दत्ता जाधव

राज्यासह देशभरातील कुक्कुटपालन (पोल्ट्री) उद्योगाला मागील दोन वर्षांपासून महागाईच्या झळा बसत आहेत. कोंबड्यांच्या खाद्याच्या दरात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसत आहे. शेतकऱ्यांना प्रती अंड्यामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. आगामी काळात अंडी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

खाद्यांच्या दरात नेमकी दरवाढ किती?

पोल्ट्रीतील अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या खाद्यासाठी मका, सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी, शिंपले आणि काही औषधांसह जीवनसत्त्वे आणि पोषक क्षारयुक्त अन्नांचा वापर केला जातो. हे खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रतिकिलो २८ रुपयांपर्यंत खर्च येत आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिकिलो खर्चात दहा रुपयांची वाढ झाली आहे. या पूर्वी खाद्याचा खर्च एकूण उत्पादनाच्या ८० टक्क्यांवर जात होता, तो आता १२० टक्क्यांवर गेला आहे. खाद्य तयार करण्यासाठी मका २५ रुपये, सोयापेंड ६६ रुपये, शेंगपेंड ५२ रुपये, तांदूळ भुस्सा २० रुपये, मासळी ४० रुपये आणि शिंपले ६० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यात पुन्हा औषधे, जीवनसत्वे आणि पोषक क्षारयुक्त अन्नांचा समावेश करावा लागतो. एकूण खाद्याच्या दरात ६०-७० टक्के वाढ झाली आहे. व्यवसाय तोट्यात सुरू आहे. दहा हजार पक्ष्यांमागे रोज २० हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री उद्योग महत्त्वाचा का?

पोल्ट्री उद्योगावर राज्यातील हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. तितक्याच लोकांना पोल्ट्रीत आणि चिकन सेंटरवर मिळणाऱ्या रोजगाराचे प्रमाणही मोठे आहे. शेती संलग्न व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योगात वाढ झाली आहे. शेतीत उत्पादित होणारा मका, गहू, सोयाबीनचा वापर करून अनेक शेतकरी खाद्यावरचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन वाया गेले आहे. बाजारात सोयाबीनचे दर साडेसात हजार रुपये क्विंटलवर गेले आहे, तर मकाही २७०० रुपये क्विंटलवर गेला आहे. सोयापेंड आयात केल्यास सोयाबीनचे दर पडतील म्हणून शेतकरी संघटनांचा सोयापेंड आयातीला विरोध आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योग अडचणीत आला आहे.

विश्लेषण: १ एप्रिलपासून जनजीवन पूर्ववत होणार? करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नवा आदेश काय सांगतो?

देशातील पोल्ट्री उद्योगाची उलाढाल किती?

जागतिक अंडी उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीन, अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. राज्यात रोज सुमारे एक कोटी अंडी उत्पादन होते. देशातील पोल्ट्री उद्योगाची उलाढाल २०२०मध्ये दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योगाचा वेगाने विकास होत आहे. आंध प्रदेश, तमीळनाडूनंतर राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. देशातून आखाती देशांसह ओमान, मालदीव, इंडोनेशिया, रशिया, बहारीन, व्हिएतनाम, नायजेरिया आदी देशांना अंडी, पूर्ण अंड्याची पावडर, अंड्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध पदार्थींची निर्यात होते. जागतिक बाजारात अंड्याची पावडर आणि उकडलेल्या अंड्याना सर्वाधिक मागणी आहे.

देशाच्या अन्नसुरक्षेत योगदान किती?

२०२१-२२च्या देशाच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार देशात २०१४-१५मध्ये ७८.४८ अब्ज अंडी उत्पादन होत होते. २०२०-२१ मध्ये ते १२२.११ अब्जवर गेले आहे. २०२२ मध्ये दरडोई दर वर्षी देशात ९१ अंड्यांचे उत्पादन होत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रथिनांची गरज भागविण्यासाठी अंड्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. देशांर्तगत गरज भागवून २०१५ मध्ये ८७ लाख ३ हजार २०० डॉलरची निर्यात झाली होती. सध्या हा निर्यातीचा आकडा एक कोटी डॉलरच्या पुढे गेला आहे.

विश्लेषण : परकीय चलन गंगाजळीत घट का झाली?

भविष्यातील आव्हाने काय?

दर अंड्यामागील तोटा एक रुपयांहून जास्त असल्यामुळे व्यवसाय तोट्यात गेला आहे. बँकांच्या कर्जाचे हप्ते थांबले आहेत. मार्चअखेरमुळे शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे. ही खाद्य दरवाढ परवडत नसल्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे गहू, तांदूळ आणि मका अनुदानावर देण्याची मागणी केली आहे. पण, सरकारकडून अनुदानावर काही मिळण्याची शक्यता कमीच आहे. तोटा वाढत असल्यामुळे शेतकरी पोल्ट्रीतील कोंबड्या चिकनसाठी विकत आहेत. नव्या कोंबड्या पोल्ट्रीत आणणे जवळपास बंद आहे. त्यामुळे आगामी काळात देशाच्या एकूण अंडी उत्पादनावर परिणाम होणार आहे. निर्यात राहू दे पण, देशाची गरज भागेल इतके तरी अंडी उत्पादन होण्याची गरज आहे. पण, सध्याची स्थिती कायम राहिल्यास गरजेइतकेही अंडी उत्पादन होणार नाही, असे चित्र आहे.

dattatray.jadhav@expressindia.com