जगप्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर वापरकर्त्यांच्या नावासमोर ‘ब्लू टिक’ असल्यास ते खाते बनावट नाही, असे समजले जात होते. याबरोबरच ट्विटरवर ज्या व्यक्तीच्या नावासमोर ब्लू टिक आहे, ती व्यक्ती समाजमाध्यमांत प्रतिष्ठित समजली जायची. मात्र या ब्लू टिकसाठीचे शुल्क न भरल्यामुळे जगातील तसेच भारतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावापुढची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. ट्विटरच्या या निर्णयानंतर अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती सर्वसामान्य ट्विटर वापरकर्त्यांच्या पंक्तीत येऊन बसल्या आहेत. या निर्णयानंतर ट्विटरचे ‘ट्विटर ब्लू’ सबस्क्रिप्शन काय आहे? जगभरातील कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नावापुढून ब्लू टिक हटवण्यात आली आहे. तसेच ट्विटरवरील ब्लू, गोल्डन, ग्रे अशा टिकचा काय अर्थ आहे? हे समजून घेऊ या.

ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन न घेतल्यामुळे कारवाई!

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने प्रतिष्ठित लोकांच्या खात्यावरील ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू, पत्रकार, राजकारणी यांचाही समावेश आहे. यामध्ये भारत सरकारच्या काही शासकीय विभागांच्या खात्यांचाही समावेश आहे. ट्विटर ब्लूसाठी पैसे न भरल्यामुळे या खात्यांसमोरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. असे असले तरी अगोदरपासून काही ट्विटर खात्यांना गोल्डन, ग्रे (राखाडी) रंगाचे व्हेरिफेकशन बॅच देण्यात आले आहेत.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

हेही वाचा >> विश्लेषण: लिंगायत स्थापक भगवान बसवेश्वर जयंती: १० मे कर्नाटक निवडणूक. का आहे या निवडणूक निकालाची धुरा लिंगायत समाजाच्या हाती?

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू ही नवी सुविधा लागू केली होती. पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यासाठी तसेच लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. या निर्णयापासून एखाद्या व्यक्तीला ट्विटरवर ब्लू टिक हवे असेल, तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात.

ट्विटरच्या या निर्णयाचा काय परिणाम झाला?

ट्विटरने ब्लू टिक काढून टाकण्याच्या निर्णयानंतर जगातील अनेक प्रसिद्ध लोकांची ट्विटर खाती सर्वसामान्य लोकांसारखीच झाली आहेत. डीडब्ल्यूने दिलेल्या वृत्तानुसार एलॉन मस्क यांनी हा निर्णय घेण्याअगोदर जगभरात साधारण तीन लाख लोकांच्या खात्यावर ब्लू टिक होते. मात्र गुरुवारपासून ब्लू टिक काढून घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर पॉपस्टार बियोन्स, शकिरा, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, रियालिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (ते सध्या ट्विटरवर सक्रिय नाहीत.) अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. दुसरीकडे बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स, लेखक स्टिफन किंग तसेच अभिनेता विल्यम शाटनर यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक कायम ठेवली जाणार आहे. या व्यक्तींच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिकसाठी खुद्द एलॉन मस्क पैसे मोजणार आहेत.

हेही वाचा >> सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस, कथित रिलायन्स इन्शुरन्स घोटाळा प्रकरण काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

क्रीडा, सिनेसृष्टीतील व्यक्तींच्या खात्यासमोरील ब्लू टिक गायब!

भारतात इलोक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून समाजमाध्यमांसंबंधीचे नियम ठरवले जातात. मात्र खुद्द याच मंत्रालयाच्या खात्यासमोरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यासोबतच प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो, दूरसंचार विभागाच्या खात्यावरील ब्लू टिकही हटवण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, क्रीडा क्षेत्रातील विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, स्मृती मंधाना, पी. व्ही. सिंधू आदी खेळाडूंच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटर ब्लूसाठी पैसे भरले आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्या खात्यासमोर ब्लू टिक अद्यापि लावण्यात आलेली नाही.

अनेक राजकीय व्यक्तींच्या खात्यासमोरील ब्लू टिक हटवले!

राजकीय क्षेत्रातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत या नेत्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. याबरोबरच आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, सीपीआय (मार्क्सवादी), डीएमके आदी पक्षांच्या ट्विटर खात्यांवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : बुलढाणा जिल्ह्यात भेंडवळची घटमांडणी परंपरा नेमकी काय? भाकीत कसे व्यक्त केले जाते?

ब्लू टिक हटवले, म्हणजे नेमके काय झाले?

ट्विटर ब्लू सुविधेअंतर्गत जे वापरकर्ते महिन्याला काही पैसे भरतील, त्यांच्याच नावासमोर ब्लू टिक येईल, असा निर्णय काही महिन्यांपूर्वी ट्विटरने घेतला होता. याआधी जे व्हेरिफाइड युजर्स आहेत, त्यांच्याच खात्याला ट्विटर ब्लू टिक द्यायचे. त्यासाठी ट्विटरकडून पैसे घेतले जात नव्हते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या खात्याची ओळख पटावी तसेच खोटी माहिती पसरू नये म्हणून ट्विटरने २०१४ साली हे फीचर आणले होते. मात्र एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर ब्लू टिकसंदर्भातील फीचरमध्ये बदल करण्यात आला. यापुढे जो ट्विटर वापरकर्ता पैसे भरणार त्याच्याच खात्यावर ब्लू टिक दिले जाईल.

१ एप्रिलपासून ब्लू टिक हटवण्यास सुरुवात!

