काही आठवड्यांपूर्वीच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचा मुंबई अहमदाबाद मार्गावरील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आपल्या मर्सिडीज या अलिशान गाडीतून प्रवास करत असताना भरधाव वेगात गाडीने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात आणि त्यात दोघांचा मृत्यू का झाला यासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहे. मात्र यापैकी सर्वाधिक चर्चेतील मुद्दा म्हणजे चालकाने बेजबाबदारपणे ओव्हरेट करण्याचा केलेला प्रयत्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट बांधला नव्हता.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री निती नगडकरी यांनी सरकार सीट बेल्ट बीप अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालणार असल्याची घोषणा केल्याच्या बातम्याही समोर आल्या. सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर या बातम्या समोर आल्या. मात्र सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्स म्हणजे काय? ते नेमकं कसं काम करतात आणि त्यावर बंदी घतल्याने प्रवास अधिक सुरक्षित कसा होईल यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. त्यावर टाकलेली ही नजर…

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्स म्हणजे काय?
सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्स या छोट्या आकाराच्या क्लीप असतात. या क्लीपच्या सहाय्याने सीट बेल्ट लावलेला नसल्यास वाजणारे बीपर्स म्हणजेच बीप बीप असा आवाज करणारी यंत्रण बंद करता येते. चालक आणि प्रवाशांनी सीट बेल्ट वापरुनच प्रवास करावा या हेतूने हे बिपर्स गाडीतील सुरक्षा यंत्रणांचा भाग म्हणून वापरले जातात. मात्र अनेकदा सीट बेल्ट घालण्याचा कंटाळा किंवा टाळाटाळ करणारे लोक या अलार्म स्टॉपर्सचा वापर करतात. या स्टॉपर्समुळे सीटबेल्ट लॉकिंग यंत्रणेला गंडवण्याचं काम केलं जातं, असं ड्राइव्ह स्पार्कने दिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. अलार्म स्टॉपर्स वापरल्याने गाडीतील सीट बेल्ट सुरक्षेसंदर्भातील अलार्म आणि एकूणच यंत्रणेला गाडीतील प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावला आहे असं वाटतं. सीट बेल्ट अलार्ट स्टॉपर्स हे ज्या ठिकाणी सीट बोल्ट खोचले जाताता तिथे खोचले जातात. सीट बेल्टच्या पट्ट्यावरील क्लीप प्रमाणेच या क्लीप असतात. फक्त त्या सीट बेल्टच्या पट्ट्यात अडकवलेल्या नसतात. केवळ क्लीप खोचून यंत्रणेला गंडवण्याचा हा प्रकार आहे. त्यानंतर अनेकजण सीट बेल्ट न लावताच प्रवास करतात. मात्र या अलार्म स्टॉपर्समुळे यंत्रणेला सर्वांनी सीटबेल्ट लावल्यासारखं वाटत असल्याने गाडीतील सीट बेल्ट लावण्यासंदर्भातील अलार्म वाजत नाहीत.

पुढच्या सीटवरील व्यक्तींच्या सुरक्षेची घेतली जाते काळजी, पण…
देशातील बहुतांश कार कंपन्या पुढील सीटवर बसणाऱ्या व्यक्तींसाठी अलर्म सिस्टीम देते. काही गाड्या तर सीट बेल्ट योग्य पद्धतीने लावला नसेल तर सुरुच होत नाहीत. मात्र मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी अशा सोयी उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत, असं एचटी ऑटोने दिलेल्या एका लेखात म्हटलं आहे.

गडकरी काय म्हणाले?
सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर नितीन गडकरींनी केंद्र सरकार सर्व प्रकारच्या सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालणार असल्याची घोषणा केली आहे. मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारवर आणि वाहतुकीसंदर्भातील नियम मागील सीटवर बसून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल फारसे गंभीर नसल्याची टीका केली जात असल्याने हा निर्णय घेतला जाणार आहे, असं हिंदुस्तान टाइम्सने म्हटलं आहे. याच वृत्तपत्राने गडकरींनी बंदीसंदर्भातील घोषणा केल्याची माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय जाहिरात असोसिएशनच्या परिषदेत बोलताना गडकरींनी, “जागतिक स्तरावरील रस्ते सुरक्षा नियमांसंदर्भात आम्ही कोणत्याही पद्धतीची तडजोड करणार नाही. यामध्ये रस्ते आणि गाड्यांसदर्भातील सर्वच घटकांचा समावेश आहे. मी सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सच्या निर्मितीवरील आणि वितरणावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत,” असं म्हटलं होतं.

लवकरच छापील स्वरुपात येणार नियम
रस्ते वाहतूक मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भातील नवी नियमावली आणि कायदेशीर बाबी लवकरच छापली स्वरुपामध्ये प्रकाशित केल्या जातील असं सांगितलं आहे.

कॅमेरांमधून लक्ष ठेवण्याचा विचार
रस्त्यावरील कॅमेरांची संख्या आणि क्षमता वाढवून मागील सीटवर बसून प्रवास करताना जे लोक सीट बेल्टचा वापर करत नाही त्यांच्याकडून दंड आकारण्यासंदर्भातील विचारही मी करत आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले होते.

सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सवर बंदी घातल्याने काय होणार?
या अलार्म स्टॉपर्सच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घाल्याने त्यांचा वापर करता येणार नाही. तसेच नव्या नियमांमुळे हे स्टॉपर्स वापरता येणार नाही. सीट बेल्टसंदर्भातील गाडीतील यंत्रणांना गंडवण्याचा हा मार्ग वापरता येणार नसल्याने सीट बेल्ट लावावेच लागणार आहेत.