प्रसाद रावकर

कुणे एकेकाळी समाजात ऐक्याची बिजे रुजविण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी सार्वजनिक उत्सवांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र कालौघात उत्सवांच्या आयोजनामागील उद्दिष्टच बदलत गेले. आता तर उत्सवांचे राजकीयीकरण होऊ लागले आहे. पैसे फेकेल त्या नेत्यांभोवती बहुसंख्य उत्सप्रेमी पिंगा घालू लागले आहेत. एकेकाळी उत्सवांमधून राजकीय नेते निर्माण होत होते. पण आताच्या राजकारण्यांनी उत्सवच बळकावल्याचे निदर्शनास येत आहे. दहीहंडी उत्सवही त्यातून सुटू शकला नाही. हे का, कसे आणि कधी झाले, त्याचा घेतलेला हा वेध.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दहीहंडी उत्सवाची सुरुवात कशी झाली?

अठरापगड जातींतील बांधवांना एकत्र करण्याच्या उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच धर्तीवर कृष्णजन्म आणि गोपाळकाला साजरा होऊ लागला. साधारण ९० ते ९५ वर्षांपूर्वी गोविंदा पथके आपापल्या परिसरात फिरून हा उत्सव साजरा करू लागली. त्यावेळी उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. ब्रिटिशांविरोधातील लढाई बळकट करण्यासाठी ऐक्य, समाज प्रबोधनाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन पथके कार्यरत होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, देशात लागू झालेली आणीबाणी, गिरणी कामगारांचा संप आदींबाबत भाष्य करणारे आणि सरकारवर टीकेचे आसून ओढणारे चित्ररथ, मानाच्या दहीहंड्या फोडून हा उत्सव साजरा होत होता.

हेही वाचा >>>सूर्याभोवतीचा कोरोना म्हणजे नेमके काय? ‘आदित्य एल-१’ मोहिमेतून कोणते रहस्य उलगडणार?

उत्सवाचे स्वरूप कसे बदलत गेले?

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सर्वच उत्सवांनी कात टाकली. गोविंदा पथकांची संख्याही वाढू लागली आणि दहीहंडी उत्सवाचाही नूर बदलला. एकेकाळी समाज प्रबोधन करणारी गोविंदा पथके विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये मूळ उद्देशच विसरून गेली. दिवसभर नाचगाण्याचा धिंगाणा, मद्यधुंद अवस्थेत थिरकणारे तरुण, दहीहंडी फोडण्याची जीवघेणी चुरस आणि परस्परांमध्ये हाणामाऱ्यांनी उत्सव गाजू लागला. मग उत्सवांमध्ये राजकारण्यांचा प्रवेश झाला आणि हळूहळू उत्सवाला राजकारणाची किनार लाभली.

उत्सवातील राजकीय समीकरणे..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच गोविंदा पथकांवर राजकीय पक्षांची छाप पडू लागली. कुणे एकेकाळी बहुसंख्य गोविंदा पथकांमध्ये शिवसेनेचा वरचष्मा होता. मुंबई-ठाण्यात २००० च्या दशकामध्ये उंच मानवी थर रचून दहीहंडी फोडण्याची चुरस सुरू झाली. केवळ मोठी नव्हे तर लहान गोविंदा पथकेही सात-आठ थर रचण्याचा अट्टाहास करू लागली. या उत्सवात शिरकाव करण्याची संधी हेरून सर्वपक्षीय नेते मंडळींनी दहीहंडीचे आयोजन करण्यास सुुरुवात केली. लाखमोलाच्या दहीहंड्या बांधून मतदारांना आकर्षित करण्याचा छुपा डाव त्यामागे होता. अनेक नेते मंडळी त्यात यशस्वी झाली आणि उत्सवाचे राजकीयीकरण झाले.

हेही वाचा >>>हरियाणातील ‘परिवार पहचान पत्र’ला काँग्रेसचा कडाडून विरोध; नेमके काय आहे या योजनेत?

मतपेढी आणि कार्यकर्त्यांच्या फौजेवर डोळा

उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सढळ हस्ते आर्थिक मदत करून अनेक राजकीय मंडळींनी मतपेढी वाढविण्याचा घाट घातला. इतकेच नाही तर त्या निमित्ताने कार्यकर्त्यांची मोठी फळीही नेते मंडळींच्या दिमतीला मिळाली. हेच कार्यकर्ते निवडणुकीत काळात नेत्यांसाठी मतांचा जोगवा मागत फिरू लागले. काही नेत्यांना त्यात यश आले तर काही जण अपयशी ठरले.

कोटीच्या कोटी उड्डाणे…

अनेक नेते मंडळींनी प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यासाठी दहीहंडी उत्सवाचा वापर केला. उत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमवून गोविंदांवर उधळण केली आणि करीत आहेत. मात्र ते पैसे कुठून आले हा प्रश्न आजतागायत कुणाला पडलेला नाही. एकट्या दहीहंडी उत्सवाची उलाढाल आजघडीला कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी आयोजकांकडे निधी कुठून येतो, दहीहंडी पथकांना आर्थिक रसद कशी मिळते याचा शोध फारसा घेतला जात नाही.

हेही वाचा >>>‘व्हायकॉम १८’ची भारतातील क्रिकेट प्रसारण हक्कांवर मक्तेदारी?

प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी?

प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याकडे कल वाढू लागला आहे. माजी पर्यावरणमंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात सध्या त्याचाच प्रत्यय येत आहे. भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात गोपाळकाल्याला दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. तत्पूर्वीच वरळीच्या एनएससीआय क्लबच्या आरावात शासनाच्या आडून शिंदे गटाने प्रो गोविंदाचे आयोजन करून ठाकरे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. आता मुंबई – ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील नेते दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाची व्यूहरचना करीत आहेत. परिणामी, दहीहंडीवरही राजकीय नेते मंडळींचे नाव कोरले जाऊ लागले आहे.

Story img Loader