दोन सर्वात मोठे टेक मोगल्स एलॉन मस्क आणि जिमी वेल्स यांच्यात नव्या वादाची सुरुवात झाली आहे. विश्वकोशीय संकेतस्थळ असणाऱ्या विकिपीडियावर एलॉन मस्क यांच्या अलीकडील कृतीचे वर्णन काहींनी हिटलर सॅल्यूट म्हणून केले. त्याचा विरोध करताना एलॉन मस्क यांनी विकिपीडियाविरोधात डिफंडिंग मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’चा ताबा मिळवीत त्याचे नाव बदलून ‘एक्स’केले. एक्स आणि विकिपीडिया या दोन संघटनांमधील संघर्ष एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात केलेल्या भाषणानंतर वाढला आहे. नाझी सॅल्यूटवरून सुरू झालेला नवा वाद काय? नेमके प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

प्रकरण काय?

एलॉन मस्क स्वतःला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात असल्याचे मानतात. त्यांच्या कथित वादग्रस्त हाताच्या हावभावाबद्दल केवळ विकिपीडियाच नव्हे, तर मुख्य प्रवाहातील माध्यमांनीदेखील टीका केली आहे. अनेकांनी त्याची तुलना ‘नाझी सॅल्यूट’शी केली आहे. आता माध्यम त्यांना जबाबदार धरत आहे. कारण- ते अमेरिकेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. न्यू यॉर्क मॅगझिनच्या इंटेलिजन्सरला डिसेंबरमध्ये दिलेल्या मुलाखतीत जिमी वेल्स यांनी जोर दिला की, वाढत्या फुटीरता, पक्षपातीपणा व संस्कृतीच्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट आणि तेथील विविध दृष्टिकोन मांडणारी सामग्री तयार करणे हे विकिपीडियाचे ध्येय आहे. ही साईट सध्या सामान्यतः विश्वसनीय स्रोत मानली जाते.

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Elon Musk
Elon Musk : “वीकेंडला काम करणं म्हणजे…”, रविवारीही काम करण्याच्या वादात आता एलॉन मस्क यांची उडी
Elon Musk
Elon Musk : ‘राज्यशास्त्राच्या पंडितांपेक्षा इलेक्ट्रिशियन्स व प्लंबर्स अधिक मोलाचे’; इलॉन मस्क यांचं विधान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?

हेही वाचा : पाकिस्तान ‘ISI’चे शिष्टमंडळ बांगलादेशात; दोन देशांची वाढती मैत्री भारतासाठी चिंताजनक? कारण काय?

सोमवारी (२० जानेवारी) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यादरम्यान एलॉन मस्क यांनी नाझी सॅल्यूट केल्याची चर्चा आहे. यावरूनच मस्क आणि वेल्स यांच्यात वादाची सुरुवात झाली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प परत आल्याबद्दल आभार मानताना त्यांनी त्यांचा उजवा हात छातीजवळ घेतला आणि नंतर तो बाहेर काढला. ही कृती अशी होती की, ते कुणाला तरी सॅल्यूट करत आहेत. बुधवारपर्यंत, विकिपीडियावरील मस्क यांच्या चरित्रात्मक विकिपीडिया पृष्ठावर आणि ‘नाझी सलाम’वर आधारित पृष्ठावर या कृतीचा उल्लेख करण्यात आला आहे.

‘डिफंड विकिपीडिया’ मोहीम

मस्क यांनी मंगळवारी (२१ जानेवारी) ‘एक्स’वर विकिपीडियाविषयीची एक माहिती शेअर केली. मस्क यांनी लिहिले, “विकिपीडियाद्वारे लेगसी मीडिया प्रचार हा ‘वैध’ स्रोत मानला जातो. त्यामुळे स्वाभाविक आहे की, मीडिया प्रपोगंडाला प्रोत्साहन देणारा वारसा होत जातो.” त्यांच्या बाजूने मांडण्यात आलेल्या एका मजकुरात लिहिले, “ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात, मस्क यांनी दोनदा उजवा हात गर्दीच्या वरच्या दिशेने केला.

