Helium Shortage Around The World: जगभरात हेलियमचे प्रमाण कमी झाल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. खरंतर हवेपेक्षा हलका, काहीच रंग, गंध नसलेला हेलियमच्या कमतरतेने असं काय नुकसान होणार आहे असा प्रश्न आपल्यालाही पडला असेलच. नेमकं हेलियमच्या कमीचं कारण काय, यामुळे नक्की आपलं काय नुकसान होऊ शकतं व यावर उपाय काय याविषयी आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

हेलियम म्हणजे काय?

हेलियम हे वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा घटक आहे. हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय कमी तापमानाचा अपवाद वगळता हेलियम नेहेमी वायुरूपात सापडतो. हेलियम हा नॉन रिन्यूएबल म्हणजेच निर्माण न करता येणारा घटक आहे.

nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

हेलियम महत्त्वाचे का आहे?

अंतराळ मोहिमेत यानातील सेमीकंडक्टरच्या निर्मितीमध्ये हेलियम वापरला जातो. पाणबुडे, स्कूबा डायिव्हग म्हणजेच खोल समुद्रात जाताना श्वसनासाठी ऑक्सिजनसह, नायट्रोजन आणि हेलिअम असलेले सिलेंडर वापरले जातात.

नायट्रोजनच्या अपायाने ग्लानी येऊ नये म्हणून हेलिअमचा वापर होतो. ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हेलिअम असलेले हे सिलेंडर श्वसन-संस्थेच्या आजारावर वैद्यकीय क्षेत्रातही उपयोगी पडतात. एनबीसीच्या वृत्तानुसार हेलियम हा MRI मशीनसाठी अत्यावश्यक घटक आहे. एमआरआय मशीनमध्ये, चुंबकांना थंड ठेवण्याचे काम हेलियम करते.

विश्लेषण: Dove, TRESemmé च्या शॅम्पूने कॅन्सरचा धोका? Unilever का परत मागवत आहे उत्पादने?

एमआरआयमध्ये शक्तिशाली चुंबक व तारांचा वापर करून चुंबकीय क्षेत्र निर्माण केले जाते, यात विद्युत प्रवाह निर्माण होऊन एमआरआय काम करते. यासाठी अर्थातच मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. एका एमआरआयमध्ये एका वेळी सामान्यत: १७०० ते २००० लीटर द्रव हेलियम वापरले जाते. वैद्यकीय क्षेत्रात एमआरआय आवश्यक आहे आणि परिणामी हेलियमची गरज सुद्धा अनिवार्य आहे.

हेलियमची कमतरता का जाणवत आहे?

हेलियमचे साठे मर्यादित आहेत. विशेषत: युनाइटेड स्टेट्समध्ये हेलियमचे साठे आता फक्त वैद्यकीय उपयोगासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या वर्षापर्यंत हेलियमच्या पुरवठ्यासाठी अमेरिका रशियावर अवलंबून होती, परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार पूर्णपणे थांबला आहे. हेलियमच्या कमतरतेमुळे दरही वेगाने वाढत आहेत.

विश्लेषण: झाडांपासून बनवलेलं मांस म्हणजे काय? धोनी, कोहलीच्या आवडत्या या ‘व्हेज मीट’ची चव कशी लागते?

हेलियमला पर्याय काय?

एमआरआयमध्ये हेलियमला पर्याय नसला तरी जीई हेल्थकेअर व सायमन्स सारख्या कंपनी कमी हेलियम वापरणाऱ्या एमआरआय तयार करत आहेत.
सायमन्सने फक्त ०. ७ लिटर द्रव हेलियम वापरणारे एमआरआय विकसित केले आहे, तर GE चे मॉडेल पूर्व एमआरआयपेक्षा १. ४ पट अधिक कार्यक्षम आहे.