विशेष म्हणजे ट्विटरवरील ब्लू टिक हटवण्याचा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. मस्क यांनी काही देशांमध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये ट्विटर ब्लू ही सुविधा जारी केली होती. मात्र या तेव्हाच्या निर्णयावर चौफेर टीका झाली. ट्विटर ब्लूसाठी प्रतिमहा २० डॉलर्स द्यावे लागतील, असा प्रस्ताव तेव्हा ट्विटरने ठेवला होता. मात्र टीका झाल्यानंतर हीच फीस ८ डॉलर्सपर्यंत कमी करण्यात आली. त्यानंतर या वर्षाच्या मार्च महिन्यात येत्या १ एप्रिलपासून ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली जाईल, अशी ट्विटरने घोषणा केली होती. यासह ट्विटरवर ब्लू टिक हवी असेल तर ट्विटर ब्लूसाठी साइनअप करावे, असेही ट्विटरने सांगितले होते. त्यानुसार आता जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या खात्यासमोरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : विधेयकांना राज्यपालांनी संमती देण्याकरिता कालमर्यादा निश्चित करता येईल का ?

ब्लू टिकसाठी किती रुपये मोजावे लागणार?

ट्विटरने जाहीर केलेल्या धोरणानुसार आता ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी ॲण्ड्रॉइड आणि आयओएस प्रणाली वापरकर्त्यांना प्रतिमहिना ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर वेब सर्व्हिससाठी ६५० रुपये द्यावे लागणार आहेत. वेब सर्व्हिससाठी ट्विटर वापरकर्ते ६८०० रुपये देऊन वर्षभराचे सबस्क्रप्शन घेऊ शकतात. वर्षभराच्या सबस्क्रिप्शनसाठी आयओएस आणि ॲण्ड्रॉईड प्रणाली वापरकर्त्यांना ९४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर वापरकर्त्यांना नेमके काय मिळणार?

जो वापरकर्ता ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन घेईल, त्या प्रत्येकाच्या खात्यासमोर ब्लू टिक दिले आईल. अशा वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू टिकसह अन्य सुविधाही मिळणार आहेत. त्यांच्या ट्वीट्सला सर्च रिझल्टमध्ये प्राधान्य दिले जाईल. तसेच त्यांना व्यक्त व्हायचे असल्यास शब्दमर्यादा वाढवून देण्यात येईल.

हेही वाचा >> भारत ठरला सर्वाधिक लोकसंख्येचा देश, चीनलाही टाकले मागे? UNFPA अहवालात नेमकं काय आहे?

ट्विटर अधिकृत आणि बनावट खाती कशी ओळखणार?

अगोदर ज्या ट्विटर वापरकर्त्याच्या नावासमोर ब्लू टिक आहे, ती व्यक्ती किंवा संस्था बनावट नाही, असे समजले जायचे. मात्र आता जो कोणी पैसे देईल त्याच्या खात्याला ब्लू टिक दिली जाणार असल्यामुळे कोणते खाते बनावट आहे आणि कोणते खरे, हे ओळखणे कठीण होणार आहे. ट्विटरवरील खाते खरे आहे का? हे ओळखण्यासाठी अन्य वेबसाइट्सवर शोध घेता येईल. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेकांकडून एखाद्या बनावट खात्याला खरे खाते समजण्याची चूक होऊ शकते. ट्विटरने बनावट खाती ओळखण्यासाठी अन्य पर्याय असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याची परिणामकारकता किती? हे अद्याप समोर आलेले नाही. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार “जो ट्विटर वापरकर्ता आपल्या खात्यावर प्रोफाइल फोटो ठेवील तसेच नाव देईल आणि ३० दिवसांपासून जे वापरकर्ते सक्रिय आहेत, त्यांनाच ट्विटरकडून ब्लू टिक दिले जाईल. ज्या ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या खात्यावरील प्रोफाइल फोटो, नाव तसेच युजरनेम नुकतेच बदलले आहे, अशा वापरकर्त्यांनाही ब्लू टिक दिले जाणार नाही,” असे ट्विटरने सांगितले आहे.

गोल्ड आणि ग्रे टिक म्हणजे नेमके काय?

शासनाशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थांच्या खात्यांना ट्विटरकडून ग्रे टिक दिले जात आहे. उदाहरणादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी व्यक्तींच्या ट्विटर खात्यासमोर ग्रे टिक देण्यात आले आहे. यासह मंत्रालये तसेच शासकीय विभागांच्या खात्यांनाही ग्रे टिक देण्यात आले आहे. यामध्ये गृह, संरक्षण, अर्थ, शिक्षण आदी खात्यांचा समावेश आहे. यासह दिल्ली पोलीस, मुंबई पोलीस यांच्या ट्विटर खात्यांनाही ग्रे टिक देण्यात आले आहे. मात्र सर्वच शासकीय संस्था विभागांना ग्रे टिक देण्यात आलेले नाही. इलेक्ट्रॉनिक्स माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला अद्याप कोणतेही टिक देण्यात आलेले नाही. मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यासमोर अजूनही ब्लू टिक आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : विदर्भात वाघ वाढले… परंतु क्षमतेचे काय?

ज्या ट्विटर खात्यांसमोर गोल्डन टिक आहे, ती खाती बिझनेस अकाऊंट आहेत, असे गृहीत धरले जाते. पेप्सी, मॅक्डोनाल्ड, बर्गर किंग अशा ब्रॅण्ड्सच्या ट्विटर खात्यासमोर गोल्डन टिक आहे. तसेच इंडियन एक्स्प्रेस, एनडीटीव्ही, इंडिया टुडे यांसारख्या माध्यम संस्थांच्या ट्विटर खात्यासमोरही गोल्डन टिक आहे.