आसिफ बागवान

इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवल्यापासून ही समाजमाध्यम कंपनी सातत्याने चर्चेत आहे. त्यातही निळय़ा पार्श्वभूमीवरी ‘बरोबर’ची खूण -‘ब्लू टिक’-वरून तर वादळच निर्माण झाले आहे. खातेधारकाची ओळख पडताळणी करून त्याला अधिकृत दर्जा देणारी ही ‘ब्लू टिक’ खूप आधीपासून मानाची समजली जाते. मात्र मस्क यांनी कंपनीचा ताबा घेताच आठ डॉलरचे शुल्क आकारून ही ‘ब्लू टिक’ कोणालाही घेता येईल, हे जाहीर केले. हा निर्णय तातडीने अमलात येऊन त्याचे दुष्परिणाम अवघ्या दोन-तीन दिवसांतच समोर येऊ लागले. अनेकांनी लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने बनावट ट्विटर खाती बनवून आणि आठ डॉलरचे शुल्क भरून ती आपल्या नावे केल्याचे उघड होऊ लागले. यामुळे प्रचंड गोंधळ सुरू झाल्यानंतर तूर्तास हा ब्लू टिकचा पर्याय बंद करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ही कल्पना सुरू कशी झाली आणि आता पुढे तिचे काय होणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न..

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”

‘ब्लू टिक’ची गरज का निर्माण झाली?
ट्विटर हे समाजमाध्यम जसजसे लोकप्रिय होऊ लागले तसतसे त्यावरील बनावट खातेधारकांची संख्याही वाढू लागली. विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींच्या नावाने बनावट खाती बनवून त्याद्वारे चुकीचे संदेश प्रसारित करणे, एखाद्याला शिवीगाळ करणे, राजकीय-सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील विषयांवर प्रक्षोभक भाष्य करणे किंवा त्या कथित भाष्यावरून एखाद्याची बदनामी करणे, असे प्रकार वाढू लागले. याचा त्रास साहजिकच त्या नामांकित व्यक्तींना होऊ लागला. यातील काहींनी याबद्दल ट्विटरला दोषी ठरवले. अमेरिकेतील एका बेसबॉल संघाच्या व्यवस्थापकाने तर अशाच प्रकरणात ट्विटरविरोधात अब्रूनुकसानीचा दावा गुदरला. अशा तोतयेगिरीवर उपाय म्हणून प्रसिद्ध व्यक्तींच्या खात्यांची पडताळणी करून त्यावर ‘ट्विटर व्हेरिफाइड’ अर्थान ‘ब्लू टिक’ दर्शवण्याची व्यवस्था ट्विटरने २००९ मध्ये सुरू केली.

त्या वेळी ट्विटरने काय म्हटले होते?
‘ब्लू टिक’चा प्रसार करताना ट्विटरने सुरुवातीला ही खातेधारकाची ओळख पडताळणी करणारी अधिकृत प्रक्रिया असल्याचे म्हटले होते. मात्र ही ओळख खरीच असेल, असा कंपनीचा दावा कधीच नव्हता. म्हणजे एखादे ट्विटर खाते पडताळल्यानंतर त्या व्यक्तीचेच आहे, याची खातरजमा करण्याची पद्धत ट्विटरने अंगीकारली. मात्र त्या खात्यावरून तीच व्यक्ती ट्वीट करते, याची खातरजमा करण्यास कंपनीने नकार दिला.

बातम्यांचा अधिकृत स्रोत
२००९ मध्ये सुरू झालेल्या ‘ब्लू टिक’चा फायदा नामांकित मंडळींना नक्कीच झाला. यामुळे अन्य ‘ट्वीटकऱ्यां’ना अशा ख्यातकीर्त व्यक्तींचे खाते अधिकृत आहे की नाही हे समजू शकले. त्यामुळे याचा वापर विविध क्षेत्रांतील कंपन्या, राजकीय मंडळीदेखील घेऊ लागली. त्यानंतर खुद्द ट्विटरने ‘ब्लू टिक’ची जाहिरात ‘अधिकृत माहितीचा स्रोत’ असे करण्यास सुरुवात केली. बऱ्याच अंशी ते खरेही ठरले. अधिकृत खात्यांवरून करण्यात आलेले ट्वीट असंख्य वेळा प्रसारमाध्यमांतील बातम्या किंवा चर्चेचा विषय ठरू लागले.

