स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. अल्पावधीच यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता (Actor Kiran Mane Removed From Mulgi Zali Ho Serial Of Star Pravah) दाखवण्यात आलाय. सोशल नेटवर्किंगवर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जातेय. मात्र हे नक्की काय प्रकरण आहे अनेकांना ठाऊक नाहीय.

मालिकेमधून काढून टाकण्याचा फोन आला तेव्हा काय सांगण्यात आलं? त्यानंतर काय घडलं?, कोणाशी फोनाफोनी झाली? एकूणच हे प्रकरण काय आहे याबद्दल खुद्द किरण माने यांनी खुलासा केलाय. पाहूयात नक्की काय झालंय…

What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
disagreement between joe biden benjamin netanyahu marathi news
विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. या पोस्टवरुन अनेकदा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला जातो. त्यांचीही पोलखोल किरण माने करत असतात. मात्र अशाप्रकारे राजकीय भूमिका घेणं त्यांना महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

नक्की वाचा >> “मी चॅनेल हेड सतीश राजवाडेंना फोन केला, पण…”; किरण मानेंनी सांगितलं ‘त्या’ कॉलनंतर काय घडलं

किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे.

आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. त्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सविस्तर काय घडलं यावर प्रकाश टाकलाय.

कोणाचा फोन आला आणि काय सांगितलं?
“मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. खूप छान टीआरपी त्याला आहे. विलास पाटीलचं पात्रही लोकांमध्ये फार लोकप्रिय झालं आहे. पण काल शुटींग संपल्यानंतर मला प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला. हिंदी प्रोडक्शन हाऊस आहे सुझाना घाई त्याच्या निर्मात्या आहेत. प्रोडक्शन हेड रजत नायर यांचा मला फोन आला. तुम्हाला रिप्लेस केलंय. विलास पाटील ही भूमिका साकारणारा कलाकार रिप्लेस करतोय. काहीजण तुमच्यावर नाराज आहेत, असं सांगून त्यांनी फोन ठेवला,” असं किरण मानेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> “मला म्हणतात की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात, पण…”; मालिकेमधून काढल्यानंतर किरण मानेंची रोकठोक प्रतिक्रिया

या फोनंतर किरण यांनी सतीश राजवाडेंना फोन केला पण…
मालिकेमध्ये रिप्लेस करण्यात येत असल्याचं सांगण्यात आल्यानंतर काय घडलं याबद्दलही किरण मानेंनी माहिती दिलीय. “या फोननंतर मी चॅनेलला फोन केला. सतीश राजवाडे चॅनेलचे हेड आहेत. त्यांनी फोन उचलला नाही. मग मी चॅनेलमधील माझ्या एका मित्राला फोन केला. त्याला मी विचारलं की कारण काय आहे हे सांगशील का?” किरण माने यांनी विचारलेल्या या प्रश्नावर त्यांच्या मित्राने किरण यांना मालिकेतून काढून टाकणार असल्याचं कळल्याचं सांगितलं. “एका महिलेने तक्रार केली की तुम्ही राजकीय पोस्ट करता,” असं या मित्राने सांगितल्याचं किरण माने म्हणालेत.

मला फरक पडत नाही पण…
“मला धक्काच बसला की राजकीय पोस्टचा आणि या कामाचा काय संबंध आहे? मी राजकीय भूमिका घेण्यापेक्षा विचारधारेची भूमिका घेतोय. मी विशिष्ट राजकीय पक्षावर लिहित नाही. मी पुरोगामी विचारसणीचा आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा मानणारा आहे,” असं आपली भूमिका स्पष्ट करताना माने यांनी सांगितलं. “मी एक किरण माने म्हणेल की जा मला नाही फरक पडत. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांचं पोट त्याच्यावर आहे. ते लोक घाबरतात,” असं किरण माने म्हणाले.

नक्की वाचा >> “मला कामावरुन काढून टाकलं तर…”; मालिकेतून काढून टाकल्याने अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना किरण मानेंचं उत्तर

चॅनेलवर दबाव
“मला चॅनेलवर पण आक्षेप नाही. त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणलाय. या दबावावार पण उत्तर देऊयात जेणेकरुन या सगळ्याचा पुन्हा विचार केला जाईल,” अशी आशा किरण मानेंनी व्यक्त केलीय.

घडलेला प्रकार अयोग्य
“नेत्यांबद्दल चांगली पोस्ट केल्यावर त्या पक्षाचा झालो असं नसतं. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे. राजकारणावर बोलू नका, लिहू नका असं सांगणं अयोग्य आहे, असं मला वाटतं,” अशा शब्दांमध्ये किरण माने यांनी घडलेला प्रकार अयोग्य असल्याचं सांगतानाच आपण आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचं म्हटलंय.

मला म्हणतात केंद्र सरकार विरोधात आहे
“मला म्हणतात की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात.एसटी संपाच्या वेळी मी एसटी कामागारांच्या बाजूने पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली. तुम्ही ती वाचू शकता. पब्लिक पोस्ट असतात माझ्या. मी राज्य सरकारच्या बाजूने असतो तर ती पोस्ट कशी लिहिली असती? कोणाचंही सरकार आलं तरी मी त्यावर जाब विचारत राहणार कारण हा माझा अधिकार आहे,” असा स्पष्ट शब्दांमध्ये किरण मानेंनी आपली भूमिका मांडलीय.

…तर मी एकटा लढेन
“कोणी पाठिशी उभं राहिलं नाही तरी मी एकटा लढणार आहे. कोणत्याही सरकारविरोधात बोलणं, पोस्ट करणं हा माझा अधिकार आहे. तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी होणं आवश्यक आहे,” असं म्हणत किरण मानेंनी आपल्या पोस्ट या सर्वच पक्षांविरोधात असतात असं सांगितलं आहे.
कलाकाराने का बोलू नये?कलाकाराने राजकारणावर बोलू नये असं मला काही जण सुचवतात. तर का बोलू नये कलाकाराने असा माझा प्रश्न आहे, असंही किरण माने म्हणालेत.

जीव गेला तरी…
“मला अश्लील भाषेत ट्रोल केलं जातं. मला कामावरुन काढून टाकलं तर मी खचलोय असं त्यांना वाटतंय. माझ्या पोस्ट खालच्या कमेंट वाचा. हा विखार, ही विषारी भाषा दिवसोंदिवस वाढत चाललेली आहे. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. नाहीतर अराजक माजेल. तुमचं जगणं मुश्कील होईल.आता कसं पाठिशी उभं राहायचं हे तुमचं तुम्ही ठरवात. हे तुमच्या हातात आहे. पण मी झाला लढा सुरु ठेवणार, मी लढत राहणार. यात माझा जीव गेला, बदनामी झाली तरी हरकत नाही,” असं किरण माने म्हणालेत.

बदनाम करण्याचा प्रयत्न…
“मला आता बदनाम करायचाही प्रयत्न होणार. बदनामी हे त्यांचं मोठं शस्त्र आहे. खोटे आरोप करुन माणसाला बदनाम करणं यात त्यांचा हातखंड आहे. माणसाला बदनाम करायचं, त्याला वेड्यात काढायचं. हे सारं फोफावतं चाललंय. आपण साऱ्यांनी विचार करुन त्याला आळा घातला पाहिजे,” असं किरण माने यांनी म्हटलं आहे.