-मंगल हनवते

मुंबई ते मांडवा, अलिबाग अशी वॉटर टॅक्सी सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अत्याधुनिक आणि अतिजलद अशा या वॉटर टॅक्सीमुळे मुंबई ते मांडवा अंतर केवळ ४० मिनिटांत पार करता येत आहे. येत्या काळात बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया अशीही वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई आणखी जवळ येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुकर, अतिजलद करणारी ही २०० प्रवासी क्षमतेची देशातील पहिली वॉटर टॅक्सी नेमकी आहे तरी कशी, याचा नेमका कसा उपयोग मुंबईकरांना होणार आहे, या सेवेला प्रतिसाद मिळणार का, याचा हा आढावा…

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

सागरमाला योजना काय आहे?

भारताला ७५०० किलोमीटरपेक्षा मोठा समुद्र किनारा लाभला आहे, तर १४,५०० किलोमीटर जलवाहतूक मार्ग आहे. अशावेळी जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी, बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला परियोजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बंदर विकास आणि जलवाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोठे प्रकल्प राज्यात राबविले जात आहेत. याच योजनेचा एक भाग म्हणजे वॉटर टॅक्सी सेवा. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाला जवळ आणण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा येत्या काळात महत्त्वाची ठरेल असे म्हटले जात आहे.

वॉटर टॅक्सी म्हणजे काय? 

वॉटर टॅक्सी हा जलवाहतुकीचा एक अत्याधुनिक पर्याय आहे. अतिजलद आणि सुरक्षित प्रवासासाठी वॉटर टॅक्सी सेवा परदेशात फार काळापासून प्रचलित आहेत. परदेशातील ही सेवा फेब्रुवारी २०२२मध्ये पहिल्यांदा भारतात सुरू झाली. मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली. भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अशी तीन मार्गावर महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने सागरमाला योजनेअंतर्गत ही सेवा सुरू केली. मात्र या सेवेसाठीचे तिकिट दर अधिक असल्याने या जलमार्गाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्या मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीच्या फारच कमी फेऱ्या झाल्या असून प्रवासी संख्याही खूपच कमी आहे.

प्रतिसाद नसतानाही सेवा?

वॉटर टॅक्सीचा पहिला प्रयोग अयशस्वी ठरला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा या जलमार्गावर वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या प्रचंड घटल्या आहेत. अनेक फेऱ्या बंद आहेत. मात्र त्यानंतरही आता बंदर प्राधिकरण आणि सागरी मंडळाने थेट २०० प्रवासी क्षमतेची, देशातील सर्वात मोठी पहिली वॉटर टॅक्सी सेवेत दाखल केली आहे. मांडवा ते मुंबई क्रूझ टर्मिनल अशी वॉटर टॅक्सी सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अतिजलद आणि अत्याधुनिक अशा या वॉटर टॅक्सीमुळे मांडवा ते मुंबई अंतर ४० मिनिटांत पार करता येते. रो-रो पेक्षा जलद प्रवास आता शक्य झाला आहे. लवकरच ही अतिजलद बोट बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरही चालविली जाणार आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. सकाळी साडेआठ वाजता बेलापूर ते गेट वे आणि सायंकाळी साडेसहा वाजता गेट वे ते बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांमुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई हे अंतर ६० मिनिटांत पार होणार आहे.

वॉटर टॅक्सी आहे तरी कशी?

आतापर्यंत १४ ते ५६ प्रवासी क्षमतेच्या वॉटर टॅक्सी मुंबईत धावत आहेत. पण मांडवा ते मुंबई क्रूझ टर्मिनल या जलमार्गावर धावणारी वॉटर टॅक्सी चक्क २०० प्रवासी क्षमतेची आहे. इतकी मोठी आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही देशातील पहिली वॉटर टॅक्सी असल्याचा दावा केला जात आहे. ही वॉटर टॅक्सी अत्यंत सुरक्षित असून वातानुकूलित बोटीत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. याचे दरही यापूर्वीच्या सेवेच्या तुलनेत कमी असून ४०० आणि ४५० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. ही बोट भारतात, गोव्यात तयार करण्यात आली आहे. त्यासाठी १६ कोटी रुपये असा खर्च आहे. नयनतारा शिपिंग प्रा. लि. कंपनीने ही बोट तयार करून घेतली असून त्यांच्याकडूनच या बोटीचे संचालन करण्यात येत आहे. लवकरच या कंपनीकडून आणखी एक बोट तयार करून घेतली जाणार आहे. मात्र पहिल्या बोटीचा प्रतिसाद पाहून नंतर यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे.

वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या पसंतीस पडणार का?

सर्वसामान्य नागरिक मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक कोंडीला प्रचंड कंटाळले आहेत. अशा वेळी त्यांना जलवाहतुकीचा अतिजलद पर्याय उपलब्ध झाला तर नक्कीच तो प्रवाशांच्या पसंतीस उतरेल. जे नोकरदार रोज नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत कामासाठी स्वतःच्या वाहनाने येतात, त्यांच्याकडुन बेलापूर ते गेट वे फेरीला प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या मुंबई ते अलिबाग प्रवासासाठी तीन ते चार तास लागतात. अशा वेळी पर्यटकांकडून आणि सर्वसामान्यांनाकडूनही येत्या काळात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा केला जात आहे.