Elon Musk’s Tesla Controversy: एलॉन मस्कने टेस्लाच्या चालक सहाय्यक, ‘ऑटोपायलट’ आणि ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ (FSD) सॉफ्टवेअरला रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून लाँच केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत टेस्ला ही मोठी प्रगती असल्याचं मस्क यांनी सांगितलं होतं. २०१५ मध्ये ऑटोपायलट लाँच केल्यापासून टेस्ला प्रणालीबद्दल मस्क यांच्या दाव्यांना अनेक अधिकृत आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांनीही टेस्लाकडून ऑटोपायलटसाठीच्या कायदेशीर नियमांची पायमल्ली होत असल्याचे दावे केले आहेत. ऑटोपायलट संदर्भातील नियम नेमके काय आहेत व एलन मस्क यांच्या टेस्लाकडून या नियमांची पायमल्ली होत आहे का हे सविस्तर जाणून घ्या.

ऑटोपायलटच्या बिघाडाबाबत खटले

१) लॉस एंजेलिसमध्ये २०१९ मध्ये ऑटोपायलट वापरत असताना एका जीवघेण्या अपघातानंतर मॉडेल एस ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा आरोप लगावण्यात आला होता. या प्रकरणात टेस्लावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती. कायदेतज्ज्ञांकडून हा खटला एक प्रकारची चाचणी म्हणून पाहण्यात आला होता. जरी ऑटोपायलट असलं तरी मानवी चालकाची जबाबदारीही लक्षात घ्यायला हवी असेही कायदेतज्ज्ञांनी म्हंटले होते.

Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
new atm scam
एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…

२) ५० वर्षीय जेरेमी बॅनर हे टेस्ला मॉडेल चालवत असताना फ्लोरिडाच्या महामार्गावरील चौकात ट्रॅक्टरसह धडक झाली होती. अपघाताप्रकरणी टेस्लाविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

३) २०१८ मध्ये टेस्ला मॉडेल X च्या अपघातात ड्रायव्हर, ऍपल अभियंता वॉल्टर हुआंग यांचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियामधील माउंटन व्ह्यू फ्रीवेवर एका काँक्रीट दुभाजकावर टेस्ला गाडी आदळली होती. टेस्लाविरुद्ध हुआंग यांच्या पत्नीने खटला दाखल केला होता.

टेस्लाबाबत कारवाई

नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या दोन्ही अपघातांची चौकशी केली होती. या खटल्यात वाहक व टेस्ला प्रणालीला दोष देण्यात आला होता. NTSB ने म्हटले आहे की ड्रायव्हर्स ऑटोपायलट सिस्टमवर खूप जास्त अवलंबून आहेत, तर टेस्ला प्रणालीतही ऑटोपायलटचा वापर करताना वाहकाच्या सतर्कतेची खबरदारी घेतलेली नाही.

विश्लेषण: जगभरात हेलियमचा तुटवडा; डॉक्टरांची चिंता वाढली; रुग्णांच्या चाचण्यांमध्ये येणार अडचणी!

ऑगस्टमध्ये, कॅलिफोर्नियाच्या वाहतूक नियामकाने टेस्लाच्या ऑटोपायलटद्वारे वाहन नियंत्रण करण्याच्या जाहिराती “फसव्या” असल्याचा आरोप केला. असे आढळून आल्यास कॅलिफोर्नियाचा मोटार वाहन विभाग (DMV) अधिकार क्षेत्रात वाहने विकण्यासाठी टेस्लाचा परवाना निलंबित करू शकतो तसेच अशावेळी कंपनीने चालकांना पूर्ण रक्कम परतफेड करणे आवश्यक आहे.

जूनमध्ये, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा विभागाच्या तपासात ऑटोपायलटसह ८ लाख ३० हजार टेस्ला वाहने सदोष आढळून आली होती. हे दोष दुरुस्त करण्यासाठी टेसला योग्य ती पाऊले उचलत आहेत का याकडेही ऑटो सेफ्टी रेग्युलेटर लक्ष देत आहे. NHTSA ने टेस्लाच्या अंतर्गत कॅमेर्‍याची माहिती मागवली आहे आणि तपासणीचा एक भाग म्हणून वाहकाच्या सतर्कतेवर लक्ष ठेवण्यासाठी त्याची भूमिकेबाबत विचारणा केली आहे. २०१६ पासून, NHTSA तर्फे टेस्ला वाहनांच्या अपघातात १९ मृत्यूंचा समावेश आहे.

दरम्यान यासंदर्भात टेस्लाकडून कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही.