साधारणपणे दिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान येते. त्यानंतर थंडीला सुरुवात होते. थंडीत वातावरणात दमटपणा येतो आणि दिवाळीच्या काळात प्रदूषणात दुपटीने वाढ होते. हवेतील प्रदूषण, वातावरणातील दमटपणा आदींमुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. या काळात भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये धुके पसरते आणि प्रदूषणाची पातळी वाढते. वाहनांप्रमाणेच इतर स्रोतांमधून होणारे प्रदूषणही सुरू असते; मात्र फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाते. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न निर्माण होतो, की केवळ फटाक्यांच्या विक्रीवरच बंदी का घातली जाते. याचे कारण म्हणजे फटाके हे वायुप्रदूषणाच्या इतर स्रोतांसारखे नसतात आणि त्यात रसायनांचे अत्यंत विषारी मिश्रण असते. त्यातील काही रसायने प्रक्षोभक, काही विषारी व काही कार्सिनोजेनिक असतात. फटाके हे इतर अनेक वायुप्रदूषणाच्या स्रोतांपेक्षा घातक असतात. फटाक्यांचा हृदय आणि फुप्फुसावर नक्की काय परिणाम होतो? फटाक्यांत कोणते घटक असतात? त्याविषयी जाणून घेऊ.

फटाक्यांमुळे प्रदूषण दुप्पट

फटाक्यांमध्ये शिसे व आर्सेनिक यांसारखे जड धातू असतात. हा विषारी धूर श्वसनाद्वारे लोकांच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतो; ज्यामुळे आरोग्यावर अल्प व दीर्घकालीन दुष्परिणाम होतात, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्न्मेंटल मेडिसिनच्या पल्मोनोलॉजिस्ट रोहिणी चौघुले सांगतात. दिवाळीत फटाके फोडल्यामुळेच हवेचे प्रदूषण होत नाही, हे खरे आहे. उदाहरणार्थ- वाहने व उद्योगांमधून होणारे उत्सर्जन होते. तसेच, शेजारच्या पंजाब राज्यामध्ये पिकांचे खुंट जाळले जातात. या बाबींमुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता बिघडते. फटाक्यांतून निघणारा धूर हा प्रदूषणाचा एक प्रायोगिक व तात्पुरता प्रकार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजीच्या सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्चचे शास्त्रज्ञ व कार्यक्रम संचालक डॉ. गुफ्रान उल्लाह बेग निदर्शनास आणतात की, उत्सर्जन आधीच धोकादायक पातळीवर आहे. असे असताना फटाक्यांसारख्या प्रदूषकांची भर घालणे परवडणारे नाही. ते तात्पुरते असले तरी त्याचा परिणाम दीर्घकालीन आहे.

फटाक्यांमध्ये शिसे व आर्सेनिक यांसारखे जड धातू असतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?

फटाक्यांचे आरोग्यावरील घातक परिणाम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सामान्यत: फटाक्यांमध्ये आढळणाऱ्या रसायनांच्या ज्वलनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांची यादी तयार केली आहे. उदाहरणार्थ- ॲल्युमिनियममुळे अनेक फटाक्यांमध्ये चांदीचा रंग तयार होतो. त्याचा संपर्क त्वचारोगास कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे त्वचेची जळजळ होते. बेरियम नायट्रेट ऑक्सिडायझर म्हणून वापरले जाते, जे ज्वलनास मदत करते आणि हिरव्या रंगाचा प्रभाव निर्माण करते. या घटकामुळे श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो आणि किरणोत्सर्गी परिणाम होऊ शकतात. पोटॅशियम नायट्रेट, तांबे यांची संयुगे व अँटीमनी सल्फाइड हे घटक कार्सिनोजेन्स आहेत; तर आर्सेनिक संयुगाच्या राखेमुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. फटाक्यांत असणारे शिसे हवेत दिवसभर राहू शकते आणि त्यामुळे गर्भ आणि लहान मुलांमध्ये विकासात्मक विकारांना चालना मिळू शकते. त्यासह तांबे, ॲल्युमिनियम, पारा व शिसे हे धातू वातावरणात जमा होतात.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सामान्यत: फटाक्यांमध्ये आढळणाऱ्या रसायनांच्या ज्वलनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांची यादी तयार केली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंटच्या कार्यकारी संचालिका अनुमिता रॉय चौधरी म्हणाल्या, “फटाके जाळल्यानंतर निघणाऱ्या विषारी धुरामध्ये जड धातू असतात; ज्यांना कार्सिनोजेन्स म्हणतात. ही विषारी द्रव्ये स्थिर होऊन आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करीत आहेत.” त्या पुढे म्हणाल्या, “हे फक्त हवेच्या गुणवत्तेबद्दल नाही, तर फटाक्यांमध्ये वापरले जाणारे धातू आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर अतिशय घातक आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.” त्यामुळे कमकुवत फुप्फुसे, कमी प्रतिकारशक्ती, फुप्फुसीय रोग, उच्च रक्तदाब व हृदयविकार असलेल्यांसाठी परिस्थिती आणखीनच बिकट होते.”

हेही वाचा: ‘Aadhar Card’ला जन्म तारखेचा पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कारण काय? कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फटाक्यांवरील बंदी महत्त्वाची

फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालणे हे वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अत्यावश्यक आहे. परिस्थिती धोकादायक श्रेणीत जाऊ नये यासाठी अशा तात्पुरत्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असे तज्ज्ञ सांगतात. रॉय चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले की, फटाक्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी फटक्यांवर लावण्यात येणार्‍या बंदीचाही अनेकदा उपयोग होत नाही. त्यामुळे फटाके तयार करतानाच वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे नियमन करणे आवश्यक आहे. “लोक हे फटाके जंगलात जाऊन जाळत नाहीत. त्यामुळे प्रदूषणाच्या या प्रकाराशी जवळीक हाच त्याचा सर्वांत मोठा धोका आहे. फटाके जाळणारे काही लोकच असले तरी त्याचे दुष्परिणाम मात्र सर्वांवर होतात,” असेही त्यांनी सांगितले.