Ganesh Visarjan 2025 Wishes: यंदा २७ ऑगस्टला गणरायाचं आगमन झालं आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली. भारताबरोबरच परदेशातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पा घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झाला.
आता गणरायाचं आगमन होऊन १० दिवस होत आले आहेत. अनंत चतुर्दशी आज आहे. गणेशोत्सवातील सर्वांत भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. यंदा ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. १० दिवसांनंतर बाप्पा आता सगळ्यांचा निरोप घेणार आहे. गणपती बाप्पा जसा वाजत-गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभसुद्धा तितकाच वाजत-गाजत होतो. गणेश भक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात. गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला व्हॉट्सअप, मेसेजद्वारे खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा (Anant Chaturdashi Wishes in Marathi)
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी

आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळ्यांत अश्रू दाटले तू जाताना
चूक-भूल पदरात घे अन् पुढच्या वर्षी लवकर ये…

गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा विसर्जन संदेश (Ganpati Bappa Visarjan Quotes in Marathi)
दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने,
माहीत आहे मला देवा
पुन्हा येणार तू वर्षाने
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…
सेवा जाणुनी
गोड मानुनी
द्यावा आशीर्वाद आता
बाप्पा मोरया रे
निरोप घेतो आता
पुढच्या वर्षी लवकर या…

वर्षभर वाट पाहून
दहा दिवस गेले क्षणात
निरोप घेऊन तू पुन्हा येशील
तुझ्या ठरलेल्या घरात…
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस मराठी (Ganpati Bappa Visarjan Status)
एक, दोन, तीन, चार
गणपतीचा जयजयकार
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
डोळ्यात आले अश्रू
बाप्पा आम्हाला नका विसरू,
आनंदमय करून चाललात तुम्ही
पुढच्या वर्षाची वाट पाहू आम्ही…
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या येण्यानं गणराया
घर माझं आनंदात नाहून जातं
अनंत चतुर्दशीचा निरोप तुला देतांना
मन माझं भरून येतं
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!