ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्यानंतरही भारताची विनेश फोगटला मर्यादेपेक्षा अधिक वजन भरल्याने अंतिम फेरीसाठी अपात्र ठरविण्यात आले. यानंतर एक भारतीय खेळाडू म्हणून तिला संपूर्ण देशातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मात्र, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत खेळताना भावनांना महत्व नसते, तेथे नियमांचे काटेकोर पालन केले जाते. विनेशने या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. मात्र, तीन वेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर क्रीडा लवादाने विनेशची याचिका फेटाळण्याचा निर्णय दिला. या निर्णयासाठी नेमका काय आधार घेण्यात आला, या विषयी…

विनेश फोगटचा नेमका वजनी गट कोणता?

विनेशचे नैसर्गिक वजन ५६ किलो असून, ती ५३ किलो वजनी गटातून खेळत होती. यापूर्वी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश ४८ किलो वजनी गटातून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती. मात्र, संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) ऑलिम्पिक वजनी गटात बदल केल्यामुळे विनेशने ४८ किलो वजनी गटाऐवजी वजन वाढवून ५३ किलो गटातून खेळण्यास सुरुवात केली होती. टोक्योत विनेश याच वजनी गटातून खेळली. ती इतरही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने यश मिळविले.

congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
PM Narendra Modi US visit, Narendra Modi US,
अमेरिकेने भारताला ‘गिऱ्हाईक’ समजू नये…
rashtriya swayamsevak sangh, ideology
‘राष्ट्र निर्माण’ हे संघाचे ध्येय आहे… पण कसे राष्ट्र?
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?
UPSC Preparation International Association
upsc ची तयारी: आंतरराष्ट्रीय संघटना
Anil Kakodkar, technology, Sangli ,
नक्कल करण्यापेक्षा आपले तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज – काकोडकर
UPSC Preparation Foreign Policy of India career news
upscची तयारी: भारताचे परराष्ट्र धोरण

हेही वाचा : Egyptian Mummies:९०० वर्षे जुनी दफने, भाजलेली माती, शवपेटी आणि बळी देण्याची जागा पाहून पुरातत्त्वज्ञ चक्रावले; इजिप्तमधील नवीन उत्खनन काय सांगते?

५३ किलो वजनी गट का सोडावा लागला?

टोक्यो ऑलिम्पिकनंतर मायदेशी परतल्यावर देखिल विनेशने ५३ किलोतूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून सहभाग घेतला. मात्र, दरम्यानच्या काळात भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर विनेशचे कुस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. या बंडाच्या दरम्यान झालेल्या जागतिक स्पर्धेत विनेश खेळू शकली नाही. मात्र, याच स्पर्धेत भारताकडून सहभागी झालेल्या अंतिम पंघालने कांस्यपदक मिळवून भारताला ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवून दिली होती. त्यामुळे विनेशने ५० किलो वजनी गटाची स्वेच्छेने निवड केली आणि आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतून कोटा मिळविला. यानंतरही संघ निवडीसाठी चाचणी घेण्याचा निर्णय झाला तेव्हा विनेश प्रथम ५३ किलो वजनी गटाच्या चाचणीत खेळली. मात्र, तेथे पराभूत झाल्याने तिने त्याच दिवशी ५० किलो वजनी गटातूनही चाचणी देत भारतीय संघात स्थान मिळविले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय घडले?

विनेशने ५० किलो वजनी गटात सहभागी होताना पहिल्याच फेरीत अव्वल मानांकित आणि या वजनी गटातील अपराजित असलेल्या जपानच्या युई सुसाकीवर मात करून झकास सुरुवात केली. त्यानंतर आणखी दोन लढती जिंकून ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली होती. मात्र, नियमानुसार दुसऱ्या दिवशी वजन घेण्यात आले तेव्हा विनेशचे वजन १०० ग्रॅम अधिक भरले. यामुळे विनेशला अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आले.

हेही वाचा : Kolkata Rape-Murder Case: पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय? कोलकाता प्रकरणात ही चाचणी कशासाठी?

ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी असे घडले होते का?

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत २०२१ मध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात जपानच्या रेई हिगुची याला केवळ ५० ग्रॅम वजन अधिक भरल्याने अपात्र ठरविण्यात आले होते. त्या वेळी जपानने हा निर्णय स्वीकारून पुढील ऑलिम्पिकची तयारी सुरू केली. त्याच रेईने या वर्षी पुन्हा त्याच वजनी गटातून सहभागी होताना थेट सुवर्णपदकापर्यंत मजल मारली.

विनेशची भूमिका काय राहिली?

अपात्र ठरविण्यात आल्यानंतर विनेशने या निर्णयाला ऑलिम्पिकसाठी नियुक्त करण्यात आलेल्या हंगामी क्रीडा लवादाकडे (दि कोर्ट ऑफ अर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) आव्हान दिले होते. स्पर्धेत मी अंतिम फेरी गाठली म्हणजे तोपर्यंत मी बरोबर होते. अंतिम फेरीपूर्वी माझे वजन केवळ १०० ग्रॅम अधिक भरले त्यामुळे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अंतिम लढत पुन्हा खेळविण्यात यावी अशी पहिली मागणी केली होती. त्यानंतर रौप्यपदक विजेती क्युबाची युस्नेलिस गुझमन लोपेझला हरवले असल्यामुळे तिच्यासह मला संयुक्त रौप्यपदक द्यावे अशी मागणी केली होती. या याचिकेत यूडब्ल्यूडब्ल्यू आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती प्रतिवादी होते.

हेही वाचा : विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?

क्रीडा लवादाने विनेशची याचिका कधी फेटाळली?

विनेशने निर्णयाला आव्हान दिल्यावर ऑलिम्पिकपूर्वी निर्णय लागेल असे मानले जात होते. मात्र, क्रीडा लवादाने विनेशविरुद्ध उठलेली सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन हा विषय गांभीर्याने घेतला आणि एक नाही, तर तीन वेळा निर्णय पुढे ढकलून अत्यंत बारकाईने सुनावणी केली. त्यानंतर विनेशची याचिका फेटाळली असा एका ओळीचा आदेश दिला.

याचिका फेटाळल्याची कारणे काय दिली?

वजनी गटाच्या स्पर्धेत वजन मर्यादेसंदर्भात तयार करण्यात आलेले नियम सर्व खेळाडूंसाठी समान असतात. यासाठी कुणी अपवाद ठरत नाही. आपले वजन मर्यादेपेक्षा कमी राहील याची खात्री करणे ही केवळ खेळाडूची जबाबदारी असते. या घटनेत विनेशचे वजन अधिक होतेच, शिवाय ती अनुभवी कुस्तिगीर आहे. अशा नियमांतर्गत ती अनेक वेळा खेळली आहे. त्यामुळे तिला नियम माहीत नाहीत असे होऊच शकत नाही. त्यामुळे वजन कमी राखण्याची जबाबदारी विनेशचीच राहते, असे क्रीडा लवादाने म्हटले आहे.

हेही वाचा : Kolkata Doctor Rape and Murder : भारतातील डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज का आहे?

कोणती वेगळी टिप्पणी केली?

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दुसऱ्या दिवशी केलेल्या वजनात आलेले अपयश हे विनेशने केलेल्या एखाद्या बेकायदा किंवा चुकीच्या कृतीमुळे झालेले नाही. मात्र, नियमानुसार या अपयशाचा परिणाम हा कठोरच मानला पाहिजे असे क्रीडा लवादाने म्हटले आहे.