त्यांच्या हावभावाची तुलना नाझी सलाम किंवा फॅसिस्ट सलामशी केली गेली.” त्यांच्या पोस्टमध्ये मस्क यांनी विकिपीडिया व न्यूज मीडिया या दोघांवर टीका केली आणि त्यांच्यावर चुकीची माहिती पसरवली गेल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या समर्थकांना विकिपीडियाला ‘डिफंड’ करण्याचे म्हणजेच देणगी देणे थांबविण्याचे आवाहन केले.

२०२२ मध्ये ‘एक्स’ची ४४ अब्ज डॉलर्स देऊ खरेदी केल्याबद्दल मस्कला ट्रोल करीत वेल्स यांनी उत्तर दिले, “मला वाटते की विकिपीडिया विक्रीसाठी नाही याबद्दल एलॉन नाखूश आहेत.” ना-नफा विकिमीडिया फाऊंडेशनद्वारे चालविले जाणारे विकिपीडिया हे आजच्या इंटरनेट लँडस्केपमध्ये एक आउटलायर आहे. वेल्स यांनी मस्क यांना उत्तर देत विकिपीडियावर लिहिण्यात आलेल्या बाबीमध्ये तथ्य असल्याचे म्हटले.

ते म्हणाले, जे काही लिहिण्यात आले, त्यात तथ्य आहे. यात तुम्हाला चुकीचे वाटेल, असे काही नाही. नाझी सॅल्यूटशी तुलना करण्यात आलेला इशारा दोनदा करण्यात आला त्यालाही त्यांनी फेटाळलं. परंतु, हा प्रपोगंडा नसून तथ्य आहे. एलॉन मस्क आणि जिमी वेल्स यांच्यातील वाद जुना आहे. एलॉन मस्क यांच्यानुसार विकिपीडिया कट्टर डावे समर्थक आहे. मस्क यांनी एक्सची खरेदी केली होती तेव्हा वेल्स यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

विकिपीडिया काय आहे?

१५ जानेवारी २००१ रोजी इंग्रजी भाषेच्या आवृत्तीसह सुरू झालेल्या विकिपीडियाची पोहोच झपाट्याने वाढली आणि दोन महिन्यांत जर्मन व स्वीडिश आवृत्त्या त्याच्याबरोबर जोडल्या गेल्या. आता विकिपीडिया जगभरातील शेकडो भाषांमध्ये प्रवेश करण्यायोग्य आहे. “मी असे म्हणेन की, पत्रकारिता आणि राजकारणावरील विश्वास कमी होणे ही खूप गंभीर बाब आहे,” असे वेल्स यांनी ‘इंटेलिजन्सर’ला सांगितले. परंतु विकिपीडिया समुदायामध्ये आम्ही तटस्थ राहण्याचा प्रयत्न करतो, स्पष्ट होण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : एम. एफ. हुसेन यांच्या हिंदू देवतांच्या कलाकृती वादाच्या भोवऱ्यात; नेमके प्रकरण काय?

मस्क यांच्या २०२२ च्या ट्विटरच्या खरेदीनंतर, त्यांनी त्याचे नाव बदलून एक्स केले. त्यांनी या व्यासपीठावरील विश्वास आणि सुरक्षिततेच्या बाबी कमी केल्या आणि कम्युनिटी नोट्स सादर केले. हे एक क्राउड-सोर्स्ड मॉडरेशन टूल आहे. परंतु, संशोधकांचे म्हणणे आहे की, एक्सवरील रेलिंग कमी केल्याने आणि चुकीची माहिती पसरवणारी एकेकाळी बंदी घालण्यात आलेली खाती पुनर्स्थापित केल्यामुळे हा एक प्लॅटफॉर्म चुकीच्या माहितीचे आश्रयस्थान ठरत आहे.

Story img Loader