लोकांचे राहणीमान, जीवनशैली सातत्याने बदलत आहे. तसेच आजकाल लैंगिक आवडीही बदलताना दिसत आहेत. मागील काही काळात मानवाच्या लैंगिक ओळखीबाबत नवनवीन उलगडे झाले आहेत. आता लैंगिक ओळखीशी संबंधित सिम्बायोसेक्शुअल अट्रॅक्शन (Symbiosexual Attraction)ची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. एखाद्या नात्यामध्ये असणार्‍या दोन व्यक्तींप्रति आकर्षण निर्माण झाल्यास, त्या व्यक्तीला सिम्बायोसेक्शुअल, असे म्हटले जाते. संशोधकांचा असा विश्वास आहे की, ही नवीन लैंगिक ओळख अधिकाधिक सामान्य होत आहे. या नवीन संकल्पनेतून हे सिद्ध होते की, मानवी आकर्षण किंवा इच्छा या एका व्यक्तीच्या भेटीपुरत्या मर्यादित नाहीत. सिम्बायोसेक्शुअल अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय? याबाबत संशोधनात नक्की काय सांगण्यात आले आहे? याबाबत जाणून घेऊ.

सिम्बायोसेक्शुअल म्हणजे काय?

अमेरिकेतील सिएटल युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, लोक एखाद्या व्यक्तीऐवजी पूर्वीपासून बंधनात असलेल्या एखाद्या जोडप्याकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होऊ शकतात. लैंगिक वर्तनावर आधारित अभ्यास हे स्पष्ट करतो की, जोडप्यामध्ये असलेले नाते, त्यांच्या नात्यामधली ऊर्जा आणि त्यांच्यातील प्रेमसंबंधाचे हे आकर्षण असते. जोडप्यामधील प्रेमसंबंध पाहून उत्साह निर्माण होतो आणि आपणही त्या नात्यात सहभागी व्हावे, अशी भावना निर्माण होते, असे संशोधनात म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’नुसार, मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राच्या प्राध्यापक या अभ्यासात डॉ. सॅली जॉन्स्टन या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी स्पष्ट केले की, ही नातेसंबंधातील एक सामान्य आणि वास्तविक परिस्थिती आहे.

हेही वाचा : पृथ्वीवरील ‘गेटवे टू हेल’ म्हणून ओळखला जाणारा रहस्यमयी खड्डा काय आहे? त्याचा आकार वाढणं धोक्याचा इशारा आहे का?

सिम्बायोसेक्शुअल ही संकल्पनाच शैक्षणिक आणि सांस्कृतिक चर्चांमधून उद्भवली आहे की, विशिष्ट व्यक्ती लोकांपेक्षा त्यांच्यामधील संबंधांकडे अधिक आकर्षित होतात. ‘द पोस्ट’नुसार, अभ्यासात असे आढळून आले की, संशोधनात सहभागी झालेल्या ३७३ जणांपैकी १४५ जणांनी असे मत व्यक्त केले की, त्यांना नातेसंबंधातील व्यक्तींऐवजी जोडप्यांच्या बाबतीत आकर्षणाची भावना आहे. अभ्यास करणाऱ्या लेखकाला असेही आढळून आले की, जे लोक स्वतःला सिम्बायोसेक्शुअल म्हणून ओळखतात, ते स्वतःला एक्स्ट्रोव्हर्ट (लोकांशी लवकर जुळवून घेणारे) समजतात. सिम्बायोसेक्शुअल ही बाब विविध वयोगट, वांशिक गट, सामाजिक-आर्थिक वर्ग व लिंगांमध्ये आढळते.

ही संकल्पना प्रदीर्घ काळापासून समाजात असली तरी याची चर्चा मात्र आता होऊ लागली आहे आणि त्याला सिम्बायोसेक्शुअल, अशी एक ओळख मिळाली आहे. हॉलीवूड अभिनेत्री झेंडायाच्या एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चॅलेंजर्स’, ‘गॉसिप गर्ल’ व ‘टायगर किंग’मध्ये सिम्बायोसेक्शुअल संबंधांचे चित्रण दाखविण्यात आले आहे. त्यामुळे आता याची खुलेआम चर्चा होताना दिसत आहे.

सिम्बायोसेक्शुअलला ‘युनिकॉर्न’ म्हणतात का?

पुस्तकांमध्ये सिम्बायोसेक्शुअलला ‘युनिकॉर्न’, असे म्हटले गेले आहे. एकपत्नीत्व वा एकपतीत्व नसलेल्या संस्कृतींमध्ये हाच शब्द नकारात्मक रीतीने वापरला जातो. अशा व्यक्ती जोडप्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास तर इच्छुक असतात; परंतु त्यांच्या नातेसंबंधात गुंतण्यास इच्छुक नसतात. सॅली जॉन्स्टन यांच्या अभ्यासानुसार, या संबंधांमध्ये लैंगिक फायदे असले तरी गैरवर्तन, वस्तुनिष्ठता आदींचा अनुभव येऊ शकतो.

हेही वाचा : प्रकाशाच्या प्रदूषणाचा मानवजातीला धोका; रात्रीच्या रोषणाईने होतोय स्मृतिभ्रंश, कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लैंगिक आकर्षणाचे अजूनही वेगळे स्वरूप आहे का?

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या मते, जॉन्स्टन यांना विश्वास आहे की, लैंगिकतेमध्ये आपल्या माहितीपेक्षा बरेच काही आहे. त्या म्हणाल्या, “आम्हाला मानवी आकर्षण आणि इच्छेच्या स्वरूपाचा केवळ एक-एक अनुभव म्हणून पुनर्विचार करण्याची गरज आहे.” द प्लेजर स्टडी या मोठ्या उपक्रमात या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधनात मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधातील समाधानाबाबत लैंगिक ओळखीविषयी अधिक चांगले समाधान मिळविण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचे जॉन्स्टन यांचे सांगणे आहे. “मला आशा आहे की, या कार्यामुळे एकपत्नीत्व वा एकपतीत्व असलेल्या (मोनोगॅमस) आणि एकपत्नीत्व वा एकपतीत्व नसलेल्या (नॉन-मोनोगॅमस) अशा दोन्ही समुदायांमधील गुंतागुंत कमी होईल आणि लैंगिकतेतील इच्छेच्या संकल्पनांचा विस्तार होईल,” असे त्या म्हणाल्या.