अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद सध्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यामुळे चर्चेत आहे. उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आणि हा वाद सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी ट्वीट करत उर्फीचा समाचार घेतला नंतर या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आणि त्यांना पत्र दिलं. त्यात त्यांनी ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली होती. पण भारतात कोणी कसे कपडे परिधान करावे, याबद्दल काही नियम आहेत का? मुंबई पोलीस उर्फीवर कोणत्या कलमांच्या आधारे कारवाई करू शकते? आणि ती कारवाई झाल्यास शिक्षेची तरतूद काय? यासंदर्भात आम्ही अ‍ॅडव्होकेट उर्मिला देठे यांच्याशी चर्चा केली. याच काही प्रश्नांचा घेतलेला हा आढावा…

Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?

भारतात महिला व पुरुषांच्या कपड्यांबद्दल कोणते नियम आहेत?

या प्रश्नावर उर्मिला देठे म्हणाल्या, “भारतात सार्वजनिक ठिकाणी महिला व पुरुषांनी कसे कपडे घालावे, याबद्दल कोणतीच नियमावली नाही. आपण हवे तसे कपडे परिधान करू शकतो. पण काही धार्मिक ठिकाणं, शाळा किंवा एखाद्या संस्थेचे काही नियम असतील, ड्रेस कोड असेल तर तसे कपडे परिधान करावे लागतात. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये जाण्यासाठी ड्रेस कोड असतो, तो तिथल्या मंदिर प्रशासनाने ठरवलेला असतो. आपण त्या मंदिराचं, धार्मिक स्थळाचं पावित्र्य जपलं जावं, म्हणून त्या नियमांचं पालन करतो. पण इतर ठिकाणी मात्र तुम्ही कोणते कपडे परिधान करावे, यावर कोणतीही निर्बंध नाही.”

चित्रा वाघ म्हणाल्या “थोबडवून काढेन,” उर्फीने Instagram ला दिल्ली अपघाताचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाली “तुमच्या पक्षाशी…”

पोलीस उर्फीवर कोणत्या कलमांच्या आधारे कारवाई करतील?

याबद्दल बोलताना पोलीस उर्फीवर अश्लीलतेच्या आधारावर कारवाई करतील, असं उर्मिला देठे यांनी सांगितलं. आयपीसीच्या कलम २९२ अंतर्गत उर्फीवर कारवाई होऊ शकते. तिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतरच पोलीस या कलमेअंतर्गत कारवाई करू शकतील. चित्रा वाघ यांनी यांनी तिच्याविरोधात लेखी तक्रार दिली असेल, तर पोलीस ही कलम उर्फीवर लावतील, असंही त्या म्हणाल्या.

विश्लेषण : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ; नेमका वाद काय? चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी वादात का अडकते? वाचा नेमकं काय घडलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्लीलतेसाठी शिक्षेची तरतूद काय?

अश्लीलतेवरून पहिल्यांदा कारवाई झाल्यास ३ वर्ष तुरुंगवास आणि १ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच दुसऱ्यांदा या कलमेअंतर्गत दोषी आढळल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे, अशी माहिती उर्मिला देठे यांनी दिली.