्यांपैकी एक होते. १९८९ मध्ये डॉ. क्रेस्की म्हणाले होते की, जेव्हा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरूंचा अध्याय असेल. अगदी सुरुवातीच्या काळात नेहरू माझे शिक्षक झाले होते, असेही ते म्हणाले. १९८० मध्ये तत्कालीन ऑस्ट्रियाचे चॅन्सलर ब्रुनो क्रेस्की यांनी भारताला भेट दिली होती.

त्या दौऱ्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ मध्ये ऑस्ट्रियाला भेट दिली होती. इंदिरा गांधींच्या १९८३ च्या दौऱ्यापाठोपाठ १९८४ मध्ये तत्कालीन चॅन्सलर फ्रेड सिनोवात्झ यांनी भारताचा दौरा केला. इंदिरा गांधींच्या दौऱ्यानंतर भारतातून एकाही पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली नव्हती. मात्र, ऑस्ट्रियाला भारतातील अनेक राष्ट्रपतींनी भेट दिली. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी १९९९ मध्ये ऑस्ट्रियाला भेट दिली होती. तत्कालीन अध्यक्ष हेन्झ फिशर यांनी २००५ मध्ये भारताला भेट दिली. २०१० मध्ये ऑस्ट्रियाचे चॅन्सलर जोसेफ प्रोल यांनी भारताला आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी २०११ मध्ये ऑस्ट्रियाला भेट दिली होती.

दोन्ही देशांतील व्यापार आणि सांस्कृतिक संबंध

‘ईटीव्ही भारत’नुसार, दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार हळूहळू वाढत आहे. ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’च्या मते, २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रियामधील द्विपक्षीय व्यापार २.९३ अब्जांचा होता. भारत ऑस्ट्रियाला इलेक्ट्रॉनिक्स, कापड, पोशाख, पादत्राणे व रसायने निर्यात करतो; तर व्हिएन्ना भारताला यंत्रसामग्री, ऑटोमोटिव्ह पार्ट व रसायने पाठवतो. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ३१ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ या कालावधीत ऑस्ट्रियाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी ऑस्ट्रियाचे फेडरल अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन, चॅन्सलर कार्ल नेहॅमर आणि राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष वुल्फगँग सोबोटका यांची भेट घेतली होती. त्यांनी ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. जून २०२३ च्या द्विपक्षीय संबंध प्रोफाइलनुसार या भेटीदरम्यान पाच करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली होती.

२०२२ मध्ये ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री शॅलेनबर्ग यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी राजकीय, आर्थिक, व्यावसायिक संबंधांसह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण विस्तारावर चर्चा केली होती. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये १६ व्या शतकापासून सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली आहे. “भारताचे तत्त्वज्ञ-कवी व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी १९९१ व १९२६ मध्ये ऑस्ट्रियाला भेट दिली होती. हा भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील सांस्कृतिक व बौद्धिक देवाणघेवाणीचा एक महत्त्वाचा टप्पा होता,” असे एमईए वेबसाइटवर म्हटले आहे.

ऑस्ट्रिया त्याच्या समृद्ध सांस्कृतिक व वास्तुशिल्पीय वारशासाठी ओळखले जाते आणि व्हिएन्ना हे संगीत व दिग्गज संगीतकारांच्या वारशासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे ३१ हजार भारतीय ऑस्ट्रियामध्ये राहत आहेत. त्यापैकी बहुतेक केरळ आणि पंजाबमधील आहेत. भारतीय नागरिक प्रामुख्याने आरोग्य सेवा क्षेत्रात आहेत. तसेच यात बहुपक्षीय यूएन संस्थांमध्ये काम करणारे व्यावसायिक, व्यापारी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. ५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रियामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता चहाही महागणार? कारण काय?

ऑस्ट्रियातील भारतीय नागरिकांमध्ये आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रिया दौऱ्याबद्दल भारतीय नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, ४० वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान देशाला भेट देत आहेत ही अभिमानाची बाब आहे. ‘एनआय’शी बोलताना मूळचे महाराष्ट्राचे असणारे ऑस्ट्रियातील रहिवासी समीर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे. माझ्या माहितीनुसार, भारतीय पंतप्रधान या देशाला भेट देऊन ४० वर्षे झाली आहेत आणि दोन्ही राष्ट्रांमधील सांस्कृतिक व आर्थिक संबंधांसाठी ही एक चांगली बाब असणार आहे, असे मला वाटते.”