रविवारी संध्याकाळी झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात चार पुरस्कार जिंकून बियॉन्सेने नवा इतिहास रचला आहे. अमेरिकन गायिका बियॉन्सेने सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी कलाकार हा बहुमान मिळवला आहे. ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात इंग्रजी, स्पॅनिश भाषेतील संगीत कलाकार आणि गायकांना सन्मानित केलं जातं. बियॉन्से आत्तापर्यंत सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी गायिका ठरली आहे.

१९९० च्या दशकात डेस्टिनी या चाइल्ड ग्रुपसह बियॉन्सेने तिची सांगितिक कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर काही कालावधी गेला आणि मग तिने सिंगल अल्बम आणला. सिंगल अल्बम आणल्यापासूनच बियॉन्सेच्या प्रत्येक संगीतप्रेमीच्या गळ्यातला ताईत बनली. बियॉन्सेचं २००३ मध्ये आलेलं गाणं क्रेझी लव्ह हे तिचं आत्तापर्यंतचं सर्वात लोकप्रिय गाणं आहे. बियॉन्सेने २००८ मध्ये सुप्रसिद्ध रॅपर जे जी सोबत लग्न केलं. तिला तीन मुलंही आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या रेनसां वर्ल्ड टूरची सुरूवातही ती करणार आहे तिने इंस्टाग्रामवर ही माहिती दिली होती. आपल्याला जो ग्रॅमी पुरस्कार मिळाला त्यामध्ये तिने सगळ्यांचे आभार मानले. Queer Community चे म्हणजेच एका विशिष्ट समुदायाचेही आभार बियॉन्सेने मानले.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?

आपण ज्या प्रकारची गाणी गातो, तसंच ज्या संगीत प्रकारात आम्ही संगीत देतो. त्याला डिस्को असंही म्हटलं जातं. डिस्को प्रकाराचे पायोनियर ज्यांना म्हणता येईल ती Queer Community आहे. या समुदायात गे, लेस्बियन समुदायातील व्यक्ती येतात. मी आज त्यांचेही आभार मानते असंही बियॉन्सेने आपल्या मनोगतात म्हटलं आहे. बियॉन्सेने या गटाचे आभार मानले कारण एका विशिष्ट प्रकारची संगीत शैली जतन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

डिस्को हा शब्द कसा निर्माण झाला?

डिस्को हा शब्द मूळ फ्रेंच शब्द डिस्कोथेक वरून घेतला गेला आहे. १९६० च्या दशकात जिथे वैविध्यपूर्ण संगीत वाजवलं जातं त्याला डिस्कोथेक असं संबोधलं जात होतं. क्लब्सन अशा प्रकारची नावंही देण्यास सुरूवात झाली. फ्रान्समधून डिस्को ही संकल्पना जेव्हा अमेरिकेत पोहचली तेव्हा या क्लबमधल्या संगीताचा किंवा म्युझिकचा एक प्रकार म्हणजे डिस्को होता. डिस्को हा संगीत प्रकार पूर्णपणे नवा होता कारण त्यात किक ड्रम्स, सिंथेसिसर यांचा मिलाफ होता. त्या काळातली अनेक गाणी डिस्को गाणी या प्रकारात मोडतात. एवढंच काय बप्पी लाहिरी यांनी संगीत दिलेली डिस्को डान्सर, याद आ रहा है सारखी हिंदी गाणीही डिस्को प्रकारात मोडतात.

डिस्को आणि क्विअर समुदायांमधील दुवा काय आहे?
डिस्को संगीत कसे तयार केले आणि ऐकले यात दडलेले आहे. पत्रकार सारा मार्शल आणि पॉडकास्टर मायकेल हॉब्स यांनी त्यांच्या पॉडकास्ट ‘यू आर रॉंग अबाऊट’ च्या एका एपिसोडमध्ये सांगितले की त्या वेळी नाईट क्लबमध्ये लोक नाचत राहतील अशा संगीताची कमतरता होती. न्यू यॉर्क सारख्या शहरांतील डीजेने त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या गाण्यांना त्यांच्या स्वतःच्या, लांब आवृत्त्यांमध्ये कापून एकत्र जोडण्यास सुरुवात केली, सहा किंवा सात मिनिटांपर्यंत – त्या वेळी हा एक वेगळा प्रकार होता. डी. जे. आत्ता ते सर्रास करताना दिसतात.

डिस्को चा प्रसार कसा झाला आणि नंतर आलेख कसा खाली आला?
१९६० च्या दशकानंतर अनेक सामाजिक बदलांचा काळ होता, ज्यामध्ये १९६९ च्या स्टोनवॉल दंगलींसह नागरी हक्कांसाठी चळवळी उदयास आल्या, ज्या नंतर LGBTQ समुदायाला एकत्र आणण्यासाठी एक ऐतिहासिक घटना घडली. पॉडकास्टने DJing च्या इतिहासावरील ‘लास्ट नाईट ए डीजे सेव्ह्ड माय लाइफ’ या पुस्तकाचा हवाला यासाठी दिला आहे. डिस्कोचा प्रसार सुरूवातीला वेगाने झाला होता. पण त्यानंतर या गाण्यांचा आलेख काहीसा खालीही आला. जगभरात यासाठी अनेक घडामोडी घडल्या. आता ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या बियॉन्सेने तिच्या सन्मानासाठी Queer Community चेही आभार मानले आहेत.