-वैशाली चिटणीस

स्पेनमध्ये देशभर सातत्याने झालेल्या निदर्शनांनंतर बलात्काराचा कायदा बदलण्यात आला असून स्त्रीच्या स्पष्ट संमतीविना तिच्याशी ठेवलेले लैंगिक संबंध हा यापुढे बलात्कार मानला जाणार आहे. या कायद्यान्वये स्त्रियांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराविरोधात स्पेनने उचलेलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

स्पेनमधले बलात्कार कायदा बदलाला कारणीभूत प्रकरण काय आहे?

उत्तर स्पेनमधील पॅम्प्लोना येथे दर वर्षी ६ जुलैच्या दुपारी बैलांच्या झुंजीचा उत्सव सुरू होतो. तो १४ जुलैच्या मध्यरात्री संपतो. या उत्सवात भाग घेण्यासाठी तसेच तो बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमतात. २०१६मध्ये या उत्सवात एका १८ वर्षीय तरुणीवर ‘वुल्फ पॅक’ असे म्हणवून घेणाऱ्या पाच पुरुषांनी बलात्कार केला. सुरुवातीला त्यांना बलात्कार नाही, तर विनयभंगाची कलमे लावली गेली होती. त्यांना शिक्षाही त्यानुसारच झाली. त्यातील दोन जणांनी बलात्काराचे चित्रीकरण केले होते. त्यात संबंधित स्त्री मूक तसेच निष्क्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे या चित्रीकरणाच्या आधारे या खटल्याच्या न्यायाधीशांनी संबंधित स्त्रीची या लैंगिक संबंधांना संमती होती आणि त्यामुळे तो बलात्कार नाही, असा निवाडा दिला. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील या निवाड्यामुळे स्पेनमध्ये लैंगिक संबंधातील स्त्रीच्या संमतीची चर्चा सुरू झाली. देशभर निदर्शने झाली. २०१९ मध्ये तेथील सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल फिरवला आणि त्या पाचही जणांना ९ वर्षांवरून वाढवून १५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

आता कायदाबदल का होतो आहे?

या प्रकरणापासून स्पेनमध्ये बलात्कार कायद्यामधील त्रुटींची चर्चा सुरू झाली. आतापर्यंत, स्पेनमधील कायद्यानुसार आपली संमती नसताना आपल्याला धमकावून किंवा मारहाण करून लैंगिक संबंधांची सक्ती केली गेली हे सिद्ध करणे ही संबंधित स्त्रीची जबाबदारी होती. पण आता या प्रकरणानंतर स्पेन सरकारने बलात्काराचे कायदे कठोर केले आहेत. स्त्रीची स्पष्ट संमती नसताना लैंगिक संबंध हे आता कायद्याने गुन्हा ठरवले गेले आहेत.

या नव्या कायद्याची प्रक्रिया काय होती?

हा नवा कायदा ‘ओन्ली येस मीन्स येस’ याच नावाने ओळखला जातो. स्पेनच्या कायदेमंडळात तो २०५ विरुद्ध १४१ मतांनी संमत झाला. आता त्यानुसार स्पेनमधील गुन्हेगारी कायद्यातील कलमात दुरुस्ती केली जाईल. स्त्रीने स्पष्टपणे ‘होय’ म्हटले असेल तेव्हाच स्त्रीची लैंगिक संबंधांना संमती असेल, अन्यथा तो बलात्कार धरला जाईल असा त्याचा अर्थ आहे. संबंधित व्यक्ती आपल्या कृतीतून संमती व्यक्त करेल तेव्हाच तिची स्पष्ट संमती गृहित धरता येईल असे या कायद्यात म्हटले आहे.

नव्या कायद्यात आणखी काय काय तरतुदी आहेत?

‘ओन्ली येस मीन्स येस’ या नव्या कायद्यानुसार आता लैंगिक छळाची व्याख्या आणखी विस्तारली आहे. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या भावनिक तसेच लैंगिक शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना मोठी भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

युरोपमधील इतर देशांमध्ये बलात्कार कायद्यासंदर्भात काय परिस्थिती आहे?

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अभ्यासानुसार, ३१ युरोपीय देशांपैकी केवळ १२ देशांमध्ये स्त्रीच्या स्पष्ट संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार अशी बलात्काराची कायदेशीर व्याख्या आहे. त्यात बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांचा समावेश आहे. उर्वरित देशांमध्ये आत्तापर्यंत स्पेनमध्ये होते तसेच कायदे आहेत.