सामान्य खातेधारकांची झुंबड
‘ब्लू टिक’चा पर्याय लोकप्रियच नव्हे तर प्रतिष्ठेचाही मानला जाऊ लागला. ‘ब्लू टिक’ खाते असलेली व्यक्ती वलयांकित मानली जाऊ लागली. याबद्दल अन्य खातेधारकांचे आकर्षण वाढू लागल्याने ट्विटरने २०१६ मध्ये ‘ब्लू टिक’चा पर्याय सर्वासाठी खुला केला. मात्र त्याने झाले असे की ट्विटरकडे अर्जाचा महापूर आला. इतका की त्यांची पडताळणी करणेच कठीण बनू लागले. त्यामुळे कंपनीने ती योजनाच गुंडाळली.

मग हीच योजना २०२० मध्ये पुन्हा खुली कशी झाली?
‘ब्लू टिक’चा पर्याय सर्वसामान्यांसाठी २०२० मध्ये खुला करताना, काहीएक काळजी जरूर घेतली. यासाठी ट्विटरने सात वर्गवारी केली. सरकारी यंत्रणा, माध्यम संस्था, पत्रकार, कंपन्या, ब्रॅण्ड, मनोरंजन क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि कंटेंट निर्माते यांना ‘ब्लू टिक’ मिळवता येऊ लागली. या प्रत्येक वर्गासाठी पडताळणीचे निकष वेगवेगळे ठरवण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत ‘ब्लू टिक’चा कारभार चालत होता.

म्हणजे पुढला निर्णय एकटय़ा मस्क यांचा?
इलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनीचा ताबा घेतल्यापासून या कंपनीत उलथापालथ होऊ लागली आहे, इतके खरे. कर्मचारी कपात, कामाचे कडक नियम यांनी ट्विटरचे अंतर्गत विश्व तर ढवळून गेलेच, पण मस्क यांनी ‘ब्लू टिक’ पडताळणी प्रक्रियाच बदलून टाकली. दरमहा आठ डॉलर मोजून कोणालाही ‘ब्लू टिक’ मिळवता येईल, असे मस्क यांनी जाहीर केले आणि पुन्हा ट्विटरकडे ‘ब्लू टिक’साठी खातेधारकांचा ओघ सुरू झाला.

तोतयेगिरीला पुन्हा वाव..
आठ डॉलर मोजणाऱ्या कुणालाही ‘ब्लू टिक’ देणे सुरू होताच अगदी कुणीही कोणत्याही नावाने आपल्या ट्विटर खात्यांवर ब्लू टिक घेऊ लागले. शुल्कवसुलीमुळे पडताळणीचे धोरण मागे पडले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि तोतया खात्यांचा पुन्हा सुळसुळाट सुरू झाला. अनेक सेलिब्रिटींच्या नावाने बनावट खाती तयार करण्यात आली. इतकेच नव्हे तर मोठमोठय़ा कंपन्यांच्या नावाने ‘व्हेरिफाइड’ खाती बनवून फसवणूक सुरू झाली. परिणामी ‘ब्लू टिक’ योजनाच सध्या बंद केली आहे.

आता मस्क काय करणार?
मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेण्याआधी आणि नंतरही त्यावर असलेल्या बनावट खात्यांबद्दल ओरड चालवली होती. हे सगळे थांबवून आपण ट्विटर अधिक पारदर्शक करू, असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्याच सशुल्क ‘ब्लू टिक’ योजनेने ट्विटरवरील तोतयेगिरीला मोकळे रान दिले आहे. तूर्तास टिवटरने ही पद्धत बंद केली असली तरी, मस्क यांच्या आजवरच्या शैलीकडे पाहता याबाबत नेमके काय घडेल, हे सांगता येणे कठीणच आहे.

asif. bagwan@expressindia. com