Fifa world Cup 2018 POR vs MOR : फिफा विश्वचषक स्पर्धेत आजच्या पहिल्या सामन्यात पोर्तुगालने मोरोक्कोवर सहज विजय मिळवला. पोर्तुगालने अपेक्षेप्रमाणे सामन्यात मोरोक्कोवर वर्चस्व राखले. पोर्तुगालने मोरोक्कोचा १-० असा पराभव केला आणि सामना आपल्या नावे केला.

सध्याच्या स्पर्धेत ‘हॉट फेव्हरिट’ असलेल्या पोर्तुगालच्या संघाने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याचा निकाल त्यांना लगेचच मिळाला. सामान्याच्या चौथ्या मिनिटाला मांटिन्होने फुटबॉल रोनाल्डोकडे पास केला आणि पोर्तुगालकडून स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सामन्यातील एकमेव गोल झळकावला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला पोर्तुगालला आघाडी मिळाल्यामुळे पुढील सामना त्यांच्यासाठी अधिक सहज झाला.

चौथ्याच मिनिटाला गोल झाल्यांनतर या सामन्यात गोलची सरबत्ती पाहायला मिळणार अशी फुटबॉल प्रेमींची आशा होती. पण त्यानंतर संपूर्ण सामन्यात एकही गोल होऊ शकला नाही. दोनही संघांकडून गोलपोस्टवर अनेक आक्रमणे झाली, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे एकही खेळाडूला शक्य झाले नाही. अखेर, १-०च्या फरकाने पोर्तुगालने सामना जिंकला.

रोनाल्डोने या सामन्यात गोल करून एक महत्वाचा विक्रम केला. डाव्या आणि उजव्या पायाने तसेच डोक्याने गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोने विक्रम केला. एकाच स्पर्धेत अशी कामगिरी करणारा रोनाल्डो हा १९६६ नंतरचा पहिला पोर्तुगिज खेळाडू ठरला. १९६६ साली जोसे टोरेस यांनी ही किमया केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोर्तुगालने आपला पहिला विजय साजरा करत ब गटात २ सामन्यात ४ गुण मिळवले असून गटात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर मोरोक्कोचा संघ दुसऱ्या पराभवासोबत गटात तळाला फेकला गेला आहे. या पराभवामुळे मोरोक्को संघाचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.