दिल्लीत २८ वर्षीय आफताब पुनावालाने प्रेयसी श्रद्धा वालकरचा खून केला आणि गुन्हा लपवण्यासाठी तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही घटना समोर आल्यानंतर काही दिवसांमध्येच देशभरातून अशाचप्रकारे आपल्या प्रियजणांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे केल्याच्या इतर घटनाही समोर आल्या. त्यामुळे आफताब पुनावालाच्या निर्घृण कृत्याने इतर गुन्हेगारांना प्रेरणा मिळाली का? असा प्रश्न उपस्थित झालाय. या निमित्ताने खरंब आफताबच्या गुन्ह्याने इतरांना असे गुन्हे करण्याची प्रेरणा मिळाली आहे का? ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय? अशा गुन्ह्यांचा इतिहास काय? याचा हा आढावा…

उत्तर प्रदेशमध्ये प्रेयसीचा खून आणि मृतदेहाचे तुकडे

उत्तर प्रदेशमधील आझमगडमध्ये सोमवारी (२१ नोव्हेंबर) एका आरोपीला एकेकाळच्या प्रेयसीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यावरून अटक करण्यात आली. आरोपीचं नाव प्रिंस यादव असं आहे. प्रिंस यादवचे आणि आराधनाचे जवळपास दोन वर्षे प्रेमसंबंध होते. मात्र, नंतरच्या काळात प्रिंस परदेशात गेला. त्यानंतर फेब्रुवारीत आराधनाचे लग्न झाले.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

प्रेयसीने दुसऱ्यासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून प्रिंस यादवने आपल्या चुलत भावाच्या मदतीने आराधनाचा खून केला. तसेच आपला गुन्हा लपवण्यासाठी आराधनाच्या मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक बॅगमध्ये टाकले आणि गावाच्या बाहेर जमिनीत पुरले. पोलिसांच्या तपासात आराधनाचं डोकं एका तलावात सापडलं. या प्रकरणी आरोपी प्रिंसला अटक करण्यात आली.

पश्चिम बंगालमध्ये मुलगा आणि आईकडून खून आणि शरीराचे तुकडे

पश्चिम बंगालमधील बरुईपूर येथे ५५ वर्षीय माजी नौदल अधिकारी उज्वल चक्रवर्ती यांचा त्यांचीच पत्नी आणि मुलाने खून केला. उज्वल चक्रवर्ती यांनी त्यांची पत्नी आणि मुलाचा छळ केल्याचाही आरोप आहे. वडिलांनी मुलाला एका परीक्षेसाठी ३,००० रुपये देण्यास नकार दिला. त्यावरून घरात वाद झाला.

चक्रवर्ती यांनी मुलाच्या थोबाडीत लगावली. यानंतर मुलानेही प्रत्युत्तर दिलं आणि झटापटीत चक्रवर्ती यांचं डोकं खुर्चीवर आदळून त्यांचा मृत्यू झाला. हा गुन्हा लपवण्यासाठी आई आणि मुलाने मृतदेहाचे सहा तुकडे केले आणि बरुईपूर परिसरात विल्हेवाट लावली.

हेही वाचा : विश्लेषण: देशात पहिल्यांदाच आत्महत्यांना आळा घालण्यासाठीचं राष्ट्रीय धोरण; काय आहेत नेमक्या तरतुदी? याचा खरंच फायदा होईल?

अशाप्रकारे वरील घटनांमध्ये दिल्लीप्रमाणेच काही आरोपींनी आपल्या प्रियजणांचा खून केला आणि गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. त्यामुळे या सर्वांनी दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताबकडून तर प्रेरणा घेतली नाही ना अशी चर्चा होत आहे.

इतर गुन्ह्यावरून प्रेरणा घेऊन तशाचप्रकारे होणाऱ्या गुन्ह्यांना ‘कॉपीकॅट क्राईम’ असं म्हणतात. असं असलं तरी वरीलपैकी कोणत्याही गुन्ह्यातील आरोपींनी त्यांना दिल्ली प्रकरणातून प्रेरणा मिळाल्याचं म्हटलेलं नाही.

कॉपीकॅट क्राईम

कॉपीकॅट क्राईम म्हणजे वास्तवात घडलेल्या एखाद्या गुन्ह्यावरून प्रेरणा घेऊन किंवा काल्पनिक गुन्ह्यांवर आधारित मालिका/चित्रपटावरून प्रेरणा घेऊन तशाच प्रकारे केला जाणारा गुन्हा. ज्या गुन्ह्यांना माध्यमांमधून अधिक प्रसिद्धी मिळाली त्या गुन्ह्यांमध्ये अशाप्रकारची पुनरावृत्ती होण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते.

आतापर्यंत समोर आलेले कॉपीकॅट क्राईम हे बहुतांशवेळा प्रेरणा घेतलेल्या गुन्ह्यानंतर दोन वर्षात घडले आहेत. असं असलं तरी असे गुन्हे मूळ गुन्ह्यानंतर केव्हाही घडू शकतात.

आफताबही एक ‘कॉपीकॅट क्रिमिनल’

दिल्लीत श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा आरोपी आफताब पुनावाला हाही एक कॉपीकॅट क्रिमिनलच असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, आफताबने डेक्सटर या अमेरिकन क्राईम शोमधून प्रेरणा घेतल्याचं जबाबात म्हटलं आहे. त्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुन्ह्यांशी संबंधित अशा मालिका पाहण्याची आवड होती.

विशेष म्हणजे आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्याआधी २०१० मध्ये देहरादूनमध्ये घडलेल्या अनुराधा गुलाटी खून प्रकरणाचीही माहिती गुगलवर सर्च केली होती. त्या प्रकरणात आरोपी पतीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे ७० तुकडे केले होते.

हेही वाचा : Photos : दिल्लीत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, देहरादूनमध्ये अनुपमाचे ७२ तुकडे; दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं काय साम्य?

कॉपीकॅट ही संकल्पना कोठून आली?

कॉपीकॅट हा शब्दप्रयोग सर्वात आधी डिसेंबर १९६१ मध्ये न्यू यॉर्क टाईम्सच्या एका लेखात डेव्हिड ड्रेसलर यांनी केला. डेव्हिड एक समाजशास्त्रज्ञ आणि न्यू यॉर्क स्टेट परोल विभागाचे कार्यकारी संचालक होते. ‘द केस ऑफ कॉपीकॅट क्रिमिनल’ या पुस्तकात त्यांनी याबाबत सविस्तरपणे लिहिलं आहे. परदेशांमध्येही अशाचप्रकारचे अनेक गुन्हे घडल्याचं समोर आलं आहे.